Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
ADVERTISEMENT
Advertise with us

सर्व काही छंदासाठी... हॉबीगिरी डॉट कॉम एक अनोखा उपक्रम

सर्व काही छंदासाठी... हॉबीगिरी डॉट कॉम एक अनोखा उपक्रम

Friday June 24, 2016 , 4 min Read

आपल्यापैकी प्रत्येकाला कुठला ना कुठला छंद असतोच. आवडी निवडी असतात. नवं घडवण्याची उर्मी असते. ज्या गोष्टी करायला आवडतात त्यात नवनवीन प्रयोग करायचे असतात. त्यातून आपण घडतो. आपलं व्यक्तीमत्व घडत असतं. एखादा छंद जोपासला की तो आपल्या आयुष्याचा भाग बनून जातो. मग तो छोटा छंद आहे की मोठं काहीतरी याकडे आपण लक्ष देत नाही. ते सर्व करण्यातच आपला आनंद असतो. या आनंदाची तोड कश्यालाच नसते. तो आपला असतो, ती गोष्ट करण्यात असतो. एखादा आपल्या लहानपणापासून आपला छंद जोपासत असतो. काहींना तरुणपणी तर अनेकांना अगदी वृध्दापकाळात या छंदाचं वेड लागतं आणि मग त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. अश्या असंख्य लोकांसाठी त्यांचा छंद जोपायासला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व पुरवण्यासाठी वसईच्या विनय निहलानी या तरुणानं एक ई-कॉमर्स वेबसाईट सुरु केलीय. हॉबीगिरी डॉट कॉम. अगदी सायकलिंगपांसून ते गिर्यारोहणापर्यंत सर्व काही या हॉबीगिरी डॉट कॉमवर उपलब्ध आहेत.

image


“आजच्या धकाधकीच्या दिवसात आपण जो छंद जोपासालाय त्यासाठी वेळ काढायला आणि त्यासाठी लागणारं साहित्य घ्यायलाही अनेकांकडे वेळ नसतो. दुकानांमध्ये या अनेक गोष्टी मिळत नाही. त्यामुळं साहजिकच आजच्या इ कॉमर्सच्या जगात पावलं वळतात वेगवेगळ्या वेबसाईटकडे, मग ते अमॅझोन असो किंवा मग फ्लीपकार्ट. पण या आणि इतर इकॉमर्स वेबसाईटमध्ये आपल्याला ज्या गोष्टी हव्यात त्या मिळतच नाहीत. अनेकदा आपल्या आवडत्या छंदांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी नसतात. त्यांचे सेलर नसतात त्यामुळं निराश व्हायला होतं. माझ्या फोटोग्राफीच्या छंदांबाबत असंच झालं. मग विचार केला की अशी एखादी वेबसाईट बनवावी जिथं प्रत्येक छंदासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी मिळतील. त्यातूनच गेल्या वर्षी मार्च महिन्यात ह़ॉबीगिरी डॉटकॉम सुरुवात झाली. ह़ॉबीगिरी डॉट कॉमला मिळणारा प्रतिसाद फार उत्तम आहे.” विनय निहलानी आपल्या या वेबसाईटची कल्पना कशी सुचली याबद्दल सांगत होता. 

image


विनय निहलानी मॅनेजमेन्टचा विद्यार्थी होता. त्यानं मार्केटींगमध्ये एमबीए केलं. त्यानंतर काही कंपन्यांमध्ये काम केलं खरं पण त्यात त्याचं मन रमलं नाही. घरी सर्व वातावरण बिजनेसचं, नोकरी करण्यापेक्षा एखादा व्यवसाय करण्यावर घरच्यांचा भर. त्यामुळं तो व्यवसायाची संधी शोधत होता. शिवाय त्याचा एक छंद होता फोटोग्राफीचा. शाळेत असल्यापासून त्याला फोटोग्राफीची आवड होती. त्यानं फोटोग्राफीचं जुजबी प्रशिक्षण ही घेतलं. छंद म्हणून फोटोग्राफी सुरु होती पण त्याचा व्यवसाय म्हणूनही विस्तार करायाचा त्याच्या मनानं घेतलं. पण या व्यवसायात स्पर्धा फार होती. फोटोग्राफी करता करता विनयच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे फोटोग्राफीसाठी लागणारं साहित्य विकायची. त्यासाठी साहित्य विकत घेणारे ग्राहक आणि साहित्य विकणारे व्यापारी यांना एका व्यासपीठावर आणायचं ठरवलं. आणि मग काही दिवसांनी सुरु झाली एक वेबसाईट जिचं नाव होतं फोटोगिरी डॉट कॉम. या बेवसाईटवर त्यानं फोटोग्राफीसाठी लागणारं सर्व साहित्य इकॉमर्सच्या माध्यमातून विकायला सुरुवात केली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अगदी दीड महिन्यात त्यानं फोटोग्राफीला लागणारे हजारो रुपयाचे साहित्य विकले.

image


“ फोटोगिरी डॉट कॉमला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर इतर छंदांसाठी काही करता येईल अशी चौकशी यायला लागली. त्यातून मग हॉबीगिरी डॉट कॉम सुरु करायचं ठरलं. त्यासाठी मी अगोदर नक्की कुठल्या-कुठल्या गोष्टी वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवता येतील याची यादी केली. अगोदर ती फक्त १० च्या आसपास होती. पण जसजसे दिवस गेले तस तशी ही यादी चांगलीच वाढली आणि मग ५०-६० छंदासाठी लागणारे साहित्य हॉबीगिरी डॉटकॉमवर विक्रीसाठी उपलब्ध झाले.” विनय बेवसाईटच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगत होता.

हॉबीगिरी डॉट कॉंम वेगवेगळे छंद जोपासणाऱ्यांसाठी एक पर्वणी आहे. फोटोग्राफी, फुटबॉल, क्राफटींग, क्रिकेट, नृत्यापासून ते अगदी डेटींगपर्यंत. तुमचे जे काही छंद आहेत त्यासाठी लागणारं साहित्य हॉबीगिरी वर उपलब्ध आहे. एका प्रोडक्टचे वेगवेगळे पर्यायही तिथं आहेत. म्हणजे आपल्या बजेटला अनुसरून छंदाशी निगडीत साहित्य इथं मिळतं हे विशेष. 

image


“हॉबीगिरी डॉट कॉममध्ये आम्ही तुमच्या छंदासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी विकायला ठेवल्या आहेत. ग्राहक आणि व्यापाऱ्यांना आम्ही एकत्र आणतो. त्यांचा संवादही आमच्या मार्फत होतो. त्यामुळं ग्राहकाला नक्की काय हवंय हे व्यापाऱ्याला समजतं. त्याच्या आवडीनुसार आणि त्याच्या बजेट नुसार ते साहित्य उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून आमच्या वेबसाईटवर येणाऱ्या युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतेय.” विनय वेबसाईटच्या कार्यपध्दतीबद्दल सांगत होता. “ आम्ही वेबसाईटवर बेस्ट फाईव्ह डिलही उपलब्ध करुन दिलेले आहेत. त्यामध्ये इतर वेबसाईटच्या तुलनेनं आमच्याकडे गोष्टी स्वस्तात मिळतात. अगदी डिजायनवर टीशर्ट पासून ते किचैन आणि ओपनर पर्यंत सर्व काही आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आता परदेशी कंपन्यांचं साहित्यही विकलं जातंय. त्यांचं फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्कींग साईटवरुन प्रमोशन केलं जातं. त्यामुळं खासकरुन विविध छंद जोपासणारे अनेक जण वेबसाईटला भेट देतात. आपल्या आवडत्या गोष्टी खरेदी करतात. आम्हाला अनेक चांगले टेस्टीमोनियल आलेत. हे विशेष.”  

image


आता हॉबीगिरी डॉट कॉमला मिळणारा प्रतिसाद पाहता लवकरच हॉबीगिरी डॉटकॉमचं एप आणण्याचं काम सुरु आहे. विनय़ आणि त्याचा एक मित्र हे वेबसाईटचं काम पाहतात. या एपच्या माध्यमातून आता विक्री करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस या हॉबीगिरी डॉट कॉमवर उत्पादनांची संख्या वाढतेय.

वेबसाईट :http://hobbygiri.com/

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :  

थाटात वावरता येणाऱ्या पारंपारिक साड्या बाजारभावापेक्षा स्वस्तात उपलब्ध झाल्या तर ? जाणून घ्या ‘खूबसारी’ विषयी

व्यवसाय वृद्धीसाठी मागणीनुसार वेबसाईट आणि मोबाईल अॅप सेवा ‘ClickExcel.com’

भारतीय कलासंस्कृतीचा प्रसार परदेशात करण्याचा वसा घेतलेल्या कल्पना नारकर, गल्लीतून सुरु झालेला प्रवास पोचला सातासमुद्रापार