शिस्त, कष्ट आणि आत्मविश्वास यशाची त्रिसूत्री : प्रमाद जनध्याल
प्रमाद जनध्याल यांची भेट घेणे आणि थक्क होणे दोन्ही गोष्टी परस्परपूरक आहेत, किंबहुना एकरूप आहेत. प्रमाद यांची देहबोली, प्रमाद यांची बोलण्यातली लकब, शैली त्यांच्यात दडलेला आणि बोलत असताना मात्र चेहऱ्यावर ओसंडून येणारा आत्मविश्वास तर काही औरच आहे. केस कापलेले, कॉटनची साडी, असे साधेसरळ रूपडे ल्यायलेल्या प्रमाद म्हणजे आत्मविश्वासाचे दुसरे नावच जणू.
प्रमाद यांचे आतापर्यंतचे आयुष्य सर्वार्थाने छान असेच आहे. बिट्स पिलानीमधून त्यांनी कॉप्युटर सायन्स विषयातनं पदवी संपादन केली. पुढे आयआयएम कोलकत्यातून एमबीए केले. Latentview च्या त्या सहसंस्थापिका आहेत. त्याआधी त्यांनी दहा वर्षे डाटा अॅनॅलिटिक्स आणि डाटा मॅनेजमेंट फर्म्समधील फायनांशियल सर्व्हिसेसमध्ये काम केले.
बालपणापासून ते Latentview मध्ये फायनांस आणि ह्युमन कॅपिटलच्या संचालिका बनण्यापर्यंतच्या त्यांचा प्रवास रंजक असाच आहे.
पक्का पाया- कॉलेजच्या दिवसांचे स्मरण
खालील तीन गुणांच्या प्रभावाखाली प्रमाद मोठ्या होत गेल्या.
१) शिस्त
२) कठोर परिश्रम
३) आत्मविश्वास
कॉलेजच्या दिवसांबाबत त्या म्हणतात,
‘‘ओरिएंटेशन सत्रात मी स्वत:ला झोकून देत असे. संघभावना मी स्वत:मध्ये रुजवत आले. जोखिम पत्करावी लागते, अशा यशासाठीची सपाटून लागलेली भूक मी आणखी वाढवत नेली. बीआयटीएस को-ऑपरेटिव्ह स्टोअर चालवण्याची संधी मला मिळाली आणि शैक्षणिक विश्वा बाहेरच्या बऱ्याच गोष्टी मी शिकले. ‘बिट्स पिलानी’चे एक वैशिष्ट्य आहे, इथे तुम्ही अशा एका जगाचा घटक बनता, जिथे मर्यादा, बंधने वगैरे प्रकारच नाहीत. खुलेपणा आहे. मनमोकळेपणा आहे.’’
Latentview च्या बाबतीत…
प्रमाद यांनी सिक्युरिटीज् मार्केट, क्रेडिट रेटिंग्स आणि फायनांस सर्व्हिसेसमध्ये डाटा आणि ॲनॅलिटिक्स म्हणून जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. त्या नेहमी अन्य लोकांच्या दृष्टीने याकडे बघत असत. लोकांना साहजिकच हे आवडे. त्यांच्या याच अनुभवांनी आणि स्वारस्याने Latentview चा जन्म झाला. आणि इथेच त्या फायनांस आणि ह्युमन कॅपिटलच्या संचालिका आहेत. २००६ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीत आता ५ नव्हे तर ३२० लोकांचा स्टाफ आहे. Latentview अन्य कंपन्यांसाठी बिझनेस ॲअॅनॅलिसिस करण्याचे कार्य पार पाडते आहे. कंपनीचे मूलमंत्र दोन आहेत. एक महत्त्वाकांक्षा आणि दोन आत्मविश्वास. दोन्ही मंत्रांच्या बळावर कंपनीचे वार्षिक उत्पन्न दरवर्षी दुपटीने वाढते आहे.
अन्य कंपन्यांच्या तुलनेत Latentview च्या उपयुक्ततेसंदर्भात प्रमाद सांगतात, ‘‘आम्ही डाटाकडे गणितातील विषय म्हणून बघत नाही आणि आमच्या याच दृष्टीतून ग्राहकांना आम्ही एक तगडे समाधान देतो. उत्कृष्ट सेवेच्या बळावर ग्राहकांशी आमचे संबंध दृढ बनतात आणि हीच गोष्ट इतर कंपन्यांच्या तुलनेत आम्हाला उजवी सिद्ध करते.’’
अनुभव बोलतो...
ॲ अॅनॅलिटिक्स आणि डाटा स्पेसमध्ये २० वर्षांचा अनुभव असलेल्या प्रमाद यांनी अशी स्थित्यंतरे आधी कधीही पाहिलेली नव्हती. त्यांनी सांगितलेल्या खालील काही गोष्टी ज्या आज विशेष चलनात आहेत.
१) सोशल मिडिया : कंपनीला यातून ग्राहकांच्या अपेक्षा ऐकायला मिळतात आणि मार्केटच्या बाबतीतही बरीच माहिती मिळते.
२) बिग डाटा : पारंपरिक सर्व्हर अपुरे पडते म्हणून कंपन्यांनी डाटासाठी ट्रांझिशन बनवून दिलेले आहेत.
३) मोबाईल : या साधनामुळे तर कमालीचा वेग आलेला आहे. याद्वारे तुम्ही कुठल्याही वेळी डाटा ट्रॅक करू शकता.
४) व्हिज्युअल : हे तुमचे डाटा अॅनॅलिसिस संदेश देण्यात मदत करते.
एक महिला असल्या कारणाने…
प्रमाद म्हणतात, ‘‘आजकाल महिलांना बऱ्याच आव्हानांचा मुकाबला करावा लागतोय. खालील गोष्टी महिलांनी लक्षात घ्याव्यात…
१) घर आणि व्यवसायापैकी अमुक क्षणाला कुठल्या गोष्टीला प्राधान्यक्रम द्यावा, त्याचा विचार करणे आणि मग प्राधान्यक्रमावर ठाम राहणे. हे उपयोगी पडणारे आहे.
२) दोन्हींत भेदभाव न करता काम करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याशिवाय कुठल्याही आघाडीवरील लढाई जिंकणे अवघड आहे. जेवढे लवकर हे कळेल तेवढेच मग सगळे सोपे जाईल.
प्रमाद यांच्या मते महिला आता जे करू इच्छितात ते करू लागलेल्या आहेत आणि हीच गोष्ट इतर महिलांनाही प्रेरक ठरेल.
आपली सामाजिक रचनाच अशी काही आहे, की एका रात्रीत हे बदल होणार नाहीत, पण बदल होतील.
गतकाळातून शिकावे, भविष्य सजवावे
वेगवेगळ्या क्षेत्रांतून काम करणे म्हणजे स्वत:वरील विश्वास वाढवणे हेच आहे. अनुभवांची वर्गवारी न करता त्यांना आत्मसात करणे आणि त्यातून शिकणे हेच महत्त्वाचे आहे.
तरुण महिला व्यावसायिकांना प्रमाद यांचा सल्ला
‘‘आपल्या अनुभवांतून शिका. आपल्या स्वप्नांसाठी काम करा. दृढ विश्वास बाळगा. चुका होतील म्हणून घाबरू नका. स्वत:वर फोकस करा. तुमचे लहान ध्येय तुमच्या मोठ्या ध्येयाला नुकसान पोहोचवू शकते, पण तुम्हाला स्थिरचित्त राहावे लागेल.’’