रामकुमार शिंदे, हैद्राबादच्या प्रसिध्द ‘राम की बंडी’ मागचे प्रेरणास्त्रोत!
सध्याच्या काळात आपण अनेक शुन्यातून विश्व निर्माण करणा-या प्रेरक कहाण्या वाचत असतो. येथे अशाच एका तरुणाची झोकून देवून काम करण्याची आणि लोकहितासाठी केलेल्या धडपडीची कहाणी आहे. राम कुमार शिंदे,एमबीए स्नातक हे प्रसिध्द राम की बंडी या ब्रँण्डचे प्रेरणास्त्रोत आहेत, जे नामपल्ली हैद्राबाद येथे आहे. येथे ही कदाचित एकमेव खाद्यपदार्थांची हातगाडी असेल जी गुगलऍप, झुमोटोवर सर्च केल्यावर तुम्हाला दिसू शकेल.
राम यांनी त्यांचा हा प्रवास सुरु केला १९८९मध्ये, त्यावेऴी ते आठ वर्षांचे बालक होते जे वडीलांसोबत ही हातगाडी चालवत होते. त्यावेळी त्यांचे वडील इडली, दोसा तयार करून विकत आणि हातगाडी जागोजागी उभी करून विकत असत. राम यांनी ही कला अधिक उठावदारपणे सादर करण्याचे ठरविले. त्यांच्या वडिलांनी अडचणीच्या काळात केलेल्या कष्टानेच राम यांना अभ्यास करून एमबीएची पदवी घेता आली होती याची त्यांना जाणिव होती. एमबीए करतानाच वडीलांचे हे कष्ट जवळून निरिक्षण करत अनेक वर्ष ते अनूभव घेत होते. राम यांना आता प्रश्न होता की, वातानुकूल कार्यालयात त्यांनी वीस हजार रुपये महिना मिळणारी नोकरी करावी की, वडिलांचा व्यवसाय पुढे घेवून जावा. हातगाडीचा व्यवसाय सुरु केला त्यावेळी सुरुवातीची काही वर्ष संघर्षाची होती, फारसा व्यवसाय चालत नव्हता. तसेच ज्या प्रकारे तो चालविला जात होता त्याने त्याना फारसे समाधानही मिळत नव्हते. त्यांनी आधिक भांडवल गुंतवून काही बदल करण्याचे ठरविले. त्या बाबत बोलताना राम यांनी विस्ताराने सांगितले की, “ मी स्वत:लाच विचारले, ज्यावेळी हैद्राबादमध्ये खूप दोसा स्टॉल्स आहेत, लोक माझ्याकडेच का येतील?, त्यानंतर मी वेगवेगळे प्रयोग करून चव बदल करत राहिलो. मी चिज दोसा सुरु केला, पिझ्झा दोसा, पनीर दोसा इत्यादी. त्यावेळी हैद्राबादमध्ये बीपीओचा आणि आयटी कर्मचा-यांचा उदय होत होता. मात्र त्यावेळी त्यांना रात्री अकरा नंतर चांगले काहीतरी खाता येईल अशी जागा नव्हती. त्यामुळे मी स्टॉलची वेळ बदलली आणि रात्री उशीरा मिळणा-या खाद्यपदार्थाची जागा म्हणून पुढे आलो.” आणखी एक गोष्ट राम यांनी केली, दर्जाशी तडजोड न करण्याची. चांगला दर्जा दिल्याने त्यावर लगेच लक्ष जाते, आणि ग्राहकांच्या मनात चांगली भावना तयार होते. यश मिळत आहे हे पाहून राम यांनी आणखी एक पाऊल उचलले. रेस्तरॉं सुरु करण्याचे, ‘रामज्' दोसा हाऊस’ प्रतिष्ठीत जुबिली हिल परिसरात जेणेकरून जास्तीत जास्त लोक यावेत. रेस्तरॉमध्येही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावर अभिमानाने राम सांगतात की, “ आधीपासूनच अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि तेलगूचे मोठे कलाकार येथे येतात, लोक सहकुटूंब येथे येतात आणि तुम्ही पहा खूप तरुण विकेंडला येथे जमा होतात”.
राम स्वत: सक्रीयपणे सायंकाळी त्यांच्या व्यवसायात भाग घेतात, ते अजूनही सकाळी लवकर उठून नामपल्ली येथे हातगाडी लावतात. याबाबत राम सांगतात की, “ ही ती जागा आहे जेथे मी सुरुवात केली, त्यामुळे ही जागा नेहमीच माझ्या जीवनात खास जागा राहणार आहे, त्यामुळे येथे येणे मी कधीच बंद करणार नाही जरी भविष्यात माझी दहा रेस्तरॉ सुरु झाली तरी!”
( थिंक चेंज इंडिया)