शिपाई ते करोडपती- ‘सिटरस पे’ ने श्याम कुमारच्या प्रामाणिकपणाचा कसा केला सन्मान!
आजच्या काळात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत जात आहे, त्याच्या कुठेही दर्शनाने केवळ वेगळेच वाटत नाही तर त्याला बक्षीसही दिले जाते. या २०१०च्या दुर्मिळ स्टार्टअपच्या कहाणीतील नोकर कसा करोडपती झाला त्याची ही गोष्ट वाचनीय अशीच आहे.
२०१० मध्ये,एका वरिष्ठ बँकरकडे चालकाची नोकरी करणा-या भावाला श्याम कुमार यांनी विचारणा केली की, त्याने त्यांना नोकरी साठी मदत करावी. या बँकरने त्यांचे मित्र जितेंद्रकुमार गुप्ता यांना त्यासाठी गळ घातली, जे 'सिटरस पे' चे संस्थापक आहेत, विचारणा केली की, श्याम यांना काही काम मिळेल काय.
इ-कॉमर्स साठी ते देशातील सुरूवातीचे दिवस होते, त्याकाळी जितेंद्र यांना कंपनीला उभी करायचे होते, श्याम यांनी जितेंद्र यांची भेट घेतली, आणि सिटरस पे मध्ये त्यांच्या शिपाई म्हणून नोकरीची आठ हजार रूपये वेतनावर निश्चिती झाली.
श्याम हे शाळाबाह्य झाले होते, कारण त्यांचे वडील आजारी असत आणि सिटरसमध्ये येण्यापूर्वी कामासाठी त्यांना बाहेर पडावे लागले. तेथे अनेकदा असे झाले की, जितेंद्र यांनी इएसओपी बाबत वर्णन करून समजाविले की, ते त्यांच्या कसे कामी येवू शकते, पण श्याम यांनी त्याबाबत कधीच मनावर घेतले नाही, इएसओपी म्हणजे एम्लॉई स्टॉक ओनरशिप प्लान, हा मुलत: समभाग- आधारीत मोबदला देण्याचा मार्ग आहे.
श्याम मालाड मुंबई येथे १०बाय १०च्या झोपडीत राहात असत. या घरात दहा माणसे होती, ज्यात त्याचे पालक आणि भावाचे कुटूंब होते. त्यांना शंभर फूट जागेत झोपताना पडद्याचा आडोसा करून झोपावे लागे. श्याम यांच्या कडे सांताक्रुझ येथे कार्यालयात खूप मोकळा वेळ असे, तेथे ते अनेकदा भटकंती करत की कंपनी आणि व्यवसाय म्हणजे काय आहे.
कालांतराने, सिटरस ला गुंतवणूक दारांचा प्रतिसाद मिळत गेला. जसे की, सेक्वाया सेक्युओ कॅपिटल ,ऍसेंट कॅपिटल, इ कॉन्टेक्ट एशिया, आणि बिनोज एशिया आणि मोठ मोठे ग्राहक देखील जसे की, इंडिगो, गो एअर, आणि अॅमेजॉन. पण बदलाचा क्षण असा आला की, पे यू ने सिटरस पेला सप्टेंबर २०१३मध्ये विकत घेतले. या बदलाने श्याम यांना पन्नास लाखांचे समभाग मिळाले. जितेंद्र यांनी श्याम यांना बोलावून घेतले आणि त्याबाबत सांगितले. त्यांना आणि त्यांच्या पत्नीला यावर विश्वास बसत नव्हता जोवर जी रक्कम बँकेत जमा झाली नाही.
श्याम सध्या भाड्याच्या वन बीएचके मध्ये राहातात, आणि नव्या घराच्या खरेदीच्या नियोजनात आहेत, जे मुंबई लगतच्या भागात असेल. ते चांगला मोबाईल फोन वापरू लागेल आहेत, पत्नी आणि कुटूंबासह गोव्यात सहल करण्याच्या विचारात आहेत, आणि त्यांचा आता जीवनविमा देखील आहे.
श्याम यांची कहाणी लाखात एक अशीच आहे, आणि ती केवळ हेच दाखवते की स्टार्टअपच्या विश्वात देशात कशी नेमकी दिशा मिळू शकते.
- थिंक चेंज इंडिया