इग्नू अभ्यासकेंद्र, अमरावती च्या विद्यार्थीनीची 'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र' साठी निवड!

इग्नू अभ्यासकेंद्र, अमरावती च्या विद्यार्थीनीची 'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र' साठी निवड!

Tuesday May 02, 2017,

2 min Read

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्लीच्या अमरावती येथील अभ्यास केंद्राअंतर्गत प्रवेशित एम.ए. राज्यशास्त्र अभ्यासक्रमाची विद्यार्थीनी कु.संस्कृती देशपांडे यांची ट्रॉन्सफॉर्म महाराष्ट्रसाठी निवड झाली आहे. अमरावती येथील इग्नो अभ्यासकेंद्रासाठी ही गौरवाची बाब असून ही पहिली वेळ आहे, स्थानिक विद्यार्थ्यांनी १ मे महाराष्ट्र दिनी मुंबईमधील वरळीमध्ये असलेल्या एनएससीआय स्टेडियमवर आयोजित एका विशेष कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर महाराष्ट्राच्या विकासाबद्दल आपल्या कल्पना मांडल्या. त्यावर कार्यवाहीसाठी त्या कार्यक्रमामध्ये अनेक प्रशासनिक अधिकारी, मंत्री, विशेषज्ञ उपस्थित होते. मुख्यमंत्री विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ आणि औद्योगिक विकासामधील विशेषज्ञ ह्रांच्याशी विचार मंथन करून महाराष्ट्र विकासासाठी नवीन रोडमॅप सादर करण्यात आला. विकासाचा जणू नवीन अध्याय सुरू झाला.


image


अतिशय भव्य दिव्य पद्धतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी एनएससीआय परिसरात १ मे रोजी शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्टॉल्सद्वारे राज्यातील विकासासाठी सर्जनशील आणि अभिनव संकल्पनांवर आधारित प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनामध्ये बदलणा¬या महाराष्ट्रातील विकासाच्या नवीन संकल्पना व महाराष्ट्राच्या आगामी विकासाची रूपरेषा प्रस्तुत करण्यात आल्या.

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये २०१६ मध्ये सुरू केलेल्या ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र कार्यक्रमाचा समापन सोहळा म्हणून होत असलेल्या व २०२५ मधील महाराष्ट्रातील विकासाचे दर्शन घडवणा¬या ह्रा कार्यक्रमासाठी राज्यातील जवळ जवळ सर्व जिल्ह्रांमधील विविध महाविद्यालयातील दहा हजार विद्यार्थी आले होते. त्यांच्या संकल्पनांच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या आगामी रूपरेषेवर भाष्य केले. विकासाच्या ह्रा नवीन संकल्पनेला राज्यातील विकासातील विविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आव्हानांवर मात करण्यासाठी राज्यभरातील महाविद्यालयीन विद्याथ्र्यांच्या सूचना आमंत्रित करण्यात आल्या होत्या. त्याची सुरूवात डिसेंबर २०१६ मध्ये मुख्यमंत्र्यांनी आयआयटी पवई, येथून केली होती. महाराष्ट्राच्या विकासामध्ये अनुकूल परिस्थितीचा लाभ घेऊन धोरणात्मक नियोजनांमध्ये युवांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्याचे अभिनव साधन म्हणून ट्रान्सफॉर्म महाराष्ट्राला लक्षणीय यश मिळाले आहे. ह्रा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील ११,५०० विद्याथ्र्यांनी विकासाच्या नवीन वाटचालीसाठी आपल्या विशेष संकल्पना सादर केल्या आहेत. त्यापैकी सुमारे शंभर पेक्षा अधिक जास्त महत्त्वपूर्ण व विशिष्ट असे विचार/ संकल्पना कार्यक्रम स्थळी स्टॉलवर प्रत्यक्ष बघता येतील.

संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक पातळीवर चालवण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र कार्यक्रमाद्वारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील युवांमध्ये आजवरचे सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत. महाराष्ट्राच्या विकासामध्ये युवा वर्गाच्या सहभागाला अधोरेखित करणा¬या ह्रा कार्यक्रमाची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कु.संस्कृती देशपांड़े यांचे समन्वयक डॉ.एस.डी. कतोरे ह्रांनी कौतुक केले आहे.

    Share on
    close