Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
ADVERTISEMENT
Advertise with us

आता मनाजोगं फर्निचर भाड्याने घ्या, वापरा आणि गरज संपल्यास परत करा.. क्लिक करा 'जस्ट ऑन रेंट डॉट कॉम'वर

आता मनाजोगं फर्निचर भाड्याने घ्या, वापरा आणि गरज संपल्यास परत करा.. क्लिक करा  'जस्ट ऑन रेंट डॉट कॉम'वर

Wednesday February 24, 2016 , 3 min Read


नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणाच्या निमित्ताने एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा जागेत स्थलांतरित होणे मोठे जिकरीचे काम असते. राहण्यासाठी आपल्याला परवडणाऱ्या भाड्यामध्ये मनाजोगे घर, परिसर शोधणे आणि मग सामानाची बांधाबांध करणे म्हणजे तारेवरची कसरतच. एवढे करूनही घरात हवे तसे फर्निचर उपलब्ध करणे शक्य नसते. कारण स्थलांतर करताना महागड्या फर्निचरचे नुकसान होण्याची शक्यता असते, तसेच जास्त सामान वारंवार स्थलांतरित करणे शक्य होत नाही. या समस्येचे समाधान शोधले आहे 'जस्ट ऑन रेंट डॉट कॉम'ने. आता आपल्याला हवं तसं कुठलही फर्निचर आपण भाड्यानं घेऊ शकतो आणि आपली गरज संपली की पुन्हा परतही करू शकतो. ही गोष्ट आहे जस्ट ऑन रेंट डॉट कॉमची ज्याची सुरुवात पुण्यात झाली. जस्टऑन रेंट डॉट कॉमचे संस्थापक राहुल मनेरीकर यांनाही काही अश्याच समस्यांना तोंड द्यावं लागलं. हेच लक्षात घेऊन त्यांनी ऑगस्ट २०१५ मध्ये जस्ट ऑन रेंट डॉट कॉमची सुरुवात केली.


image


युवर स्टोरीशी बोलताना राहुल यांनी सांगितलं की, मी कोलकत्यातल्या एका कंपनीत काम करत होतो. एका भाड्याच्या घरात राहत होतो. जिथं मी गरजेनुसार थोडं फर्निचर घेतलं होतं. पण त्यानंतर माझी बदली मुंबईला झाली. सहाजिकच हे सर्व फर्निचर मी मुंबईला घेऊन जाऊ शकत नव्हतो. मग मला हे सर्व अगदी कवडीभावात विकावं लागलं. हे फक्त माझ्याबरोबरच नव्हे तर माझ्या इतर मित्रांचा अनुभवही असाच होता. आम्ही विचार करत होतो की अशी सर्विस असायला हवी जिथं हे फर्निचर भाड्यानं घेता येईल, ते ही अगदी कमी पैश्यात. वारंवार फर्निचर विकत घेण्याच्या आणि नंतर त्या विकण्याच्या भानगडीतून कायमची सुटका होईल. शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी इथं तिथं फिरणाऱ्या लोकांसाठी मोठी मदत होईल. यातूनच ऑन रेंट डॉट कॉम या स्टार्टअपची सुरुवात झाली. 

image


राहुलला सुरुवातीपासूनच उद्योजक बनायचं होतं. पण मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला असल्यानं असलेली नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय़ तसा कठीण होता. नोकरी सोडणं आणि उद्योजक बनणं म्हणजे महिन्याला येणाऱ्या चांगल्या पगाराला लाथ मारणं आणि बेभरवश्याचा व्यवसायात स्वत:हून उडी घेणं. काही जवळच्या मित्रांच्या मदतीनं त्यानं जस्ट ऑन रेंट डॉट कॉमची सुरुवात केली. यात सर्वात जास्त मदत झाली ती त्याच्या पत्नीची. ती नोकरीही करायची आणि राहुलला त्याच्या व्यवसायात मदतही. राहुलचा हा सर्व व्यवसाय सेल्फ फंडेड म्हणजे स्वत:च्या पैश्यातून उभारलेला आहे., मित्रांनी मदत केलीय. राहुल इंजिनियर आहे. त्यानंतर त्यानं एमबीए केलं. सध्या सेल्स, मार्केटींग, ऑपरेशन्स सर्वकाही तो स्वत:च सांभाळतो. तो इ-कॉमर्सला धन्यवाद देऊ इच्छितो ज्यामुळे कमी पैश्यात स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची संधी त्याला मिळाली. सध्या जस्ट ऑन रेंट डॉट कॉम फक्त पुण्यात कार्यरत आहे. पण चांगला ग्राहकवर्ग आणि स्वस्तदरात भाड्यानं मिळणारं फर्निचर याच्या मौखिक प्रसिध्दीमुळं त्याला चांगलाच फायदा झाला आहे. आगामी काळात तो संपूर्ण देशात जस्ट ऑन रेंट डॉट कॉमचा विस्तार करणार आहे.

image


राहुल सांगतो, व्यवसायाच्या विस्ताराकरिता निधी उपलब्ध होण्यासाठी आमची बोलणी सुरु आहेत. येणाऱ्या काही महिन्यात आम्ही पुण्याव्यतिरिक्त इतर शहरांमध्येही आपली सेवा सुरु करु. अपेक्षित निधी उपलब्ध झाल्यास व्यवस्थापनाच्या तांत्रिक बाबी, वितरण अधिक चांगल्या प्रकारे करणे शक्य होईल. सध्या आम्ही फक्त घरी लागणारं किरकोळ फर्निचर भाड्यानं देतो. पण लवकरच ऑफिस फर्निचर, एडवेंचर गियर, लॉन्ग डिस्टेंस कैब्स आणि अन्य घरेलू वापरासाठीच्या गोष्टी भाड्यानं देण्याची योजना आहे.


image


राहुल म्हणतो, वस्तू भाड्यानं देणं ही जागतिक स्तरावरची प्रथा आहे. आता ती भारतात जास्त वाढतेय. सध्या त्याला आपली टीम वाढवायची आहे. जी त्यांच्या कल्पनेतल्या व्यवसायाला मुर्त स्वरुप देईल. यासाठी तो मेहनत घेतोय. ज्यांना घरापासून दूर राहून दुसरीकडे आपला संसार थाटावा लागतो त्याचं आयुष्य थोडसं सुखकारक बनवण्याचा राहुल यांचा हा प्रयत्न आहे. मग काय म्हणता.. करा क्लिक... जस्ट ऑन रेंट डॉट कॉमवर..

आणखी काही स्टार्टअप्स संबंधित कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

स्ट्रीट फॅशनला ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देणारे 'स्ट्रीटबाजार.इन'

पर्सनलाईज्ड गिफ्टिंगकरिता एक उत्तम पर्याय '6ixi Arts'

ई-ग्राहकांसाठी ‘शिपवे’ची ‘ट्रॅकिंग सिस्टिम’ म्हणजे वरदान