ब्रिटीश पबच्या रॉयल टेस्टमागचं मराठी कनेक्शन 'शेफ केदार जोशी'
‘द क्राऊन’... लंडन शहराच्या मध्यवर्ती भागातलं एक गजबजलेलं पब. अल्कोहल आणि मॉर्डन ब्रिटीश कुझीन सर्व्ह करणारं गॅस्ट्रो पब...क्रिसमस-न्यू इअर सिझनला तर इथे जेवण्यासाठी ४,५०० लोकांचं आगाऊ बुकींग असतं, शिवाय बुकींग न करता येणारी मंडळी वेगळीच. या सगळ्यांना 'द क्राऊन'मध्ये यावसं वाटतं ते अर्थातच इथल्या लज्जतदार जेवणामुळे... ब्रिटीश ट्रॅडीशनल फूड फिश ऍन्ड चीप्स असो किंवा विविध पाइज् आणि पुडींग... ‘द क्राऊन’च्या मेन्यू कार्डवरच्या प्रत्येक पदार्थाला देशी-विदेशी खवय्यांची चांगलीच पसंती असते. मात्र या ब्रिटीश पबच्या रॉयल टेस्टमागे दडलयं एक मराठमोळं नावं... केदार जोशी. मूळचा पुण्याचा असलेला केदार गेल्या तीन वर्षांपासून ‘द क्राऊन’ चा हेडशेफ आहे.
कोणत्याही रेस्टॉरंटचं फूड म्हणजे त्या रेस्टॉरंट किंवा पबचा आत्मा असतो. आमच्या पबमध्ये आम्ही फूड आणि अल्कोहल दोन्ही सर्व्ह करतो. कोणत्याही फूड इंडस्ट्रीसाठी फेस्टिव्ह सीझन महत्वाचा असतो. एकतर सणासुदीच्या काळात लोकं जास्त प्रमाणात सोशल होतात, शॉपिंग करतात आणि ऑफकोर्स हॉटेलमध्ये जेवायला जातात. म्हणूनच डिसेंबर महिना आमच्यासाठी खास असतो. अनेक कंपनीज् आपल्या एम्प्लॉईजसाठी पार्टी देतात. शिवाय हॅलोविन, सेंट पॅट्रीक डे, व्हॅलेंटाईन डेसाठी स्पेशल मेन्यू असतो. अनेक जण यावर्षी जेवायला येतात आणि बील देतांना पुढच्या वर्षीच्या डिसेंबरचं बुकींग करुन जातात. शिवाय आमच्या पबपासून मैलभर अंतराच्या आत ट्विकनहॅम रग्बी स्टेडिअम आहे. तिथे मॅचेस् असल्या की आम्हालाही फायदा होतोच. आम्ही ब्रिटीश फूडच्या बरोबरीनचं फ्रेंच, इटालियन फूडही सर्व्ह करतो. तुम्ही केव्हाही या. केदार आणि त्यांची १४ लोकांची टीम खवय्यांना दर्जेदार सेवा देण्सासाठी सज्ज असते. फूडमधली क्लालिटी राखणं हे मोठं आव्हान असतं. त्यासाठी चांगल्या दर्जाचा माल खरेदी करणं, प्रिपरेशन, ऍक्चुअल सर्व्हिस, हेल्थ आणि सेफ्टी रेग्युलेशन्स या सगळ्याकडे लक्ष द्यावं लागतं... कारण किचनमध्ये माझा सगळा स्टाफ सुरी, मोठमोठी यंत्र, गरम ओव्हन्स या सगळ्यांमध्ये काम करतो. त्यामुळे गॅझेट्ची आणि माणसांची सेफ्टी ही आमची फर्स्ट प्रायारीटी असते. त्याशिवाय किचन हायजीन, स्टाफ वेलफेअर- ट्रेनिंग...असा सगळा पसारा केदार यशस्वीपणे सांभाळतो.
लंडन शहरात आणि शहराबाहेर द क्राऊनची सहा पब्स आहेत. आमच्याकडे येणारा ग्राहक हा रिपीट कस्टमर असतो. एकदा तुमच्या पदार्थांची चव लोकांना आवडली की तो तुमच्याकडे नियमीत यायला लागतो. त्यासाठी लोकांच्या आवडीनिवडीचा अभ्यास हवा. युरोप-अमेरिकेत लोकांच्या आयुष्यात हवामान आणि ऋतुंचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही देत असलेल्या पदार्थांमध्ये सिझनल व्हरायटी असेल तर लोकांना ती आवडते. समरमध्ये लोकांना लाईट फूड आवडतं. म्हणून मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारची सलाडस् देतो. हिवाळ्यात बाहेर खूप थंडी असते. अशावेळी हेवी फूड आम्ही सर्व्ह करतो. लोकांनी आपल्या कुटुंबाला घेऊन, दोस्तांना घेऊन यावं, चांगला क्वालिटी टाईम घालवावा, पोटभर गप्पा मारत जेवावं...आणि तृप्त होऊन बाहेर पडावं...परत येण्यासाठी. यासाठी हा सारा अट्टहास.
'michelin pub eat out guide' म्हणजे खवय्यासाठी गुगलचं. या मासिकाची पारायणं केल्याशिवाय अनेक खवय्याची खाबूगिरी पूर्ण होत नाही. या मासिकात द क्राऊन पबला मानाचं स्थान मिळालय. शिवाय ट्रीप अडव्हायझरवरही पहिल्या तीन नंबरात लंडन शहरातल्या या हॉटेलचा नंबर असतोच.
लोकांना नवनवीन पदार्थ करुन खायला घालणं यात मजा आहे. त्यांच्या तृप्ततेत माझं समाधान आहे. पुढे जाऊन मला स्वतःचं रेस्टॉरंट सुरु करायचंय. ब्रिटीश-इंडीयन थीम असलेलं. जिथे मला या दोनही देशांच्या खाद्यसंस्कृतीत प्रयोग करता येतील. कारण भारत काय आणि ब्रिटन काय! अस्सल खवय्याला देशाच्या सीमारेषांची बंधनं नसतात. चांगलं खाणारा आणि चांगलं खिलवणारा भेटला की गरमागरम मैफल जमतेच आणि रंगतेदेखील...