संपादने
Marathi

एक असे प्राध्यापक, जे ३३ वर्षापासून सर्व सुखसुविधा सोडून जंगलात राहतात, आदिवासींसाठी...!

Team YS Marathi
25th Feb 2016
2+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

छत्तीसगढच्या बिलासपूर जिल्ह्याचा 'अचानकमार व्याघ्र अभयारण्य' नजिक 'वनग्राम लमनी छपरवा'मध्ये विनोबा भावे यांच्या सारखे दिसणारे एक व्यक्ती जंगलामध्ये बनलेल्या झोपडीत मागील ३३ वर्षापासून रहात आहेत. त्यांचे नाव डॉ. प्राध्यापक प्रभुदत्त खेरा आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठात १५वर्षापर्यंत समाजशास्त्राचे धडे विद्यार्थ्यांना दिले. सन १९८३-८४मध्ये एका मित्राच्या लग्नात बिलासपूर येथे येणे झाले. त्यानंतर जंगलात फिरायला गेले. तेथे एका आदिवासी मुलीचा फाटलेल्या जुन्या फ्रॉकमध्ये आपले शरीर झाकण्याची खटाटोप पाहून ते सुई धागा घेऊन तो फ्रॉक शिवायला बसले. त्यादरम्यान तेथे विश्रामगृहात थांबून तेथे राहणा-या बैगा जमातीच्या लोकांच्या राहणीमानाला बघून समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. या लोकांची परिस्थिती आणि सरकारचे त्यांच्याकडे असलेले दुर्लक्ष पाहून प्रा. खेरा यांचे मन इतके व्यथित झाले की, त्यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडली आणि दिल्लीतील आरामदायी जीवन सोडून लमनीच्या जंगलाच येऊन रहायला लागले. 

image


आता मागील ३३वर्षापासून बैगा आदिवासी लोकांची सेवा आणि त्यांचे जीवन सुधारणे हाच प्रा. पी. डी. खेरा यांच्या जीवनाचा उद्देश आहे. आज ८०वर्षाच्या वयात ते संरक्षित बैगा जमातीच्या मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत, महिलांना गुलामीमधून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि अंधविश्वास, जादू टोणा यांच्यापासून दूर करत आहेत. 

१९६० च्या शतकात प्रसिद्ध मानव शास्त्रज्ञ एल्विन यांनी देखील बैगा जमातीचा शोध घेतला होता. मात्र, प्रा. खेरा यांचे म्हणणे आहे की, त्यांना बैगा जमातीतील लोकांच्या समस्यांपासून इतका वेळच नाही मिळत की, ते एखादे पुस्तक लिहू शकतील, खेरा यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “जेव्हा मी येथे येऊन रहायला लागलो, तेव्हा लोकांच्या आणि सरकारच्या प्रतिनिधींनी मला नक्षलवादी समजले आणि तपासणी देखील केली. नंतर माझा स्वभाव बघून समजले की, हा तर वेडा प्राध्यापक आहे, जो आपले आयुष्य खराब करण्यासाठी या लोकांमध्ये आला आहे.” 

image


३३वर्षानंतर खेरा यांच्या मेहनतीने बैगा जमातीची मुले १२वी पर्यंत शिक्षण घेत आहेत. हे युवक शहरात जाऊन स्वतःसाठी नोकरी शोधत आहेत आणि त्यांच्या जीवनशैलीत खूप फरक पडला आहे. प्रा. खेरा यांचे म्हणणे आहे, 'सरकार बैगा जमातीच्या लोकांना आरक्षित जमातीचा दर्जा देण्यास विसरली आहे आणि जितक्या योजना आणि घोषणा होतात, त्यानुसार काम होत नाही'.

प्रा. खेरा यांच्या सेवेचे वेड इतके आहे की, ते आपले निवृत्तीवेतनातील अधिकांश भाग या बैगा जमातीच्या मुलांवर खर्च करतात. जंगलात झोपडीत राहणारे, स्वतःचे काम स्वतःच करणा-या या ८०वर्षाच्या तरुणाला बघून असे वाटते की, जसे गांधीजी सांगत आहेत की, हिच आहे त्यांच्या स्वप्नांतील प्रतिमा.

अशाच आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा या संबंधित कहाण्या :

छतीसगढच्या ६५ वर्षीय विश्वनाथ पाणीग्रहींनी गावागावात राबविली स्वच्छता ग्राम अभियान मोहीम 

कचरा वेचक मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी धडपडत आहेत, बनारसचे प्राध्यापक राजीव श्रीवास्तव!

जिल्हाधिकारी झाले मुलांचे मित्र, अनवाणी शाळेत जाणा-या पंचवीस हजार गरीब मुलांना ‘चरण पादूका’ योजनेतून दिली पादत्राणे!

लेखक : रवी वर्मा

अनुवाद : किशोर आपटे

2+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags