चेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न!

चेह-यात काही नसते, जयप्रकाशने अनेक अडचणी असूनही त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच केले लग्न!

Thursday October 05, 2017,

3 min Read

बंगळुरूच्या जयप्रकाश आणि सुनिथा यांच्यात लहानपणापासून तेढ होती. पालकांकडून सातत्याने नकार येवूनही त्यांनी मात्र आशा सोडली नाही, तो पर्यंत त्यांच्या जीवनात एक दिवस दु:स्वप्न घेवून आला, रुग्णालयातील पलंगावर त्यांचे प्रेम सारे काही गमावल्यासारखे पडले होते, ओबड धोबड चेहरा आणि डोक्यावर केस नाहीत. सारे जण चिंतेत होते सुनीथा यांच्या जीवनात पुढे काय वाढून ठेवले आहे याच विचाराने ते हैराण होते.

आज मात्र त्यांच्या प्रेम कहाणीबद्दल सांगताना दोन लहान मुलांसह हे जोडपे इंटरनेटवर जेते ठरत आहे. जयप्रकाश यांचा प्रवास फेसबूकवर सुरू झाला त्यांना १८८००० प्रतिक्रिया मिळाल्या आहेत तर ४४००० शेअर्स मिळाल्या आहेत.


image


जयप्रकाश लिहितात,

“ २००४ मध्ये मी १७ वर्षांचा होतो त्यावेळी मी एक नविन मुलगी माझ्या वर्गखोली जवळुन जाताना पाहिली. तिच्या सारखी चालणारी कुणी मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती, काही काळाने आमची मैत्री झाली मात्र माझे काळीज नेहमी तिला दुस-यांसोबत पाहताना धडधडत असे. त्यानंतर मी तिच्याशी बोलणेच बंद केले अगदी तिला सुध्दा त्याचे कारण माहिती नव्हते. परिक्षा संपल्यावर तिने मला पुस्तकात लिहून दिले की तिला माझ्याशी बोलायचे आहे, पण ते कधीच घडले नाही मी महाविद्यालयात देखील गेलो पण तिच्या सारखी मला दुसरी कुणीच भेटलील नाही. त्या नंतर ती बंगळुरूला निघून गेली.”

नियतीने मात्र वेगळाच डाव रचला होता, आणि सुनिथा भेटली पण एका अनपेक्षित अपघातानंतर. त्या वेळी तिच्या भोवतालचे जग उलटे फिरले होते, जयप्रकाश यांचे प्रेम दगडासारखे झाले होते.

“मी ज्यावेळी भेटायला गेलो त्यावेळी मी एक व्यक्ती पाहिली जिला केस नव्हते, चेह-याचा आकार नव्हता, नाक, तोंड, दात, काहीच नव्हते जी नव्वदीच्या म्हातारी सारखी चालत होती. मला धक्काच बसला. मी कोलमडून गेलो, त्या क्षणी मला समजले मी तिच्यावर प्रेम करत होतो, त्या रात्री नंतर मी दिला संदेश पाठविला. ‘ मी एकमेव माणूस आहे जो तुझी काळजी घेईल, मी तुझ्यावर प्रेम करतो. चल लग्न करूया,” मी म्हणालो. तिने मला फोन केला आणि मी तिला पुन्हा मागणी घातली. ती हसली पण तिने नकार दिला नाही. सुरूवातीला माझ्या आईला धक्काच बसला, पण माझ्या वडीलांचा पाठिंबा होता. आणि नंतर दोघेही माझ्या पाठिशी उभे राहिले.

जरी जयप्रकाश यांच्या कुटूंबियांनी त्यांना पाठिंबा दिला तरी, समाजाला नेहमीच काही प्रश्न असतात. त्याबाबत एफबी वरून माहिती देताना ते म्हणतात की,

“त्यानी मला मुले होवू देवू नको म्हणूनही सल्ला दिला, कारण त्यांचा चेहरा तिच्या सारखा होवू शकला असता. लोक अजूनही तिच्याकडे दया आणि मी तिच्याशी लग्न केले म्हणजे खूप मोठे काहीतरी झाले असेच पाहतात. वास्तव मात्र हे आहे की, मी माझ्या जीवनातील प्रेम मिळवले आहे, आणि माझे जीवनच तिने बदलून टाकले आहे. आज आमची दोन मुले आहेत, रोजच सकाळी आम्ही छान एकत्र उठतो.

ते म्हणतात, “ आज मी माझ्या बालपणीच्या प्रेमासोबत आहे, तीच माझे प्रेम आहे. प्रेम काही चेह-यावर नसते, किंवा बाह्य सौंदर्यावर अथवा व्यंगावर नसते. ते दोन आत्म्यांचे मिलन असते, जे छान वाटते. मला जे काही माहिती आहे ते म्हणजे माझे तिच्यावर प्रेम आहे चंद्र - सूर्य असेपर्यंत आदी आणि अंतापर्यंत, शेवटपर्यंत!”

    Share on
    close