रक्तदाते उपलब्ध होणार आता एका कॉलवर

रक्तदाते उपलब्ध होणार आता एका कॉलवर

Monday October 26, 2015,

5 min Read

कुणाल सराफ यांच्या आजोबांना कोलकात्यातल्या एका नामांकीत रुग्णालयात रक्त नाकारण्यात आलं, ते नोंदणीकृत रक्तदाता असतानाही ! या घटनेनं धडा घेऊन कुणालनं प्रत्येकाला रक्त वेळेवर मिळावं या भावनेतून सुरु केली एक स्वयंसेवी संस्था ! कोलकात्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या कुणालनं व्यवसाय व्यवस्थापनाची डिग्री मिळवली ती मात्र दिल्लीमधून. पदवीधर होता-होता त्याने आपला पहिला प्रकल्प २०११ साली सुरूही केला. या त्याच्या प्रकल्पाचं नाव होतं.'सेवियर पब्लिकेशन'. त्याच्या आजीच्या 'सावित्री ' या नावावरून ठेवलेलं. फोनवर जेव्हा सावी हा शब्द लिहिला की शब्दकोश पहिला शब्द म्हणून सेवियर येत असे, आणि त्यावरूनच हे नाव सुचल्याचं कुणालन सांगितलं.

" महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत असताना , आम्हाला ' प्रोडक्शन एंड ऑप्रेशन्स मेनेजमेंट' , हे अभ्यासक्रमातील पुस्तक उपलब्ध नव्हतं. मी काही मित्रांसोबत हे पुस्तक लिहायचं ठरवलं आणि आम्ही कोलकात्यातल्या एका शिक्षकाकडून पडताळणी करवून हे पुस्तक तयार केलं. मागील पाच वर्षातील प्रश्नपत्रिका घेऊन त्याची उत्तर लिहिली आणि प्रश्नपत्रिकांमध्ये वगळण्यात आलेला अभ्याक्रमातल्या भागांचा आम्ही पुस्तकाच्या शेवटच्या काही पानात समावेश केला."

image


थोड्याच कालावधीत त्याच्या या पुस्तकाची मागणी प्रचंड वाढली आणि अनेकांनी अन्य विषयांवरील पुस्तकांची मागणीही सुरु केली . कुणालनं त्यानंतर दोन वेगवेगळ्या विषयांची पुस्तकही प्रकाशित केली. पाच वितरकांशी त्यांनी हातमिळवणी केली. हे प्रकल्प मात्र ते फार काळ चालवू शकले नाहीत, त्यामागचं कारण म्हणजे कामाचं अतिरिक्त ओझं !

शेवटच्या वर्षात कुणालन, एका एॅपची सुरुवात केली. " नो मोर टेन्शन. " या नावाचं हे एॅप होते खास ज्येष्ठ नागरिकांसाठी . २४ भागांमध्ये या एॅपच वर्गीकरण करण्यात आल होतं. ज्यामध्ये बाजारहाटापासून , आरोग्यसेवा या सर्वांचा समावेश होता. अनेक ज्येष्ठ नागरिक इंटरनेट वापरत नाहीत तर अनेकांना वेगवेगळ्या वेबसाईट लक्षात राहत नाहीत, या बाबीवर लक्ष केंद्रित करून हे एॅप तयार करण्यात आलं होतं. थोडक्यात हे एॅप म्हणजे एकाच ठिकाणी गरजेच्या सर्व गोष्टी त्यांना मिळण्याची उत्तम सोय होती .

पदवी अभ्यासक्रम संपल्यानंतर कुणाल कोलकात्याला गेला. एॅपवर काम सुरूच होतं. तो कोलकत्त्यात असताना त्याच्या आजोबांचा एक छोटासा अपघात झाला आणि हाड मोडलं. सगळ्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली, शहरातलं एक नामांकित रुग्णालय असतानाही आजोबाना रक्त नाकारण्यात आलं. या घटनेन , कुणालला नवी दिशा मिळाली आणि कुणालनं सेवियर नावाची स्वयंसेवी संस्था सुरु केली. ज्यामध्ये गरजूंना वेळच्या वेळी रक्त पोहोचवता येईल अशी सोय करण्यात आली. ते ही एका कॉलवर. ऑगस्ट २०१४ मध्ये ही सेवा संस्था सुरु झाली आणि ऑक्टोबर २०१४ मध्ये संस्थेची नोंदणीसुद्धा झाली .

image


संस्थेच्या कामाची रूपरेषा :

मे २०१५ पर्यंत सेवियर्स कोलकात्याच्या बाहेर होती. मे २०१५ मध्ये दिल्लीमध्येही सेवा सुरु करण्याची योजना संस्थेनं आखली . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधल्या स्वयंसेवकांच्या फौजफाट्यावर ही संस्था कार्यरत आहे. नव्याने आलेले विद्यार्थी जुन्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं शिकतात आणिही प्रक्रिया समजावून घेतात. एकदा का प्राथमिक शिक्षण घेतलं की ते अन्य विद्यार्थ्यांनाही नोंदणी करण्यासाठी आग्रह करतात. रक्तदात्यांची यादी तयार झाली की हे इंटर्न त्या दात्यांची नावे नोंदणीकृत करवून घेण्यासाठी पत्रव्यवहार करतात. ही माहिती संस्थेच्या विविध विभागांमधून पडताळण्यात येते आणि त्यानंतर रक्तदात्यांची स्वीकृती निश्चित होते . रिक़्वेस्ट टीम्स या गरजूंना लागणाऱ्या रक्ताची सोय करतात. विभागातल्या त्या-त्या रक्तगटाच्या गरजूंशी भेट घालून देतात .

आजवर सेवियरनं वेगवेगळ्या शहरांमध्ये ५०० हून अधिक रक्तदात्यांची सोय करवून दिलीय. पूर्णत: वर्च्युअल पद्धतीने हे काम चालतं. सध्या २०० स्वयंसेवक सेवियरच्या टीम सोबत काम करताहेत आणि ६० लोकांची भक्कम यंत्रणा या टीममध्ये सामील आहे. एकदा का नवीन इंटर्न टीममध्ये सामील झाला की आठवडाभर तो नवीन रक्तदात्यांची नोंदणी घडवून आणतो आणि त्यानंतरच्या दुसऱ्या आठवड्यातच तो नवीन इंटर्न सदस्यांना प्रशिक्षणही देऊ शकतो आणि त्यानंतर त्याला हवे असल्यास तो या टीमचा सदस्य बनू शकतो. " दररोज १०० नोंदी, याप्रमाणे आमच्याकडे नोदी हव्यात असं ध्येयच आम्ही मे २०१५ पासून ठरवलं होतं. सर्वाधिक नोंदणी असणारा डेटाबेस अशी आमची ओळख आम्हाला निर्माण करायची आहे." असा दावा कुणालनं केला.


भारतातील रक्तदानाची समस्या :

जागतिक आरोग्य संस्था अर्थात डब्ल्यूएचओच्या च्या २०१२ सालच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी ३ दशलक्ष युनिट्स इतका रक्ताचा तुटवडा जाणवतो. त्यातच स्वयंसेवी संस्थांची कमतरता आणि रक्तपेढ्याची उणीव यामुळे हे अंतर वाढत जातं. दान केलेल रक्तं हे निव्वळ ३० ते ४५ दिवसच वैध ठरत . "रक्तदान शिबीर अनेकदा सहज भरवली जातात. त्यासंदर्भात मात्र आमचा नाईलाज असतो पण आमच्या जनजागृती सत्रांमध्ये आम्ही लोकांना अशाप्रकारे शिबिरांमध्ये रक्तदान करण्यासंदर्भात मार्गदर्शन करतो. कारण रक्ताचा बाजार करणारे अनेक घोटाळे उघड होत असतात. अडचणीच्या वेळी एका साधारण रक्ताच्या युनिट साठी तब्बल सहा हजार ते पंचवीस हजार रुपये मोजावे लागतात. अर्थात रक्तगटाच्या दुर्मिळतेवरही ते अवलंबून आहे. आम्ही हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत ." असं कुणालच म्हणण आहे. या संस्थेत १५ हजारांहून अधिक लोकांची माहिती आहे आणि ती पिनकोड नुसार मांडण्यात आलीय. एकदा आमच्या टीमला रक्तासाठी विनंती आली की ते या पिन कोडनुसार सर्वांची यादी काढतात आणि रक्तदात्यांना दूरध्वनी करतात. त्या यादीत जर रक्तदाता नाही मिळाला तर जवळपासच्या परिसरात हे सदस्य शोध घ्यायला सुरुवात करतात .

image


मोबाईल एप का नाही ?

सध्या प्रचलित असलेल्या मोबाइल एपसारखी सुरुवात का नाही केली या प्रश्नावर कुणाल म्हणतात ," ज्या व्यक्तीला रक्ताची गरज आहे , तोच व्यक्ती हे एप डाउनलोड करेल आणि ज्याला रक्तदान करायचं आहे त्याच्याकडे हे एप असायला हवं आणि सहसा वापरात नसलेले एप्स कित्येकजण आपल्या फोनमध्ये ठेवतच नाहीत. त्यामुळे एक कॉल करणं हे नेहमीच फायदेशीर ठरत "

पुढील वाटचाल :

कुणाल आपल्या यशाचं सर्वाधिक श्रेय मनीष जैन यांना देतात जे सेवियर्सचे एक सदस्य आणि उपाध्यक्ष आहेत. जैन यांनी ही संस्था उभारण्यात कुणाला यांना मदत केली आहे. कुणाल यांनी त्यांचा प्रवास एका पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. त्या पुस्तकाच नाव आहे , " हाऊ आयफोन मेड मी द यंगेस्ट बिलियनर." सेवियर हे अडचणीच्या वेळी रक्त पुरवठा करणारं भारतातलं सर्वात मोठ व्यासपीठ बनावं यादृष्टीनं कुणाल यांचे प्रयत्न सुरू आहेत.

रक्तदाता बनण्यासाठी इथे नोंद करा. 

http://thesaviours.org/

    Share on
    close