महिलांना आरोग्य संपन्न बनवण्यासाठी झटणा-या डॉक्टर मंजूला
प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ, लेप्रोस्कोपिक सर्जरी या विषयातल्या अग्रेसर डॉक्टर आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित झालेल्या डॉ. मंजूला अनगानी यांना लहान वयातच ज्ञानाचे महत्व कळले होते. चार भावंडांमध्ये एक असलेल्या मंजूला स्वत:ला जन्मत:च बंडखोर समजतात. अभ्यासापेक्षा अन्य गोष्टींमध्ये मला रस होता,असे मंजूला सांगतात.
“ मी टॉमबॉयसारखी होते. मुलांना आव्हान देणे, खेळण्यासाठी भांडण करणे, झाडावर चढणे या सारख्या गोष्टी करत असे. माझा जास्तीत जास्त वेळ घराबाहेर खेळण्यातच जायचा. पण माझ्यातल्या जिज्ञासू वृत्तीमुळे मी चिकित्सा करु लागले. आपण विचार कसा करु शकतो ? बोलू कसे शकतो ? या सारखे अनेक प्रश्न माझ्या मनात गर्दी करत. या सर्व विषयाचं उत्तर केवळ मेडिकल क्षेत्रामध्येच मिळतील हे मला जाणवलं.’’ असे डॉ. मंजूला यांनी सांगितलं.
डॉ. मंजूला सांगतात, “ मेडिकल आणि विज्ञान विषयातल्या नोबेल पुरस्कार विजेत्या व्यक्तींबद्दल वाचल्यानंतर आपणही असंच काही तरी केलं पाहिजे असं मला तीव्रपणे वाटत असे. मला काही तरी नवं करायचं होतं, ज्यामुळे समाजाचे भले होईल. त्यावेळी मी मेडिकल क्षेत्रामध्येच काम करणार हे निश्चित केलं ’’
ईएमसीईटी परिक्षेत ५८ वा क्रमांक आल्यानंतर मंजूला यांनी गांधी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि अभ्यासास सुरुवात केली. शिक्षण घेत असताना आपली गोडी शरीर रचना विज्ञान ( एनाटॉमी ) क्षेत्रात असल्याचं त्यांना जाणवलं. त्यांनी सर्जन होण्याचं निश्चित केलं. पण इंटर्नशिप संपता संपता मंजूला यांची स्त्रीरोग तज्ज्ञ होण्याची इच्छा प्रबळ झाली. “ महिला सर्जन होऊन समाजासाठी फार काही करु शकणार नाही, हे माझ्या लक्षात आलं. मी बहुतेक वेळ रिकामी बसेन किंवा दुस-या डॉक्टरने पाठवलेल्या रुग्णांवर उपचार करेन. त्यापेक्षा स्त्री रोग तज्ज्ञ होऊन जास्तीत जास्त रुग्णांची सेवा करण्याचा पर्याय मी निवडला.”
मंजूला यांना काही चांगले शिक्षक मिळाले. त्यामुळे त्यांचा मजबूत आणि ठोस पाया तयार झाला. त्यानंतर मंजूळा यांनी खासगी प्रॅक्टीस सुरु केली. अधिक जोखमीच्या गर्भवती महिलांचा उपचार करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केलं. त्याचवेळी उपचाराची पद्धती चांगली करण्यावरही मंजूला यांचा भर असे. अनेक महिलांना गर्भाशयाची पिशवी काढून टाकावी लागते, हे त्यांच्या लक्षात आलं. बहुतेकांना याची गरज नसते, असं त्या सांगतात. महिलांना कमीत कमी त्रास कसा होईल याची काळजी त्या घेऊ लागल्या.
“ मी काम सुरु केलं त्यावेळी इनवेसिव सर्जरी प्राथमिक अवस्थेमध्ये होते. या क्षेत्रामध्ये पुरुषांचे संपूर्ण वर्चस्व होते. यामध्ये प्रयोगासाठी वापरण्यात येणारी सारी यंत्रणाही पुरुषांसाठी अनुकूल अशीच होती. महिलांचे कष्ट वाचावे अशा यंत्रणांवर संशोधन करण्याची त्यावेळी अत्यंत आवश्यकता होती.” असे डॉ. मंजूला यांनी सांगितले.
त्यावेळी अनेक रुग्णालयं महागड्या वस्तूंमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार नव्हती. जुन्या यंत्रणांवरच काम करण्याचा त्यांचा कल होता. मेडिकल वस्तूंमध्ये गुंतवणुकीला सुरुवात होण्याचा तो काळ होता. त्याचवेळी मंजूला यांनी या विषयात तांत्रिक सुधारणा करण्यासाठी मदत करणा-या यंत्रांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.
“ गायनकॉलॉजी आणि प्रसूती विज्ञान म्हणजेच हिस्रेकटॉमी यांच्यापेक्षा काही दुसरं असू शकतं हे अनेकांना समजवणचं मोठं अवघड काम होतं. हे सिद्ध करण्यासाठी मला महिलांच्या इनेसिव सर्जरीच्या प्रक्रियेचा मोठ्या नेटानं प्रचार करावा लागला, इतरांचा याबाबत विश्वास मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला ”, असे डॉ. मंजूला यांनी सांगितले.
“ आता या गोष्टींमध्ये पहिल्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. रुग्णांच्या मृत्यूदराचे प्रमाण मर्यादीत ठेवण्यासाठी इनेसिव सर्जरीची आवश्यकता असते. या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवण्याचं माझ्यापुढे मोठं आव्हान होतं”, असे डॉ. मंजूला यांनी स्पष्ट केले.
लॅप्रोस्कोपी क्षेत्रामध्ये डॉ. मंजूला यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी दहा हजारांपेक्षा जास्त यशस्वी लॅप्रोस्कॉपी सर्जरी केल्या आहेत. “ या क्षेत्रामध्ये अजुनही बराच पल्ला गाठणं आवश्यक आहे, असे त्या सांगतात. लॅप्रोस्क़ॉपीच्या सुरुवातीला अत्यंत धोकादायक आणि जवळपास न दिसणारी एक प्रक्रिया करावी लागते. हे काम अतिशय आव्हानात्मक आणि शक्तीचं असतं ” याची आठवण त्या करुन देतात.
आम्ही कमी शक्तीची, सुरक्षित आणि सोपी पद्धती विकसीत केली. ही पद्धत डॉक्टरांसाठी अतिशय उपयोगी होती. त्याचप्रमाणे महिला सर्जनांचा विचार करुनही त्यांना सोयीची जाईल अशी पद्धत बनवली, असे डॉ. मंजूला यांनी सांगितले.
एक महिला म्हणून या क्षेत्रामध्ये आलेल्या अडचणींचा अनुभव सांगताना त्या म्हणतात, “ कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करताना महिलेला पुरुषांच्या तुलनेत स्वत:ला अधिक सिद्ध करावं लागतं. तरीही आयुष्याबद्दलचा आपला दृष्टीकोन आपल्याला भरारी मारण्यासाठी उपयोगी पडतो याचा मला विश्वास आहे. याच वृत्तीमुळेच मी सर्व पूर्वग्रहांना पार करु शकले.”
त्या पुढे सांगतात, “नव्या विचारांचा प्रसार नेहमीच आव्हानात्मक असतो. कारण आपला समाज नवे विचार सहजासहजीस्वीकारत नाही, बदलासाठी तयार होत नाही. अशा वेळी कठीण परिस्थितीमध्ये आपण अगदी असाह्य असल्याची भावना तयार होते. माझा एखादा रुग्ण अत्यंत नाजूक परिस्थितीमध्ये असेल, आणि त्यावेळी प्रयत्नांची शर्थ करुनही त्याचे आयुष्य वाचवता आले नाही, तर मला हतबल झाल्यासारखं वाटतं,” असे डॉ. मंजूला यांनी सांगितले.
डॉ. मंजूला यांनी समांथा, आणि शशी मंदा यांच्यासोबत 'सुयोशा आणि प्रत्यशा सपोर्ट' संस्थेचीही स्थापना केलीय. ही संस्था महिलांमध्ये आरोग्याबाबत जागृती करणे तसंच त्यांच्या आरोग्याच्या अडचणी सोडवण्याचं काम करते.त्याचबरोबर ही संस्था नवजात अर्भकाच्या मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठीही आवश्यक ती आर्थिक मदतही देते.
“भारतीय महिला स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतात.पण कुटुंबाचा त्या मुख्य आधार आहेत, हे त्यांनी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे.त्या निरोगी राहिल्या तरच संपूर्ण कुटुंब निरोगी राहील. त्या आजारी पडल्या तर सर्व घर आजारी असेल. सर्व प्रकारचे घरगुती उपचार संपल्यानंतरच अनेक महिला आमच्याकडे येतात ”, असे डॉ. मंजूला यांनी स्पष्ट केले.
थोडीशी खबरदारी घेतली तरी अनेक महिलांचे आजार दूर करता येतात. याबाबत काही टिप्स त्यांनी दिल्या आहेत.
• आवर्तक मुत्र संक्रमणामुळे महिलांना किडनीचा आजार होतो. यासाठी काही साधे उपाय आहेत. योग्य प्रमाणात पाणी प्यावे, लघवी फार काळ अडवू नये, किंवा जबरदस्तीनंही करु नये. तसंच शारिरीक संबंधांच्या पूर्वी आणि नंतर लघवीला जाणं टाळावं
• डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच लस घ्यावी. गर्भाशय ग्रीवा तसंच कॅन्सरपासून वाचण्यासाठी एचपीवीचं इंजेक्शन अवश्य घ्यावी
• अनावश्यक गर्भाधारणा आणि गर्भपातापासून वाचण्यासाठी कमी शक्तीच्या गर्भनिरोधकाचा प्रयोग करावा
• यौन संक्रमित रोग टाळण्यासाठी गर्भनिरोधकांचा वापर करावा
• स्त्रीरोग तज्ज्ञाकडून नियमीत तपासणी करावी
• मॅमोग्राम्स, टीसीएच, अल्ट्रासाऊंड, बोन मिनरल डेंसिटी (Bone mineral density) सल्ल्यानुसार करावी. त्यामुळे कोणत्याही आजाराची तीव्रता समजू शकेल.तसंच त्या आजाराचे कॅन्सरमध्येही रुपांतर होणार नाही.
• हॉर्मोनची कमतरता हार्मोनमुळेच दूर होऊ शकते. याबाबतची भिती काढून टाकावी. डॉक्टरांच्या मदतीनं भविष्यातली गुंतागुंत टाळली जाऊ शकते.
• आपला उपचार स्वत: करु नये. त्यासाठी गुगल सर्च करण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सवय लावावी.
"आपल्याला आयुष्यात आई-वडिल तसंच शिक्षकांबरोबरच रुग्णांनीही प्रगती करण्यासाठी प्रेरणा दिली", असे डॉ. मंजूला सांगतात. त्यांनी अनेक समस्या असूनही आई होण्याचा घेतलेला निर्णय, सामान्य रुग्णालयाचे इनेसिव सर्जरीवर उपचार करणाऱ्या मोठ्या रुग्णालयात रुपांतर करणे आणि तिसरे म्हणजे रुग्णांच्या उपचारासाठी अतिधोकादायक प्रसुतीचे घेतलेले शिक्षण.या तीन गोष्टी आयुष्यामध्ये निर्णायक ठरल्या, असे डॉ. मंजूला यांनी स्पष्ट केले.
डॉ. मंजूला शेवटी सांगतात, “ माझ्या निर्णयाचा नेहमीच आदर करणा-या परिवारात माझं लग्न झालं, याबाबत मी स्व:ला भाग्यवान समजते. माझे पती के. सुरेश आणि सध्या शिक्षण घेत असलेली माझी मुलगी श्रृजिता यांनी नेहमी माझ्या व्यस्त वेळापत्रकाला समजून घेतलं. मला सोयीचं जाईल असं स्वत:चं वेळापत्रक बनवलं. त्यांच्याकडून आणखी कोणतीही अपेक्षा मला नाही.”