गावांच्या विकासासाठी व्यावसायिक कारकीर्दसोडून २२वर्षाच्या मोना कौरव बनल्या महिला सरपंच, वर्षभरात पालटले चित्र!

21st Mar 2016
 • +0
Share on
close
 • +0
Share on
close
Share on
close

अनेकदा असे म्हटले जाते की, या जगात असे काही लोक असतात, जे स्वतःसाठी नव्हे तर समाजाच्या चांगल्यासाठी, दुस-यांचे चांगले करण्यासाठी, चिंताग्रस्त लोकांच्या चेह-यावर हास्य खुलविण्यासाठी जगतात. या प्रकारच्या लोकांमध्ये आपल्या कामासाठी अशी जिद्द असते की, ते कुठल्याही परिस्थितीत राहू शकतात आणि त्यासाठी ते आपले सर्वस्व अर्पण करतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही की, एक २२ वर्षाची विद्यार्थिनी शहरात जाऊन एखादी व्यावसायिक कारकीर्द घडविण्यापेक्षा गावात राहूनच समाजसेवेचा रस्ता निवडते. लोकांना चांगले आयुष्य देण्यासाठी आपले संपूर्ण जीवन त्यांना अर्पण करते. इतकेच नव्हे तर, जेव्हा या विद्यार्थिनीला असे वाटले की, भ्रष्ट प्रशासकीय आणि जनप्रतिनिधीच गावाच्या उत्कर्षात सर्वात मोठी बाधा आहेत, तेव्हा ती स्वतः निवडणूक लढून गावची सरपंच बनते. आणि सर्वात मोठी बाब ही आहे की, सरपंच बनल्यानंतर एक वर्षाच्या आतच ती गावचे जे चित्र पालटले, ते इतरांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. तिचे नाव मोना कौरव आहे. 

image


मध्यप्रदेशची राजधानी भोपाळपासून जवळपास २००किमी अंतरावर असलेल्या नरसिंगपूर जिल्ह्याची एक युवा महिला सरपंच राज्यासहित संपूर्ण देशासाठी एक आदर्श बनली आहे. जिल्ह्याच्या चावरपाठा विकासखंडाच्या गावरपाडा तहसीलच्या अंतर्गत येणा-या सडूमर गावातील स्थानिकांनी पहिल्यांदा पंचायत राज्यात स्वशासन म्हणजेच राजवटीत जनभागीदारीचा अर्थ समजला आहे. आतापर्यंत केवळ मंत्र्यांच्या आश्वासनात होणा-या विकासाला गावातील लोकांनी आतापर्यंत आपल्या डोळ्यासमोर होताना पाहिले आणि समजले आहे. गावाच्या उत्कर्षाचा हा कारनामा करून दाखविला आहे, याच गावातल्या मोना गौरव या तरुणीने. २२ वर्षाच्या या सरपंचने आपल्या केवळ एका वर्षाच्या कार्य काळात उत्कर्षाचे असे एक उदाहरण समोर ठेवले की, जे मागील काही दशकांपासून गावातील पुरुष सरपंच करू शकले नाहीत. मागील एक वर्षात गावात वीज, पाणी, स्वच्छ पिण्यायोग्य पाणी आणि रस्ते यात खूप बदल झाले आहेत. गरजूंना लाल आणि पिवळे कार्ड मिळण्याव्यतिरिक्त इंदिरा आवास योजने मार्फत घर आणि वृद्धांना निवृत्तीवेतन मिळायला लागले आहे. सरकारकडून ग्रामीण विकासासाठी चालविण्यात येणा-या अधिकाधिक योजनांची गावात अंमलबजावणी होत आहे. पंचायतीत करण्यात आलेले सरपंच मोना कौरव यांच्या अभूतपूर्व कार्यांनी जनप्रतिनिधी सहित प्रशासकीय अधिका-यांचे देखील लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या कामाची प्रत्येक ठिकाणी प्रशंसा होत आहे. चांगल्या कामासाठी त्यांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. असे असूनही मोना सांगतात की, त्यांना अद्यापही गावासाठी खूप काही करायचे आहे. गावाला उर्जा गाव बनवायचे आहे आणि जैविक शेतीसाठी शेतकरी आणि गावांना प्रेरित करायचे आहे. त्यामुळे सध्या गावात १०गोबरगँस बनविण्यात आले आहेत. गावाला स्वच्छ ठेवण्यासाठी जवळपास १२२नवे शौचालय बनविण्यात आले आहेत आणि १०९शौचालयांची दुरुस्ती केली आहे. गावातील सर्व वाड्यात रस्ते असावेत, ग्राम सभा पंचायतभवनमध्ये असण्यासाठी देखील प्रयत्न देखील चालू आहेत. मोना सांगतात की, ‘अंगणवाडी शाळेत मुलांना चांगले शिक्षण, चांगले जेवण मिळावे यासाठी देखील सलग प्रयत्न होत आहेत आणि परिणाम असा आहे की, जी मुले शिकण्यासाठी जात नव्हती, ती आज नियमितपणे जाऊ लागली आहेत. गावात सध्या त्यांना आधार कार्ड, निवृत्ती वेतन योजना, इंदिरा आवास, पाणी, वीज आणि अन्य सरकारी योजनांचे लक्ष्य त्यांना गाठायचे आहे. 

image


डाक्यूमेंट्री फिल्ममध्ये विकासाच्या ब्रांड एंम्बेसेडर असतील मोना

सरपंच मोना कौरव मध्यप्रदेश महिला सबलीकरण आणि मुलींचे यश दाखविणा-या डाक्यूमेंट्री फिल्ममध्ये विकासाच्या ब्रांडऍम्बेसडर(सदिच्छादूत) असतील. त्यात दाखविले जाईल की, मोना यांच्या प्रमाणेच मध्यप्रदेशातील मुली कशा प्रकारे समाजात पुढे येऊन कार्य करतात. राज्य शासनाच्या एका योजनेत मध्यप्रदेशातील सर्वात तरुण सरपंच मोना यांना प्रदेशातून १६फेब्रुवारीला राजस्थानला पाठविण्यात येणा-या गटात देखील जिल्ह्यातून सामील करण्यात आले आहे. डाक्यूमेंट्री फिल्म बनत असलेल्या सडूमरमध्ये प्रदेशातील जनसंपर्क विभागातील तीन सदस्यीय गटाने गावात होणा-या विकास कार्याचे अवलोकन करून त्याची विडीओग्राफी केली. गावांदरम्यान धडाडीने गावातील गरजा आणि शासनाच्या योजनांबाबत युवा सरपंचांनी सांगितले. सडूमर गावाच्या विकासासाठी सरपंच बनल्यानंतर मोना कौरव यांचे कार्य महिला सबलीकरणाच्या क्षेत्रात आता एक उदाहरण मांडत आहे. ज्याच्या माध्यमातून केवळ योजनांवर लक्षच दिले जात नाही तर, समाजात मुली घरातील चार भिंतींच्या बाहेर पडून कशाप्रकारे गावाच्या विकासात योगदान देत आहेत, त्याचे वैशिष्ट्ये दाखविले जात आहे. 

image


...जेणेकरून दुस-यांकडून मिळावी प्रेरणा

डाक्यूमेंट्री बनविण्यासाठी आलेल्या गटाचे प्रमुख शिवकुमार शर्मा सांगतात की, जवळपास दोन मिनिटांच्या सिनेमात मोना यांचे कार्य दाखविण्याचा हा उद्देश आहे की, सडूमरचे कार्य दुस-या लोकांनी पहावे आणि मोना यांच्या कार्याने प्रदेशातील दुस-या मुली- महिला यांना देखील प्रेरणा मिळावी, जेणेकरून त्या गाव-समाजाच्या विकासात कशाप्रकारे योगदान देऊ शकतात.

आपल्या मानधनाने उचलतात, दुस-यांच्या शिक्षणाचा खर्च

image


गावातल्या मुलींना शिक्षणासाठी असुविधा होऊ नये म्हणून, सरपंच मोना यांनी गावातील दोन्ही हाताने अपंग असलेल्या दहावीतील विद्यार्थिनी सोनम यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे. विद्यार्थीनीला सरकारकडून अन्य मदत तर मिळत आहे, मात्र तिच्या शिक्षणाच्या शुल्कासहित अन्य छोट्या गरजा पूर्ण करायच्या आहेत, जेणेकरून तिचे भविष्य साकार होऊ शकेल.

समाधान अभियानाने समस्यांचे निदान

image


मोना गावात कुपोषणाने बळी पडलेल्या मुलांसाठी समाधान नावाने एक अभियान चालवत आहे, ज्यामार्फत अशी मुले शोधून त्यांना भरपूर पोषण असलेल्या जेवणाची व्यवस्था करतात. गावात मुलांच्या कुपोषणाला त्यांनी जवळपास समाप्त केले आहे. कुपोषणाने पिडीत असलेली जवळपास १३मुले सध्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आली आहे. मुलांमधील कुपोषण दूर करण्यासाठी मोना यांनी आपले शिक्षण म्हणजेच क्लिनिकल न्यूट्रीशनच्या ज्ञानाचा देखील भरपूर वापर केला आहे.

मुक्तीधाम येथे जाऊन तोडली परंपरा

जवळपास चार हजार लोकसंख्या असलेल्या सडूमर गावात जवळपास २.५०एकरचे क्षेत्र मुक्तिधाम आणि स्मशानासाठी सुरक्षित आहे. मात्र अधिकांश एकरमध्ये अतिक्रमण आहे आणि गावात जेव्हा कुणाचा मृत्यू होतो तेव्हा अशी वेळ येते की, शवदाह दुसरीकडे कुठेही करावे लागते. लोकांचा हा त्रास बघून युवा सरपंच मोना यांनी मुक्तिधाम येथे जाऊन गावातील अनेक वर्षांची ही प्रथा देखील मोडली की, मुली आणि महिला स्मशानात जाऊ शकत नाहीत. मोना सांगतात की, मुक्तिधामचे निरीक्षण करण्यात आले आहे आणि तहसीलदारला मागणीपत्र देखील दिले आहे की, मुक्तिधामचे मोजमाप करविण्यात येईल, जेणेकरून शेड निर्माण होऊ शकेल.

सोपा नाही सरपंच बनण्याचा रस्ता

गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या आणि क्लिनिकल न्यूट्रीशनमध्ये एमएससीच्या अखेरच्या वर्षात शिकणा-या मोना कौरव यांची सरपंच बनण्याची कहाणी सोपी नाही. मोना कौरव युवर स्टोरीला सांगतात की, “फेब्रुवारी २०१५मध्ये जेव्हा सरपंच पदासाठी मी निवडणूक लढविण्याचा संकल्प घेतला तेव्हा, गावातील लोकांनी त्याचा खूप विरोध केला. इतका की, माझ्या कुटुंबाचेदेखील दोन भाग झालेत आणि माझ्या विरोधात माझ्या नात्यातील मामी मैदानात उतरल्या. निवडणुकीपर्यंत गावात खूप गटबाजी झाली. विरोधीपक्षात शह आणि मातचा खेळ झाला. निवडणुकीच्या दिवशी गावात गोळ्या देखील झाडल्या गेल्या, मात्र अखेर मी जवळच्या प्रतिस्पर्धी आपल्याच मामीला १०८मतांनी मात दिली. मोना यांनी हे सिद्ध केले की, जर काहीतरी करण्याची जिद्द आणि मनौधैर्य असेल, तर व्यक्ती सर्व अडचणींवर मात करू शकते.

image


शासन आणि प्रशासनाकडून मिळत आहे, सकारात्मक प्रतिक्रिया

मोना कौरव यांचे म्हणणे आहे की, निवडणूक जिंकून सरपंचपद सांभाळल्यानंतर त्यांना सर्व लोकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. गावातील सर्व लोक त्यांच्या विकासकार्याशी संबंधित सर्व प्रकारच्या निर्णयाचे समर्थन करतात आणि त्यात आपली भागीदारी सुनिश्चित करतात. इतके की, प्रशासकीय अधिकारी देखील त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देतात आणि योजनांना लागू करण्यात त्यांची मदत करतात. मोना सांगतात की, “मुलींना प्रत्येक क्षेत्रात पुढे असले पाहिजे, मग ती त्यांची कारकीर्द असो किंवा समाजसेवेचे एखादे क्षेत्र. सुरुवातीच्या दिवसात थोड्या समस्या आल्यानंतर सर्वकाही योग्य आणि तुमच्या बाजूने असते.”

येथून मिळाली प्रेरणा

मोना सांगतात की, जवळपास दोन वर्षापूर्वी त्यांच्या गावात एक खूपच भ्रष्ट सचिव आला होता. त्यामुळे गावात विकासाची कोणतीही योजना प्रत्यक्षात येण्याआधीच भष्ट्राचारच्या जाळ्यात जात होती. मोना यांनी गावातील काही लोकांसोबत मिळून त्या भ्रष्ट पंचायत सचिवाविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्याला गावाबाहेरचा रस्ता दाखविला. त्यानंतरच त्यांना गावासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आणि साहस मिळाले.

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या facebook पेज ला लाईक करा

तगड्या पगाराच्या नोकरीला रामराम ठोकत गावाचा विकास साधणाऱ्या छवी राजावत  

माझ्या कुटूंबीयांनी गावाचा पायाभूत विकास केला नाही अशी कबूली देऊन युवा सरपंच प्रतिभा यांनी पालटले एका वर्षात पंचायतीचे चित्र!

आगळ्यावेगळ्या पद्धतीने समाजसेवेचा वसा चालवणाऱ्या भावना प्रधान

लेखक : हुसैन तबिश

अनुवाद : किशोर आपटे

Want to make your startup journey smooth? YS Education brings a comprehensive Funding and Startup Course. Learn from India's top investors and entrepreneurs. Click here to know more.

  • +0
  Share on
  close
  • +0
  Share on
  close
  Share on
  close