आठव्या वर्षी लग्न झालेली ही २० वर्षीय राजस्थानी तरूणी; डॉक्टर होण्याच्या मार्गावर
‘जेथे इच्छा आहे तेथे मार्ग आहे’. त्यासाठी ही गोष्ट आड येत नाही की तुम्ही गरीब आहात की आठव्या वर्षीच विवाहित आहात!
रूपा यादव यांनी ही जुनी म्हण सिध्द करून दाखवली आहे, राष्ट्रीय प्रवेश तसेच पात्रता परिक्षा (नीट) मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी उत्तीर्ण होवून. वयाच्या आठव्या वर्षीच विवाहीत २० वर्षाच्या रूपा आता डॉक्टर होण्याच्या मार्गावर आहेत.
कोटा येथे कोचिंग क्लासमध्ये दाखल झालेल्या रूपा यांनी त्यांच्या तिस-या प्रयत्नात ही परिक्षा उत्तिर्ण केली आहे. २६१२ ही देशपातळीवरील श्रेणी मिळवून त्यांनी ६०३ गुण मिळवले आहेत. आणि त्या आता कौन्सिलींग मध्ये महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी सहभागी होत आहेत. त्यांना चांगल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची अपेक्षा आहे.
जयपूर जिल्ह्यात करेरी गावात जन्मलेल्या रूपा आणि त्यांच्या ज्येष्ठ भगिनी रूक्मा यांचा बालविवाह १२ वर्षांचे शंकरलाल आणि त्यांचे बंधू बाबूलाल यांच्याशी झाला. ज्यावेळी त्या दोघी आठ आणि नऊ वर्षांच्या होत्या. बाल विवाहाला कितीही बंदी असली तरी राजस्थानात ही प्रथा त्यावेळी सुरूच होती. आज जरी ती पूर्णत: थांबली नसली तरी त्याबाबत फारसे ऐकू येत नाही.
लग्नानंतरही रूपा यांनी शिक्षण पूर्ण केले, जे राजस्थानातील सामाजिक स्थिती पाहता दिव्यच म्हणायला हवे. दहावीत त्यांना चांगले ८३ टक्के गुण मिळाले ज्यातून त्यांच्या पती आणि दीराने त्यांना पुढे शिकण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर त्यांनी बारावीलाही चांगले गुण मिळवण्याची परंपरा सुरू ठेवली. घरचे काम सांभाळून त्यांनी अभ्यास पूर्ण केला.
त्यांनी स्वत: बी एस सी साठी प्रवेश घेतला आणि अखिल भारतीय प्रवेश परिक्षा दिली. एका वृत्तानुसार त्या म्हणाल्या की, “ जरी मला चांगल्या सरकारी महाविद्यालयासाठी पात्र होता आले नाही, एआयपीएमटी मधील गुण पाहून माझ्या पति आणि दीराने मला कोटा येथे एमबीबीएस च्या प्रवेश परिक्षेच्या तयारीसाठी पाठविण्याचे ठरविले.
रूपा म्हणतात की त्यांना डॉक्टर व्हायचे आहे. कारण त्यांचे काका भिमन यादव मृत्य़ू पावले त्यावेळी त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही आणि ह्रदयविकाराने मृत्यू झाला.
त्या म्हणतात, त्यांना कोटा येथे कोचिंग संस्थेत अभ्यास केल्याने गुण मिळवण्यास मदत झाली. खाजगी शिकवणी लावूनही अलेन कोचिंग यांनी त्यांना ७५टक्के शुल्कात सवलत दिली होती. कारण त्यांच्या दीरांना कोटा येथील ही शुल्क त्यांच्या आर्थिक हालाखीच्या स्थिती मुळे अदा करणे शक्य नव्हते.
रूपा माध्यमांशी बोलताना असे म्हणाल्या की, “ माझे दीर माझ्या पालकांप्रमाणे आहेत. शेतीचे उत्पन्न तुटपूंजे आहे. त्यामुळे माझ्या पतीने टॅक्सी चालवून माझ्या शिक्षणासाठी निधीची व्यवस्था केली.” त्यांच्या मते ऍलन कोचिंग संस्था यांनी त्यांना आता मासिक शिष्यवृत्ती देवून मदत करण्याचे ठरविले आहे, जेणे करुन त्यांना एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करता यावा.