नामांकित छायाचित्रकारांचे "महाराष्ट्र माझा" प्रदर्शन टाऊन हॉल येथे सुरु

नामांकित छायाचित्रकारांचे "महाराष्ट्र माझा" प्रदर्शन टाऊन हॉल येथे सुरु

Saturday January 07, 2017,

1 min Read

प्राचीन भारतीय कला- संस्कृती, इतिहासाचा वारसा, लोकपरंपरा, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन, वन्यजीव आदी वैविध्यपूर्ण छायाचित्रे असलेले प्रदर्शन ठाणेकरांना पहावयास मिळणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने "महाराष्ट्र माझा" ही राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रे ठाण्यातील नागरिकांना बघता यावीत या उद्देशाने येथील टाऊन हॉलमध्ये हे प्रदर्शन आजपासून भरविण्यात आले. रविवार 8 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन पाहता येईल.

कोकण विभागीय माहिती कार्यालय, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 


image


राज्यातील कानाकोपऱ्यातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन एकाच छताखाली या प्रदर्शनाच्या माध्यमातून पहावयास मिळणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील लोकजीवन, प्राचीन वारसा,कानाकोपऱ्यातील विविध संस्कृती, वन्यजीव, गडकिल्ले, वृक्षसंवर्धन आदी विषयांवरील नामवंत छायाचित्रकारांनी कल्पकतेने काढलेली छायाचित्रे या प्रदर्शनात पहावयास मिळणार आहेत. सदर प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत 8 जानेवारीपर्यंत टाऊन हॉल, कोर्ट नाका, ठाणे पश्चिम येथे नागरिकांसाठी खुले राहणार आहे.