शंभर दिवसांत दहा हजार किमी धावण्याच्या प्रयत्नात केवळ ३६किमी ने मागे राहिले समीर सिंह!
विश्व विक्रम करण्याच्या इच्छेतून त्यांनी जगातील सर्वात मोठी शर्यत पूर्ण केली, त्यांनी शंभर दिवसांत दहा हजार किमी पार करण्याचे उद्दिष्ट ठेवले म्हणजे रोज शंभर किमी.
समीर यांचे हे असामान्य धावण्याचे आव्हान २९ एप्रिल मध्ये सुरू झाले, त्या दिवसांपासून ते आजवर मुंबईच्या रस्त्यांवर रोज १३ त१४ तास धावत होते. प्रकृती अस्वास्थ आणि गंभीर दुखापतीमुळे त्यांना हा विक्रम साकारता आला नसला तरी, मात्र त्यांच्या जबतदस्त महत्वाकांक्षेने देश आणि जगातील लोक आश्चर्यचकीत झाले आहेत. ४२ वर्षांचे समीर रविवार पर्यंत शंभराव्या दिवशी देखील धावत राहिले.
स्वप्न कोण पहात नाही, मात्र ती पूर्ण करण्याची हिंमत खूप कमी लोक दाखवतात. मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील समीर सिंह यांचे देखील असेच झाले. समीर हे अल्ट्रा मॅरेथॉन धावक आहेत, विश्वविक्रम करण्याच्या इच्छेतून त्यांनी सर्वात लांब शर्यत जिंकण्याचा प्रयत्न केला, त्यांनी शंभर दिवसांत दहा हजार किमी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले. म्हणजे रोज शंभर किमी. २९ एप्रिल रोजी याची त्यांनी सुरूवात केली त्या दिवसापासून ते रोज रस्त्यावर १३-१४ तास धावत आहेत, म्हणजे पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांश भाग त्यांनी धावून पूर्ण केला.
मात्र शेवटी त्यांना त्यांच्या विक्रमापासून ३६ किमी दूर रहावे लागले. प्रकृती अस्वास्थ आणि जखमांमुळे त्यांना हा विक्रम साकारता आला नाही. मात्र त्यांच्या या अजब स्वप्नामुळे जगातील लोक हैराण मात्र जरूर झाले. मागील रविवारी शंभराव्या दिवशी देखील ४२ वर्षांचे समीर धावत राहीले मात्र जखमी झाल्याने त्यांना अखेर रुग्णालयात भर्ती करण्यात आले. त्या दिवशी ते केवळ साठ किमीच धावले होते. त्यामुळे त्यांच्या धावण्याच्या गणितात बिघाड झाला आणि शेवटच्या दिवशी म्हणजे ६ऑगस्ट रोजी त्यांना १५० किमी धावायचे होते ते पूर्ण करता आले नाही.
त्या दिवशी समीर सिंह केवळ ११४किमी पूर्ण करू शकले आणि आपल्या नियोजीत उद्दीष्टाच्या केवळ ३६ किमी दूर राहीले. मात्र याचा त्यांना कोणताही पश्चाताप नाही किंवा दु:ख नाही. ते म्हणतात की आता शंभर* शंभर चे आव्हान जगातील कोणत्याही ऍथलीट साठी खुले झाले आहे, आणि कुणीही ते स्विकारून दाखवावे. ते म्हणतात की, असे आव्हान घेणा-या कुणालाही ते मदत करतील. त्यांचे मत आहे की मानवी शरीर वेगळेच यंत्र आहे त्याला हवे तसे चालवता येवू शकते. समीर यांनी जितके अंतर कापले आहे त्यातून काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर तीनदा पार करता येण्या इतके म्हणजे २८५६किमी इतके ते धावले आहेत.
समीर सिंह २०१६ नोव्हेंबर मध्ये मथूरा येथे गेले आणि तेथे त्यांनी त्यांचे अध्यात्मिक गुरू याच्या मार्गदर्शनात सराव केला. ते रोज ७५ किमी धावत होते.
ते म्हणाले की, मी लहानपणापासूनच गावातील मित्रांना त्रास देवून पळत असे तेंव्हा मला कुणी पकडू शकत नसे. तेंव्हा पासूनच मला वाटे की माझा जन्मच धावण्यासाठी झाला आहे . समीर २००४ मध्ये मुंबई मॅरेथॉन मध्ये प्रथम धावले. त्यावेळी त्यांना मॅरेथॉनचा अर्थ सुध्दा माहीत नव्हता. त्यानंतर त्यांना अमेरिकी एथेलीट ट्रांसेडेस यांच्या बाबत माहिती मिळाली जे ५२ दिवसांत ३१०० मैल म्हणजे ४९८८.९ किमी धावत होते. समीर यांनी ठरविले की ते यापेक्षा दुप्पट धावतील.!
समीर सिंह २०१६मध्ये नोव्हेंबर महिन्यात मथुरा येथे गेले आणि तेथे त्यांनी अध्यात्मिक गुरूंच्या सल्ल्याने सराव सुरू केला. ते रोज सकाळी शहराच्या दहा किमी प्रदक्षिणा पूर्ण करत. रोज ७५ किमी ते धावत होते. त्यानंतर समीर यांना वाटले की ते हे उद्दीष्ट पूर्ण करू शकतात तेंव्हा त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. आणि याच वर्षी २९ एप्रिल पासून धावण्यास सुरुवात केली.