पुणेकर अनिरुध्द पाटील यांच्या मुलुखावेगळया ‘सोशल’ खवय्येगिरीतून नवा उद्यम ! अर्थात ‘पीईओ’
'पुणे तिथे काय उणे' असे म्हणतात, ते सर्वार्थाने खरेच आहे. पुण्याची ओळख आपल्याला छत्रपती शिवरायांच्या इतिहासापासून होत असते. मात्र आजही पुण्याने इतिहासाबरोबरच वर्तमानात आणि भविष्याचा वेध घेण्यातही काही उणे ठेवलेले नाही याचे नेहमीच प्रत्यंतर येत असते. पुण्याची आजची ओळख राज्याची सिलीकॉन व्हॅली अशी आहे. शिवाय शिक्षण पंढरी ही देखील या शहराची जगातील ओळख आहे. खवय्येगिरी हा सुध्दा पुणेकरांचा नवा लुक असू शकतो आणि तोसुध्दा सोशल नेटवर्किंगच्या मदतीने वाढतोय हे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. फेसबुक पेजच्या माध्यमातून पुण्यात खवय्यांची एक नवी ‘ओळख’ उदयास आली आहे, अनिरुध्द पाटील आणि त्यांच्या समूहाने समविचारी मंडळीना घेऊन चक्क गुगलसारखा फेसबुकचा वापर करून नवा उद्योग सुरू केला आहे चला तर जाणून घेऊया ‘पीईओ’ बद्दल:
काय आहे पीईओ
पुण्यात सर्वोत्तम पावभाजी कुठे खायला मिळते ? बिर्याणीसाठी कुठले हॉटेल प्रसिद्ध आहे? शुद्ध शाकाहारी थाळी कुठे उपलब्ध आहे ? चिकन तंदुरीवर कुठे ताव मारता येईल ? रस्त्यालगतच्या कोणत्या टपरीवर चांगली भेळ, पाणीपुरी मिळते ? गावरान किवा विदेशी पदार्थ कुठे खायला मिळतील? अस्सल कोल्हापुरी किवा वऱ्हाडी जेवणासाठी सर्वोत्तम हॉटेल कुठले ? या सारखे अनेक प्रश्न खास खवय्यांना पडत असतात. पुण्यात आलेल्या नवख्या मंडळीना तर काहीच माहिती नसते. अशा वेळी ही सारी माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाली तर ! गंमतच होईल ! नाही का ? चला तर मग लॉग इन करा आणि पीईओ अर्थात ‘पुणे इट आऊट’ सर्च करा... यावर आपल्याला खावेसे वाटणारे पदार्थ कुठे मिळतील याची परिपूर्ण माहिती मिळते ‘पुणे इट आऊट’ म्हणजे खाद्यानाबाबत सर्वकाही. हा फेसबुक समूह गुगलचे सर्च प्रमाणे काम करतो. यात खास खवय्यांचा २५ हजार जणांचा ग्रुप आहे. हा ग्रुप अशा खाद्यप्रेमींचा आहे, ज्यांना खाण्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे आणि बोलायला आवडते.
अकरा वर्षापूर्वी अनिरुध्द पाटील यांच्या या प्रवासाची सुरुवात झाली. पेशाने ते इंजिनिअर आहेत. पण खवय्येपणा त्यांचा छंद आहे. त्यांनी या ‘पुणे इट आऊटस’च्या संकल्पनेला जन्म दिला. त्यांच्या चांगल चुंगल खायच्या सवयीमुळे त्यांनी रस्त्याच्या बाजुच्या ठेल्यांचा नेहमी शोध घेतला. त्यातून पुण्यातल्या खवय्याच्या आवडीच्या ठिकाणांचा शोध लागत राहिला. आपले अनुभव त्यांनी फेसबुकवरून इतरांना देण्याचे काम सुरू केले. कालांतराने सदस्याच्या माहितीची देवाण घेवाण सुरू झाली. आणि खवय्यांचा एक समूह तयार झाला. छंदातून बहुतांश पुणेकरांसाठी नेहमीचे ठिकाण तयार झाले आहे. मग अगदी चांगला वडापाव कुठे मिळू शकेल यासारख्या प्रश्नापासून अगदी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे गुगल प्रमाणे या फेसबुकवरून मिळू लागले.
पीईओने पुण्यातील खवय्यांना एकत्र बांधून ठेवले आहे आणि त्यातून एकमेकांना ते सहकार्य करत असतात. प्रत्येक खवय्यासाठी पीईओ हे व्यासपीठ आहे आणि हे व्यासपीठ सर्वाना सहभागी करून घेऊ इच्छिते. लक्ष्य आहे सातत्याने फूड क्रिएटेर्सना आणि खव्व्य्यांना मदत करणे आणि नवनवीन जिन्नसांची मेजवानी घेण्याचा त्यांना आनंद देणे.
ज्या क्षणी पुणे इट आऊटस या फेसबुक पेजवर आपण जातो तेव्हा आपोआपच त्यात ओढले जातो. जेंव्हा आपणास भूक लागलेली असते तेव्हा या पेजवरच्या विविध चित्रांनी तुमच्या मनात उत्सुकता जागी होते. पदार्थांची वर्णने आणि त्यावरील प्रतिक्रिया-क्रियांचा मागोवा घेताना आपणाला अधिक माहिती मिळते. केवळ माहितीच नाही. या ठिकाणी नेहमीच्या पोस्ट असतात, ‘पुण्यात चांगली पावभाजी कुठे मिळते’. आणि इतरही चौकश्या असतात अगदी त्यावरील रसभरीत चर्चासुध्दा झडत असतात. सदस्यांची त्यावरील माहितीची देवाण घेवाण सुरू असते. पीईओची विश्वासार्हता वाढण्याचे एकमेव कारण तेथे दिली जाणारी पोच आणि पसंती हे अाहे.
फेसबुकची व्यावसायिक उपयोगिता
फेसबुकची वाढती लोकप्रियता पाहता, अनिरुध्द एका वेगळ्या संकल्पनेला मूर्त स्वरुपात घेऊन आले. एक असे व्यासपीठ ज्याचा सर्वांनाच चांगला उपयोग होत आहे. नाम मात्र शुल्क आकारुन त्यांनी सदस्यांना पीईओ कार्ड देण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा सदस्यांना अनेक रेस्टॉरेंटमध्ये सवलतीच्या दरात जिनसा मिळण्यात होतो आणि त्यांना पोईऔचे मित्र संबोधले जाते. यातून रेस्टॉरेंटकडे गर्दी आकर्षित करणे एवढाच हेतू नाही तर याचा उपयोग अधिकाधिक लोकांना या फेसबुक पेजची माहिती होणे हा देखील आहे. त्यामुळे हे कार्ड हवे म्हणून अधिक लोक येत राहतात. त्यातून पीईओला महसूल मिळतो आणि समूहाचा विस्तारही होतो.
" सुमारे वीस हजार सदस्यांसाठी ही सुविधा आहे. काम करणा-या एका होतकरुला वाटले की, जुन्या मेसच्या जेवणातून बदल करावा किंवा मावशींचा डब्बा आज नको तर, किंवा महाविद्यालयातील मुलांना काहीतरी वेगळे खावेसे वाटले तर, रुचीपूर्ण स्वादाची किंमतही तशीच असणार, आणि जे सहजपणे उपलब्ध होणारे असते. अगदी एखाद्या भोजनालयाच्या मालकाला वाटले की नव्या पदार्थांची चव संभाव्य ग्राहकांना द्यावी तर त्यालाही तो भोजनालयाचा मालक आहे हे जाहीर करून येथे आपल्याकडच्या पदार्थांची जाहिरातवजा प्रसिध्दी करता येते. हे पेज सतत वेगवगळ्या उपक्रमांची रेलचेल असणारे आहे. पीईओच्या फेसबुकवर नेहमीच्या धाटणीच्या असंख्य पोस्ट असतात" अनिरुद्ध सांगतात.
असे असले तरी समूह माध्यमातून वेगळ्या प्रकारच्या संघटना निर्माण करणारा प्रकार आहे. वापरकर्त्यांचा अनुभवावर तो चालतो. अनिरुध्द यांनी त्यात पोईओ मीट ही संकल्पना आणली आहे. यामागची संकल्पना अशी आहे की नेहमी फेसबुकवर भेटणा-यांना फेस टू फेस भेटता यावे त्यातून नव्या विचार आणि चर्चा सुरू होतात आणि नव्या दिशा सापडत जातात. ज्याला या उपक्रमाचा उत्कर्षाचा परमोच्च बिंदू म्हणता येते!
हे सारे पाहताना अनिरुध्द यांनी हेच शिकवले की, फेसबूकचा वापर छंदातून एक असे काम निर्माण करू शकतो ज्यातून एक सशक्त समूह तयार होतो जो काहीतरी क्रियाशिल काम करतो त्यामुळे शिवाय रिकामपणाचे हे उद्योग नक्कीच वाटणार नाहीत! आहे की नाही पुणेकरांची ही मुलूखावेगळी खवय्येगिरी!
आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा