हे वाचा… तुमचा विश्वास बसेल; सगळं शक्य आहे, हवी फक्त एक ‘आयडिया’ची कल्पना!

हे वाचा… तुमचा विश्वास बसेल; सगळं शक्य आहे, हवी फक्त एक ‘आयडिया’ची कल्पना!

Tuesday November 10, 2015,

3 min Read

तुम्ही कधीही ज्या गोष्टीच्या शोधात गेलेला नसता, नेमकी तीच गोष्ट एक उत्तम गोष्ट म्हणून तुमच्यासमोर येते, असे घडते ना! हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा इथल्या एका जोडगोळीच्या गोष्टीतली एक गोष्ट काहीशी अशीच ठरली. एक व्यवसाय ते सुरू करणार होते आणि त्याच्या तयारीसाठी थेट अमेरिकेला जाण्याच्या तयारीत होते. व्यवसायाचे नाव होते ‘ओल्ड याक बाजार’ आणि ज्या वस्तू ते विकत त्यातच हत्तीच्या शेणापासून तयार करण्यात आलेला कागदही असे. म्हणजे आजही आहे. या जोडगोळीचा फोकस एकूण व्यवसायावर असला तरी त्यांच्या व्यवसायातला एक घटक असलेल्या हत्तीशेणाच्या कागदाची गोष्टच अधिक रंजक अशीच. तर तीच गोष्ट आपण आज जाणून घेऊया… तर हत्तीशेणातून कागद या संकल्पनेमागे दोन डोकी आहेत. एक विजेंद्र शेखावत आणि दुसऱ्या महिमा मेहरा.

२००३ मध्ये सुरवात केल्यानंतर दोघे उत्तरोत्तर ‘पॉप्युलर’ होत गेले. कारण त्यांचे कामच आगळेवेगळे होते. त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नव्हती. आता या कामाची पार्श्वभूमी सांगणे औचित्याला जरा धरूनच होईल. ना का? तर झाले असे, की जयपूरमधल्या एका मठात साधनेच्या निमित्ताने विजेंद्र आणि महिमा दोघे मुक्कामाला होते. आणि एकेदिवशी महिमा यांनी विजेंद्र यांचे लक्ष समोरच्या उकिरड्याकडे वेधले. उकिरडा कसला डोंगरच होता तो! हत्तीच्या शेणाचा डोंगर! सुरवातीला विजेंद्रनी दुर्लक्ष केले आणि नंतर पुन्हा विचार केला. हत्तीच्या शेणाची दुर्गंधी, ती घाण या सगळ्यांकडे क्षणभर दुर्लक्ष केले. कच्चा माल म्हणून त्याकडे विजेंद्र पाहू लागले. मुळात विजेंद्र नेहमीच विविध वस्तूंपासून (सहसा त्या टाकाऊच असत) कागद बनवण्याचे प्रयोग करत आलेले होते. हत्तीच्या शेणही आजमावून बघू म्हणून त्यांनी ठरवले.

थोडे शेण त्यांनी उचलले आणि मग त्यावर काम करायला सुरवात केली. खुप प्रयत्न केल्यानंतर अखेर त्यापासून कागद बनवण्यात यश आले. आणि अशाप्रकारे ‘हाथी छाप पेपर’ हा नवा ब्रँड अस्तित्वात आला. अखेर हे घडले कसे?

हाताने तयार करावयाच्या कुठल्याही कागदाच्या निर्मितीची जी पद्धत आहे, थोडाफार फरक वगळता हत्तीशेणापासून कागद बनवण्याची पद्धतही जवळपास तशीच आहे. हत्तीच्या शेणात फायबर जास्त प्रमाणात असल्याने त्यानुसार बदल पद्धतीत करावा लागला. दोघांनी सांगितले, ‘‘आम्ही बनवलेला कागद वापरताना कुणाचेही नुकसान व्हायला नको. या कागदाच्या वापरात संसर्गासारखा कुठलाही संभव नको, हेच आमच्यासाठी सर्वांत मोठे आव्हान होते म्हणून आम्ही यात कीटकनाशक वापरले.’’

image


हत्तीचे शेण गोळा करणे

image


हत्तीचे शेण स्वच्छ करणे

image


शिजवणे

image


काडीकचरा वेगळा करणे

image


लगदा बनवणे

image


कागद बनवणे

image


वाळवणे

image


कॅलेंडरिंग करणे

विकास

सुरवातीची चार वर्षे हा माल जर्मनीला निर्यात केला गेला. मग २००७ मध्ये भारतातही त्याची विक्री सुरू झाली. कंपनी जयपूरला आहे. आणि गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत ५० स्टोअर्सपर्यंत ‘हाथी छाप’ने आपली मजल गाठलेली आहे. शिवाय ऑनलाइन स्टोअर्समधूनही हा माल विकला जात आहे. कंपनीला जास्तीत जास्त उत्पन्न निर्यातीतूनच मिळते. सरल्या आर्थिक वर्षात कंपनीने ३५ लाख रुपये नफा कमावला होता.

व्यवसायाची शक्ती

भारतात अशा पद्धतीच्या व्यवसायांना संधीची वाणवा नाही आणि खरंतर हे लोण नवव्यावसायिकांमध्ये वणव्यासारखे पसरले पाहिजे. नवव्यावसायिकांचाही आणि देशाचाही त्यात फायदाच आहे. स्वस्त आणि मुबलक कच्चा माल, सोपी प्रक्रिया आणि नफाच नफा, हे तंत्र म्हणून सर्वोत्तमच नव्हे काय?