“यूअर स्टोरी”ला “अवर स्टोरी” बनविण्याचा प्रवास निरंतर सुरूच राहील! – केंद्रीय मंत्री डॉ. महेश शर्मा यांना विश्वास

“यूअर स्टोरी”ला “अवर स्टोरी” बनविण्याचा प्रवास निरंतर सुरूच राहील!  –  केंद्रीय मंत्री डॉ. महेश शर्मा यांना विश्वास

Saturday March 12, 2016,

3 min Read

स्वत:च्या स्टोरीतून ज्यांनी जगाला नवा मार्ग दिला त्यांची आठवण नेहमीच ठेवली जाते. युअर स्टोरी अवर स्टोरी बनत नाही तोपर्यंत हा प्रवास निरंतर सुरु राहणार आहे त्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. तुमच्या या प्रयत्नातून मलाही काही शिकता येईल अशा शब्दात केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री डॉ महेश शर्मा यांनी युअर स्टोरीच्या पहिल्या वहिल्या डिजीटल भाषा मेळ्यात आपली उपस्थिती नोंदवली. इतरांसाठी मी काही देऊ शकतो असा विश्वास आपल्या मनात निर्माण करण्याचे काम युअर स्टोरीने केले आहे त्यासाठी श्रध्दाजी आणि त्यांच्या तरूण संघाला धन्यवाद असेही डॉ शर्मा म्हणाले.

केंद्रीय मंत्री डॉ. महेश शर्मा

केंद्रीय मंत्री डॉ. महेश शर्मा


एक दिवसीय डिजीटल भाषा मेळ्यात प्रमुख वक्ता म्हणून सहभागी झालेल्या डॉ शर्मा यांनी जगात देण्यासाठी भारताकडे खूप काही आहे हेच युअर स्टोरीने पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचे सांगितले. ते म्हणाले की, हे माझे सदभाग्य आहे की, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द असलेल्या तरूण चेह-यांच्या सोबत इथे बोलण्याची संधी मला मिळाली. तसे आपले सा-यांचेच काही ना काही स्वप्न असते,पण कालचक्रात ९०% वेळ आपापल्या धावपळीत निघून जातो आणी केवळ दहा किंवा वीस टक्के वेळ राहतो त्यात आपल्याला काय हवे आहे ते करण्याची इच्छा असते. त्यातूनही श्रध्दाजींनी तरूण सहका-यांची एक फळी निर्माण केली याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. तसे तर आपण सारे जगताना ‘मी- माझे’ असेच म्हणत जगत असतो पण त्याला आम्ही अशी ओळख देणे हे काही सोपे काम नाही. आज स्पर्धेच्या जगात आम्ही काय आहोत यात आमची ओळख असते आणि ती निर्माण करण्याचे काम आपण केले आहे असे ते म्हणाले.

image


डॉ. शर्मा म्हणाले की, मी राजस्थानच्या अशा भागात हिंदी भाषेत शिक्षण घेतले जिथे सकाळी सात वाजता शाळेत जाण्यासाठी पायी आठ किलोमिटर रेतीतून जावे लागत होते. वडिलांनी जे बूट घेऊन दिले होते त्यातून गरम रेती पायांना चटके देत असे आणि त्यातूनच मनात काहीतरी करण्याची जिद्द प्रज्वलित होत असे. श्रध्दाजींनी देखील त्यांच्या स्वत:च्या जीवन कहाणीतून ‘युअर स्टोरी’ चा नवा मार्ग दिला आहे. असे नवे मार्ग निर्माण करणा-यांची एक वेगळी ओळख असते आणि वेगळा गट असतो. त्या गटात सहजपणाने प्रवेश मिळत नाही तो मिळवावा लागतो त्यासाठी हवी असलेली अर्हता तुमच्या ठायी आहे हे तुम्ही सिध्द केले आहे असे ते म्हणाले. हा प्रवास असाच सुरु राहिला पाहिजे तोवर जोपर्यंत युअर स्टोरी अवर स्टोरी बनत नाही. त्यासाठी माझ्या शुभेच्छा असे ते म्हणाले. जगातील दहा टक्के इंग्रजी येणा-या लोकांपैकी ०.१टक्के लोक वेबसाईटच्या माध्यमाचा वापर करतात त्यात इतर भाषांना जोडल्याने लोकांपर्यत पोहोचण्याची व्याप्ती विस्तारणे शक्य होणार आहे. मी स्वत: हिंदी माध्यमातून आलो आहे आणि राजकारणी व्यक्तीने नेहमीच दुस-यांकडून काहीतरी शिकत राहिले पाहिजे असे मला वाटते. जगाला मी काय देऊ शकतो, माझा देश काय देऊ शकतो या प्रश्नाचे उत्तर आपण काय देऊ शकतो हेच महत्वाचे असते आणि या देशाने नासा पासून अनेक विकासाच्या संस्थाना दिशा देण्यासाठी योगदान दिले आहे हेच आपले सा-यांचे संचित आहे. त्यादिशेने मलाही तुमच्याकडून बरेच काही शिकता येण्यासारखे आहे असे त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले.