Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
Youtstory

Brands

Resources

Stories

General

In-Depth

Announcement

Reports

News

Funding

Startup Sectors

Women in tech

Sportstech

Agritech

E-Commerce

Education

Lifestyle

Entertainment

Art & Culture

Travel & Leisure

Curtain Raiser

Wine and Food

YSTV

ADVERTISEMENT
Advertise with us

फळे आणि भाज्या ऑनलाईन उपलब्ध करुन देणारे 'फ्रुट्बाजार'

फळे आणि भाज्या ऑनलाईन उपलब्ध करुन देणारे 'फ्रुट्बाजार'

Sunday April 24, 2016 , 4 min Read

आजकालच्या जमान्यात स्टार्टअप्सची एवढी चलती आहे की, अगदी ताजी फळे आणि भाज्या विकत आणण्यासाठीदेखील तुम्हाला बाजारात जाण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन सर्व गोष्टी मागवू शकता. अशाच मागणीचा पुरवठा करणारे एक स्टार्टअप म्हणजे 'फ्रुट्बाजार'. कांदीवली येथील रहिवासी असलेले पराग रमेश शाह यांनी १ एप्रिल २०१६ रोजी 'फ्रुट्बाजार' (fruitzbazar) हा स्टार्टअप सुरू केला आहे. अवघा एक महिनादेखील पूर्ण न झालेल्या स्टार्टअपला स्थानिक लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे, असे पराग सांगतात. फ्रुट्बाजार फक्त कांदिवली, बोरीवली, मालाड आणि दहिसर येथे फळांचे आणि भाज्यांचे घऱपोच वितरण करतो.

image


पराग यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे शिक्षण मात्र मुंबईतच पूर्ण झाले आहे. बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील पदवीधर असलेल्या पराग यांनी काही काळ झेनिथ कॉम्यूटर्स येथे काम केले. त्यानंतर त्यांनी मित्राच्या साथीने ट्रेडिंगचे शिक्षण घेतले आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचे Futech नामक ट्रेडिंग सेंटर सुरू केले. सध्या त्यांच्या ट्रेडिंग सेंटरमध्ये आठ कर्मचारी कार्यरत आहेत. ट्रेडिंग सेंटर स्वतः १९ वर्षे सांभाळल्यानंतर त्यांनी 'फ्रुट्बाजार'ची स्थापना केली. यामागे त्यांची मूळ संकल्पना म्हणजे अधिकाधिक ग्राहकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करणे, ही होती असे पराग सांगतात. ते पुढे सांगतात की, 'मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाच होता. त्यातही अधिकाधिक हातांना रोजगार मिळवून देण्यासाठी मी 'फ्रुट्बाजार'ची स्थापना केली. सध्या आम्ही त्या स्टार्टअपवर फक्त फळे आणि भाज्यांची विक्री करतो. या दोन गोष्टी अशा आहेत, त्या तुम्ही जास्तीत जास्त आठवड्याभराच्या घेऊ शकता. त्यापेक्षा अधिक फळांची किंवा भाज्यांची कोणी खरेदी करत नाही. त्यामुळे ग्राहकांशी आमचा वारंवार संपर्क येत होता आणि आता त्यांचा आमच्यावर विश्वासदेखील बसला आहे. आमच्याकडून फळे किंवा भाज्या खरेदी केलेला ग्राहक पुढची खरेदीदेखील आमच्याकडून करतो, ही आमच्यावर असलेल्या विश्वासाची पावती आहे.' या स्टार्टअपच्या सुरुवातीच्या काळातच पराग यांच्यासमोर मोठी अडचण उद़्भवली, ती म्हणजे पराग यांना फळांचे तसेच भाज्यांचे घरपोच वितरण करण्यासाठी कोणी कर्मचारी मिळत नव्हता. मात्र या अडचणीवर मात करत पराग यांनी स्वतः लोकांच्या घरोघरी जाऊन वितरण करण्यास सुरुवात केली. काही कालावधीनंतर कर्मचाऱ्यांच्या शोधमोहिमेत त्यांना यश आले आणि त्यांनी या कामासाठी तीन कर्मचारी नियुक्त केले. सध्या फ्रुट्बाजार फक्त बोरीवली, दहिसर, कांदिवली आणि मालाड या भागातच फळे आणि भाज्यांचा पुरवठा करत असून, लवकरच इतर भागांमध्येदेखील आपली सेवा सुरू करण्याचा फ्रुट्बाजारचा प्रयत्न आहे.

फळे आणि भाज्या यांची शेल्फ व्हॅल्यू जास्त नसल्याने या व्यवसायात रिस्क अधिक आहे. मात्र कोणत्याही व्यवसायात रिस्क ही असतेच आणि ती घ्यावीच लागते, असे पराग सांगतात. पराग हे फळे आणि भाज्यांची होलसेल बाजारातून खरेदी करतात. त्यानंतर त्यातील चांगल्या आणि उत्तम भाज्यांची निवड करुन ती व्यवस्थित पॅक करुन ग्राहकांच्या मागणीप्रमाणे त्यांना पुरवली जातात. विशेष म्हणजे, पराग स्वतः हे काम पार पाडतात. या स्टार्टअपच्या जाहिरातीकरिता पराग यांनी वर्तमानपत्रातील जाहिराती, पत्रके तसेच सोशल मिडिया म्हणजे फेसबूक आणि व्हॉट्सअपचा वापर केला. या जाहिरातीच्या क्लुप्त्या यशस्वी ठरल्या आणि अल्पावधीतच पराग यांच्याकडे ग्राहकांचा ओघ सुरू झाला. 'फ्रुट्बाजार' हे स्टार्टअप व्हॉट्सअप तसेच वेबसाईटवरुन ऑर्डर्स घेते. फ्रूट्सबाजारच्या ग्राहकांचा व्हॉट्सवर ग्रूप असून, त्याद्वारेदेखील पराग ऑर्डर्स घेतात. सध्या आंब्याचा सिझन असून, माझ्या स्टार्टअपला या गोष्टीचा फायदाच झाला, असे पराग सांगतात. फ्रुट्बाजारची सेवा उत्तम आहे, वितरण नियोजित वेळीच केले जाते, फळे आणि भाज्या माफक दरात उपलब्ध होतात, अशा ग्राहकांच्या प्रतिक्रिया असल्याचे पराग सांगतात. ते पुढे सांगतात की, 'माझ्या या व्यवसायात मला माझ्या कुटुंबाचे सहकार्य मिळाले. तसेच माझा ट्रेडिंगचा व्यवसायदेखील सुरू आहे. तिथे मला वेळेअभावी व्यवस्थित लक्ष देता येत नाही. मात्र माझे तेथील कर्मचारी तो व्यवसाय हाताळतात. त्यामुळे त्यांचेही मला सहकार्य मिळाले.'

image


आपल्या भविष्यातील योजनांबद्दल बोलताना पराग सांगतात की, 'मुळात म्हणजे 'फार्म टू होम' ही संकल्पना राबवायची आहे. शेतातून थेट घरापर्यंत मला या शेतमालाचे वितरण करायचे आहे. पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रभर या स्टार्टअपला यशस्वी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यानंतर भारतातील इतर शहरांचा विचार करता येऊ शकतो. मला या स्टार्टअपवर कालांतराने सर्व गृहपयोगी वस्तू तसेच किराणामाल उपलब्ध करुन द्यायचा आहे. तसेच अधिकाधिक हातांना रोजगार मिळवून द्यायचा आहे.'

आजची तरुण पिढी ही हुशार आहे. त्यांना स्टार्टअपमध्ये भरपूर यश मिळू शकते कारण त्यांच्याकडे स्टार्टअपकरिता अभिनव अशा कल्पनादेखील आहेत. फक्त त्यांची रिस्क घ्यायची तयारी हवी आणि आपले स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द त्यांच्यात हवी, असा सल्ला पराग युवांना देतात. फ्रुट्बाजारबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही https://fruitzbazar.in/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता, असे पराग सांगतात. 

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

शेतकऱ्यांसाठी अनोखी चळवळ - लव दाय फार्मर

व्यावसायाभिमुख शिक्षण घेऊनही शेतीकडे वळलेल्या युवा शेतकऱ्याची प्रयोगशीलतेतून दुष्काळावर मात

सेंद्रीय शेतीमाल शेतातून थेट तुमच्या दारात : 'वुई से ऑरगॅनिक' !