या आयपीएस महिला पोलिस अधिका-याने १५ महिन्यात १६ अतिरेकी ठार केले !

या आयपीएस महिला पोलिस अधिका-याने १५ महिन्यात १६ अतिरेकी ठार केले !

Saturday September 23, 2017,

2 min Read

सध्याच्या काळात सारा देश भ्रष्टाचार आणि दहशतवाद यांच्या विरोधात लढत आहे, या मध्येच एका महिला पोलिस अधिका-याची कामगिरी सध्या प्रकाशात आली आहे. आसामच्या पोलादी महिला म्हणून त्या परिचित आहेत. संजुक्ता पराशर असे त्यांचे नाव आहे सध्या त्यांच्या पराक्रम आणि कामगिरीच्या बातम्या वृत्तपत्रातून मुख्य बातम्या म्हणून झळकत आहेत.


image


संजुक्ता ज्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी आहेत, ज्यांना आसाम मध्ये नियुक्ती देण्यात आली आहे, त्यांनी ६४पेक्षा जास्त अतिरेक्यांना अटक केली आहे आणि गेल्या १५ महिन्याच्या कामगिरीचा नवा आदर्श ठेवला आहे.

संजुक्ता यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण आसाममध्येच पूर्ण केले आणि त्या इंद्रप्रस्थ विद्यपिठातून राज्यशास्त्र विषयाच्या पदवीधर आहेत. त्यानंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापिठातून स्तानक पदवी मिळवली. लहानपणापासून संजुक्ता यांना खेळात रूची होती, त्यात त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

अगदी त्या शाळेत होत्या त्यावेळेपासून, संजुक्ता यांना आसाम मधील वाढता भ्रष्टाचार आणि दहशतवाद यांचा तिटकारा होता त्यामुळे त्यांनी शिक्षण पूर्ण होताच राज्यात परतण्याचा निर्णय घेतला आणि चांगल्या श्रेणीत उत्तिर्ण झाल्यानंतरही या प्रश्नाशी लढा देण्याचे ठरविले. २००८ मध्ये प्रथम त्यांना आसाम मध्ये माकूम येथे सहायक कमांडंट म्हणून नियुक्ती मिळाली. त्यानंतर त्यांची बदली उदालगुरी येथे करण्यात आली, येथे बोडो आणि बेकायदा राहणारे बांग्लादेशी अतिरेकी यांच्यात नेहमीच संघर्ष होतो. गेल्या १५ महिन्यात या ठिकाणी कामगिरी करताना त्यानी सुमारे१६ अतिरेक्यांना यमसदनी पाठविले आहे आणि ६४ जणांना तुरूंगात टाकले आहे.

चार वर्षांच्या बालकाची आई असलेल्या संजुक्ता यांनी नुकतेच एक अभियान हाती घेतले त्यात त्या स्वत: एके४७ हाती घेवून उतरल्या होत्या. गेल्या काही वर्षात त्यांनी स्वत:ला बोडो अतिरेकी विरोधातील कारवाईत झोकून दिले आहे.

अनेकदा संजुक्ता या मदत छावण्यातून जातात, तेथे असलेल्या लोकांनी त्यांचे कुटूंबिय गमावले असतात, किंवा दहशतवादामुळे त्यांची घरे दारे गमावल्याने त्यांना तेथे राहावे लागते. त्या त्यांच्या पती आणि कुटूंबियासोबतही दोन महिन्यातून एकदा वेळ घालवितात. त्यांच्या कर्तव्यभावना आणि दहशतवादा विरोधातील लढ्याच्या बांधिलकीबाबत सर्वांनाच आदर आहे त्यांचा आदर्श घ्यावा असेच ते आहे. 

    Share on
    close