कल्पक उद्योजकाचा संघर्ष...
नव्या उद्योजकांचा देशातल्या सिस्टिमशी सुरु असलेला लढा
आदर्श नटराजन (आयआयएम बंगळुरू) आणि अभिषेक मिश्रा (एनआयआयटी पदवीधर, जालंधर) या दोन तरुणांनी एकत्र येऊन २०१२ साली अँड्रिया सिस्टिम या कंपनीची स्थापना केली. मोठ्या उद्योगांना सर्व प्रकारचे उत्पादनं पुरवण्याचा त्यांचा उद्देश होता. आदर्श आणि अभिषेक हे दोघेही कर्नाटक सरकारच्या मध्यान्ह भोजन यंत्रणेचे काम करत होते. हे काम करत असतानाच ‘अँड्रिया ’ चा जन्म झाला. “ सरकारी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला मध्यान्ह भोजन मिळत नव्हते. हा प्रकार थांबवण्यासाठी केवळ बोटांचे ठसे घेण्याची पद्धत पुरेशी ठरणार नाही, असे आम्ही कर्नाटक सरकारला सांगितले होते. त्यासाठी लाभार्थीचा चेहरा नोंदविला जाईल अशी आधुनिक पद्धत वापरली पाहिजे, अशी आमची सूचना होती. यामधूनच अँड्रिया सिस्टिमचा जन्म झाला.” असे नटराजन यांनी स्पष्ट केले.
“ सुरुवातीचा प्रवास आमच्यासाठी खडतर होता. सार्वजनिक क्षेत्रातल्या कामापासून वेगळं होऊन आम्ही काम सुरु केले होते. बदललेल्या परिस्थितीमध्यॆ सरकारशी व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हा खरोखरच शाश्वत मार्ग नव्हता. आरोग्यसेवा किंवा व्यावसायिक शिक्षण देण्याऐवजी आम्ही अल्प पतपुरवठा करणारी संस्था काढायला हवी होती. भारतीय बाजारपेठ नव्या कल्पनांना सहजासहजी स्विकारत नाही. त्यांचा सुरुवातीचा प्रवास हा एकाकीच असतो. मुख्य बाजारपेठेच्या प्रवाहात आमचा प्रवेश उशीरा होत होता. ई कॉमर्स वगळता अन्य कोणत्याही उत्पादकांना सुरुवातीला या सर्व अडचणींना सामोरे जावे लागते,” असे नटराजन यांनी सांगितले.
नटराजन यांची टीम मध्यम प्रकारच्या शैक्षणिक संस्थांसोबत काम करत होती. या संस्थांना स्मार्ट हजेरी तंत्रज्ञान ही टीम पुरवत असे. या मशिनमध्ये विद्यार्थ्यांच्या चेह-याची नोंद होऊन हजेरीची नोंद केली जाते. पण समाजात मोठा प्रभाव पाडू शकणा-या संस्थेसोबत काम करणे हा अँड्रियाचा मुख्य उद्देश होता. एखादी समस्या योग्य प्रकारे सोडवण्याचे तंत्रज्ञान आम्हाला विकसित करायचे होते, असे नटराजन सांगतात.
आरोग्य क्षेत्रासाठीचे उत्पादन तयार करणे ही त्यांच्यासमोर समस्या होती. आरोग्य क्षेत्रामध्ये बराच स्कोप आहे, हे या क्षेत्रातील तज्ज्ञांची चर्चा केल्यानंतर नटारजन यांना जाणवले. “ या क्षेत्रातील जवळ जवळ ७० टक्के वस्तूंची आपण आयात करत होतो. आरोग्य क्षेत्राची मागणी मोठी होती. परंतु ही मागणी पूर्ण करण्यासाठी दुर्दैवाने कोणतीही स्थानिक व्यवस्था नव्हती. आरोग्य क्षेत्रातील उत्पादने तयार करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील कौशल्यांचे एकत्रिकरण आवश्यक आहे. कोणतेही आरोग्य उत्पादन तयार करण्यासाठी विज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्यामुळेच नवा व्यावसायिक या क्षेत्रात सहजासहजी वळत नाही. भारतामध्ये तर हा उद्योग नव्या व्यावसायिकांसाठी अधिक आव्हानात्मक आहे. या क्षेत्रामध्ये सहजासहजी प्रवेश मिळवता येत नाही. पण तुम्ही जर सुरुवातीचे अडथळे पार केले, तर या क्षेत्रात मोठी संधी आहे,” असे नटाजन म्हणाले.
“ गर्भाशयाच्या कॅन्सरसंबंधीचे योग्य तंत्रज्ञान शोधण्याची संधी आम्हाला सुरुवातीला मिळाली. भारतामध्ये या कॅन्सरचे प्रमाण मोठे आहे. अनेक महिलांना याबाबतचे योग्य उपचार मिळत नाहीत. अशा रुग्णांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहचवण्याचा आम्ही विचार केला. या तंत्रज्ञानामुळे उपचाराच्यावेळीच त्यांना रोगाचे निदान समजू शकेल. भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा चेहराच या तंत्रज्ञानामुळे बदलणार होता,” असे नटराजन यांनी सांगितले.
बिगर बँकिंग वित्त संस्थांनाही आम्ही सेवा पुरविली. कमी किमतीचे स्मार्ट फोन वापरणा-या कर्मचा-यांचे ऑन फिल्ड लोकेशन तपासण्याचे काम आमच्या तंत्रज्ञानामुळे करता येते. त्यामुळे तो कर्मचारी किती काम करतो हे समजू शकते. अनेक व्यावसायिक संस्थांना त्यांच्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठीचे आवश्यक तंत्रज्ञानही अँड्रिया सिस्टिम पुरवते.
“ आजही सरकारच्या मदतीशिवाय समाजातल्या मोठ्या वर्गावर परिणाम करणे अवघड आहे... आणि ही मोठी अडथळ्यांची शर्यत आहे,” असे नटराज नाखुशीने सांगतात. “ एखाद्या उद्योगाचे उत्पादन आणि सेवा याबाबत सरकारचा बघण्याचा दृष्टिकोण अजब आहे. नव्या उद्योजकांसाठी तर तो अजिबात उपयोगी नाही,” असे नटराजन यांनी स्पष्ट केले. एखाद्या उद्योजकाशी व्यवहार करण्याची सरकारची एक साचेबद्ध पद्धत आहे. त्या उद्योजकाचा इतिहास, या व्यवहारातून उद्योजकांना होणारा फायदा याचा सरकारी पातळीवर अगदी पारंपरिक पद्धतीने विचार होतो. दुस-या बाजूला नोकरशाहीच्या अडथळ्यामुळे कामाचा मोबदलाही वेळेवर मिळत नाही. या सर्व व्यवहारामधून होणा-या तोट्याची जाणीव सरकारला होणे आवश्यक आहे. ही जाणीव होईपर्यंत नव्या उद्योजकांना सरकारसोबत व्यवसाय करणे फारसे फायद्याचे ठरणार नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारने आपली कामाची पद्धत सोपी करण्याची गरज आहे. नव्या उद्योजकांकडेही समर्थ पर्याय म्हणून सरकारने पाहायला हवे, असे नटराजन सुचवतात.
“ टेलीमेडिसीन आणि टेक्सटाईल या दोन क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानावर सध्या आमची कंपनी काम करत आहे. आम्ही रुग्णांना दूरच्या डॉक्टरांपर्यंत पोहचण्यासाठी एक प्रमाण पद्धत तयार करत आहोत. या तंत्रज्ञानामुळे आपण ज्या डॉक्टरची फिस भरली तेच डॉक्टर आपला रिपोर्ट तपासत आहेत, हे पेशंटला घरबसल्या समजू शकेल. डॉक्टराने रिपोर्टवर स्वाक्षरी करतानाचा फोटो आमच्या तंत्रज्ञानामुळे काढणे शक्य होईल,” असे नटराजन म्हणाले.
टेक्सटाईल क्षेत्रात बंगळुरुमधल्या एका उत्पादकाच्या सहकार्याने या क्षेत्रासाठी योग्य रोबो बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. वेगवेगळे इनपुटचा योग्य अर्थ लावणे यामुळे मशीनला शक्य होईल, ( सध्या इनपूट आणि आऊटपूटच्या विषयात अँसेब्ली लाईन सारख्या मार्गाचा वापर होतो. )
“ देशात अँड्रिया सिस्टिमच्या उत्पादनांची अजून पूर्णपणे माहिती पोहचलेली नाही. ही नटराजन यांच्यासमोरची मुख्य अडचण आहे. या तंत्रज्ञानाच्या गुंतवणुकीसाठी लागणारा पैसा आणि त्यामधून मिळणारा परतावा पाहता हे तंत्रज्ञान सहज स्विकारण्यास अनेक उद्योजक सहजासहजी तयार होत नाहीत. संगणकाच्या किंमती स्वस्त होत आहेत. तसेच या क्षेत्रातल्या विकासाबरोबरच यामध्ये संशोधनही मोठ्या प्रमाणावर होतंय. त्याचा फायदा आमच्या उत्पादनाला होईल,” अशी आशा नटराजन यांनी व्यक्त केली.
“ आमची उत्पादने सामान्य माणसांसाठी नाहीत. पण आता आम्ही यात बदल करतोय. सध्या या बदलाच्या दिशेने छोटं पाऊल टाकलं आहे. पण हे छोटे पाऊलही आमच्या व्यवसायाची दिश बदलणारे असेल,” असे नटराजन यांनी शेवटी सांगितले.