Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
ADVERTISEMENT
Advertise with us

उद्योजकांनी योगाशास्त्राला त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याची चार महत्वाची कारणे

उद्योजकांनी योगाशास्त्राला त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याची चार महत्वाची कारणे

Monday June 13, 2016 , 3 min Read

(२१ जून, २०१६ रोजी योगा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जात आहे. हा लेख योग जागृती निर्माण मालिकेचाच एक भाग आहे )

योगा सराव केल्यामुळे मानसिक तसेच शारिरीक स्वास्थ्य राखले जाते, योगाचे अनेक फायदे सर्वपरिचित आहे. योग-प्राणायाम करणे सर्वांसाठीच गरजेचे आहे, पण उद्योजकांसाठी किवा उद्योजक होऊ पाहणाऱ्यांसाठी योगा करणे अत्यावश्यक आहे.

योग कशापद्धतीने उद्योजकांच्या गरजा पूर्ण करते 

योगाच्या माध्यमातून माहिती प्रक्रिया सुधारण्यास मदत होते, सर्जनशीलता आणि उत्पादकता पातळीत वाढ होते, आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत झाल्याने इतर दैनंदिन ताण-तणावाला सहजपणे सामोरे जाता येते, इतरांची मानसिकता समजून घेता येते. योगाचे यासारखे अनेक फायदे आहे. योगा हे एक प्राचीन शास्त्र आहे. दररोज अवघे काही मिनिट योगा केल्याने त्याचे परिणाम दिवसभर दिसून येतात. तुम्हाला एक वेगळीच उर्जा या योगशास्त्राच्या माध्यमातून दिवसभर मिळत राहते.

मानसिक फायदे – 

योगाचे शारिरीक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात, पण प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छवास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने मानसिक शांतता लाभते. संशोधक दावा करतात की, योग मेंदूकडे पुरवला जाणारा ऑक्सिजन प्रवाह सुधारते. ज्यामुळे नैराश्य येत नाही. नित्यनियमाने पुरेसे योगासने केल्यास मानसिक आणि आत्मिक समाधान मिळते. शरीर आणि मन निरोगी राहते ज्यामुळे आयुष्याकडे बघण्याची वृत्ती सकारात्मक होते.

बरेचशे उद्योजक तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देतात, मात्र अद्यापही मानसिक सुदृढता राखण्याकडे पुरेसे प्राधान्य दिले जात नाही. हे दुर्दैवी आहे कारण व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींना आणि ताणतणावांना सामोरे जावे लागते. अशा पद्धतीच्या जीवनशैलीचा आपण एक भाग होऊन जातो. अशा प्रसंगांना सामोरे जाण्याकरिता शारिरीक आणि मानसिक सुदृढता राखणे अत्यावशक भाग आहे, जे नित्य योगाने साध्य केले जाऊ शकते.

ताणतणावापासून मुक्ती

असा समज आहे की, तणाव निर्माण होणे शारिरीक दृष्ट्या नेहमीच घातक असते असे नाही. आपले पूर्वज तणाव असणे महत्वाचे मानले जायचे, जगण्यासाठी महत्वपूर्ण मानले जायचे, मनुष्यप्राण्याचे जिवंतपणाचे लक्षण मानले जायचे. आपला व्यवसाय वृद्धिगत करण्यासाठी जेव्हा आपण सातत्याने अथक परिश्रम करत असता, त्याचा सर्वप्रथम परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. शरीरात उष्णता वाढ होत असते. थकवा आणणाऱ्या वेळापत्रकामुळे मानसिक तणाव वाढतो.

वर नमूद केल्याप्रमाणे तणाव वाढणे हे शारीरिकदृष्ट्या घातक नाही, पण तो ताण तसाच राहिला तर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या घातक ठरतो. तुमच्या शरीरात नकळत विषारी द्रव तयार होतात, जे शारिरीक अवयवांना नुकसान पोहोचवतात. एका संशोधनात आढळून आले आहे की, माणसं समान पातळीवर ताण अनुभवत असतात, जेव्हा ते एका ट्रॅफीक जॅममध्ये अडकले असतात, कामावर जायला उशीर होत असतो. तेव्हा त्यांच्या मनावर अनावश्यक ताण निर्माण होत असतो आणि ते त्याला सहन करत असतात. जसे आफ्रिकेमध्ये जिराफ आणि झेब्रा या प्राण्यांना वाटत असते की सिंह आपला पाठलाग करत आहे !

खूप अनुभवी लोकं जेव्हा योगा पहिल्यांदा करतात तेव्हा त्यांना शांत आणि आरामदायक वाटते. जे लोकं काही काळापासून योगा सराव करतात त्यांना शरीर ताणमुक्त झाल्याचा अनुभव येतो. योगासने आणि ध्यानधारणा ही सर्व ताणतणाव नष्ट करणारी प्रभावी तंत्रे आहे. योगाच्या सरावाने शरीरातील विषद्रव्ये शरीराबाहेर टाकली जातात.

चेतासंस्थेशी संबंधित फायदे

जेव्हा आपण योगा सराव करतो तेव्हा शरीर आणि चेतासंस्था यातील समतोल राखला जातो आणि त्यातून एक वेगळीच उर्जा प्रवाहित होत असते. श्वसनाच्या वेगवेगळ्या तंत्रामुळे शरीरात साठलेला ताणतणाव निघून जातो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. योगा केल्याने तुमची स्मरणशक्ती वाढते.

सर्जनशीलता आणि अंतर्ज्ञान

तुमच्या अंतर्ज्ञानात वाढ करण्याची क्षमता योगामध्ये आहे. कुठे, कोणत्यावेळी काय करायला हवे याचे अचूक निर्णय सहजपणे घेता येतात. ज्याचे तुम्हाला अनेक फायदे होत असतात. आजच्या या स्पर्धेच्या युगात सातत्याने स्वतःला आणि वाढत्या व्यवसायाला अपडेट ठेवणे गरजेचे असते. शारिरीक स्वास्थ असेल तर मानसिक स्वास्थ्य असते. आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ असेल तरच नवनवीन संकल्पनावर काम करता येते. त्यामुळे उद्योजकांसाठी योगा हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. योग सराव करणे त्यांच्या हिताचे ठरते. योगसाधनेमुळे मन सतत आनंदी, प्रसन्न आणि शांत राहते. ज्याचा उपयोग तुम्हाला व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी होतो.