छतीसगढच्या ६५ वर्षीय विश्वनाथ पाणीग्रहींनी गावागावात राबविली स्वच्छता ग्राम अभियान मोहीम
"मी स्वतंत्रता संग्राम सेवक नाही बनू शकलो, कारण माझा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला (१९५२). मी सैनिक सुद्धा नाही बनू शकलो कारण नियमानुसार शारीरिक मापदंडाच्या पात्रतेत बसलो नाही. देश, समाज तसेच लोकांसाठी काही करण्याची इच्छा माझ्या मनात वेळोवेळी डोके वर काढायची. जशी संधी मिळाली तसे समाजासाठी काही करण्यासाठी पुढे सरसावलो" असे ६५ वर्षीय विश्वनाथ पाणीग्रही सांगतात. जे छतीसगढमधील महासमुन्न्द जिल्यातील बागबाहरा गावचे निवासी आहे. सामाजिक सेवेसाठी त्यांची सतत धडपड सुरु असते. त्यांचे गाव बागबाहरा पासून ३० किलोमीटर दूर असलेल्या कौंसरा गावात दर आठवड्याला ‘सफाई संडे’ चालवत आहे. थंडी, ऊन वारा कशाची तमा न बाळगता ते सतत कार्यशील आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितले, "स्वच्छता स्वातंत्र्यापेक्षा महत्वपूर्ण आहे’’, महात्मा गांधी यांचे सूत्र लक्षात ठेवत तसेच पंतप्रधानांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानापासून प्रेरणा मिळाली असल्याचे विश्वनाथ पाणीग्रही यांनी युवर स्टोरीला सांगितले की. "मी स्वतंत्रता सेनानी बनू शकलो नाही, देशाचा सैनिक ही नाही बनू शकलो, पण स्वच्छता सेनानी नक्कीच बनू शकतो. याच एका ध्येयाने तन – मन समर्पून स्वच्छता अभियान कार्यक्रमात सामील झालो. मला महासमुंद जिल्यातील पंचायत मध्ये नवरत्न सदस्याच्या रुपात कार्य करण्याची संधी मिळाली ’’. उगवत्या सूर्याच्या साक्षीने प्रत्येक रविवार महासमुंद जिल्यातील कौंसरा गावात जाऊन गावकऱ्यांबरोबर मिळून झाडू मारणे, कचरा भरून ट्रॅक्टर मध्ये टाकणे, गावाच्या आजूबाजूच्या परिसरातील साफसफाई करणे ही बागबाहरा गावचे निवासी विश्वनाथ पाणीग्रही यांची ओळख बनली आहे.
विश्वनाथ पाणीग्रही यांची कामाप्रती असलेली ओढ पाहून आता गावातील तरुण सुद्धा स्वच्छता कार्यक्रमात सामील झाले तसेच त्यांच्या प्रेरणेने बालिका – बालक ब्रिगेडची गावात स्थापना झाली. ‘’सफाई संडे’’ च्या अंतर्गत गावातील प्रत्येक घरात स्वच्छता गृह बनविणे, गावाला शौच मुक्त (Open Defecation Free) करण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. लवकरच हे गाव ओ.डी.एफ. ग्राम श्रेणी मध्ये सामील होणार आहे. विश्वनाथ यांची इच्छा आहे की ते आपल्या या कार्याला एका गावापर्यंतच सीमित न ठेवता जवळपासच्या गावात या अभियानचा विस्तार करण्याची आहे. तसेच गांधीजींच्या स्वप्नातील गावाच्या निर्मितीची त्यांची इच्छा आहे. विश्वनाथ यांच्या स्वच्छता मोहिमेला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे, आता जवळपासच्या गाव-परिसरातील लोकं सुद्धा या मोहिमेत सहभागी होत आहे.
विश्वनाथ पाणीग्रही यांनी स्वच्छ गाव बनविण्याच्या योजनेबरोबरच हिरवळ वाढवून पर्यावरणाला साथ देण्याच्या दृष्टीने एक पाऊल उचलले आहे. आणि ‘ग्रीन केअर सोसायटी’ बनून तरुणांना यात सामील केले आहे. जे आसपासच्या भागात जाऊन फक्त नि:शुल्क रोपट्यांचे वाटपच करीत नाही तर मोकळ्या जागेत झाडे लावत आहे. यासाठी रीतसर जनसहयोगाने वाहनांवर बॅनर लाऊन रोपटी वेगवेगळ्या जागेवर पोहचवली जाते.
विश्वनाथ पाणीग्रही यांचे सगळे प्रयत्न बघून हेच म्हणू शकतो की कोणतेही काम सुरु करण्यासाठी वयाचे बंधन नसते. गरज आहे ती फक्त हिम्मत आणि मेहनतीची . हे नक्की आहे की जर नि:स्वार्थ भावनेने तुम्ही पुढे जात असाल तर लोकांचा लोंढा पण तुमच्या मागे येईल. युवर स्टोरी विश्वनाथपाणीग्रही यांच्या जिद्दीला सलाम करते.
युवरस्टोरी वरील यशोगाथा, प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी आमच्या YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.
वरीलप्रमाणे आणखी काही कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
अंधाऱ्या गावांना प्रकाशाने उजळून टाकणारे ʻसौर सैनिकʼ कनिका खन्ना यांचा ʻसंकल्पʼ
मॅथ्यूसरांच्या ‘मॅजिक बस’मधून झोपडपट्टीतील मुले ‘कॉर्पोरेट’ला
रोज पोहत जाऊन मुलांना शिकवणारे शिक्षक ज्यांनी वीस वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही
लेखक : रवी वर्मा
अनुवाद : किरण ठाकरे