ओयो रुम्सने सादर केले 'स्टे अंकल', सादर करत आहे ओयो रिलेशनशिप मोड- अविवाहीत जोडप्यांसाठी हॉटेल रुम्स!

ओयो रुम्सने सादर केले 'स्टे अंकल', सादर करत आहे ओयो रिलेशनशिप मोड- अविवाहीत जोडप्यांसाठी हॉटेल रुम्स!

Sunday August 28, 2016,

3 min Read

सुनील आणि अमृता यांच्यासारख्या तरूण जोडप्याकरीता, बाहेरगावी जाणे जिकरीचे होते, खासकरून जेव्हा हॉटेलमध्ये रुम घेत असत किंवा रहायला जागा बघत असत. त्यांच्यासमोर सूचना येत असत की तुमचे नाते सांगा ? सुनिल आणि अमृता विवाहीत नव्हते.

भारतात, अविवाहीत जोडप्यांना रहायला जागा पाहणे म्हणजे नैतीक कोतवाली करणा-यांकडून त्रासाचे असते, अगदी हॉटेल कर्मचा-यांकडून देखील असा त्रास संभवू शकतो. “माफ करा पण आपण विवाहीत आहात का?” “मला त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नाही” “मला असे ओळखपत्र दाखवा ज्यात तुम्ही विवाहीत असल्याचे समजेल” अशी बोच-या आणि चिकित्सक प्रश्नांची यादी न संपणारी असते.

फोटो सौजन्य : शटर स्टाॅक

विवाहापूर्वी शरीरसंबध हा विषय भारतात विसंगत आणि वास्तवाशी फारकत घेणारा आहे. परिणामस्वरुप, अविवाहीत जोडप्यांना एका रात्रीसाठी हॉटेलची रुम मिळवणे उबग आणणारे असते. अलिकडेच 'स्टे अंकल' (StayUncle) नावाच्या स्टार्टअपमध्ये प्रवेश केल्यानंतर ओयो रुम्सने ‘रिलेशनशिप मोड’ साठी काम सुरू केले आहे. त्यांनी हॉटेलवरील ‘अविवाहीत जोडप्यांना खोल्या नाहीत’ ही पाटी काढून टाकण्याचे ठरविले आहे. ओयो रिलेशनशिप मोड मध्ये तुम्हाला केवळ तीच हॉटेलांची यादी दिसेल जेथे अविवाहीत जोडप्यांचे स्वागत असेल. अशी हॉटेल्स अविवाहीत जोडप्यांना परवानगी देतात अगदी स्थानिक ओळखपत्रावर देखील! 

कवीकृत, मुख्य विस्तार अधिकारी, ओयो सांगतात की, प्रत्यक्षात जेंव्हा त्यांनी पाहुण्यांबाबत माहिती घेतली तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की जोडप्यांना कशाप्रकारच्या अडचणींना शेवटच्या क्षणापर्यंत सामोरे जाव लागते. दुसरीकडे हॉटेलची धोरणे त्यांच्याशी चर्चा करून ठरवलेली नसतात. युअर स्टोरीला याबाबत सांगताना कविकृत म्हणाले की, आमच्या सहभागीदारांशी आम्ही आदरपूर्ण व्यवहार करतो मात्र आम्हाला तेवढीच काळजी आमच्या पाहुण्यांची घेतली पाहीजे जे ओयो रुम्सकडे येतात. म्हणून आम्ही हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, त्या करिता आम्ही तंत्रज्ञान आणि तपशील यांचा उपयोग केला. भारतात असा कोणताही कायदा नाही ज्यात अविवाहीत जोडप्यांना हॉटेलात जागा देण्यास मनाई असेल. किंवा एकाच शहरात राहणा-या दोन व्यक्तीना देखील.

असे असले तरी काही हॉटेल चालक मनाई करतात. त्यांनी सांगितले की, आम्ही जोडपे असलेल्या पाहूण्यांसाठी हे पारदर्शक आणि सोपे करण्याचे ठरविले की अशी हॉटेल कोणती आहेत की जेथे साध्या ओळखपत्राच्या आधारे प्रवेश दिला जाईल. कंपनीच्या संकतेस्थळावर आणि अॅपवर अशा हॉटेलची यादी आहे.

‘रिलेशनशिप मोड’च्या वैशिष्ट्यांमध्ये अॅपच्या माय अकाऊंट विभागात स्टेटस 'स्टे अंकल' प्रमाणेच बदलता येते. कविकृत आणखी म्हणाले की, ते अशा लोकांना कॅटरिंग सुविधा देत नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की, ग्राहकांच्या हितांचे ध्यान देताना आम्ही वेगवेगळे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यातून ग्राहकांच्या राहण्याबाबतचा अनुभव समृध्द होऊ शकेल. आमचे वचन आहे की ओयो सर्वांसाठी असेल, आणि आम्ही या योजनेतून कायम जोडप्यांनाही त्यांची ओळख देत आहोत आणि विना त्रास सेवा देत आहोत.

त्यांनी दावा केला की देशात शंभर शहरात ओयो सेवा देत आहे. आणि त्यांच्या साठ टक्के सेवा जोडप्यांना मदत करणा-या आहेत. यामध्ये सारी मेट्रो शहरे आणि महत्वाची स्थळे समाविष्ट आहेत. सध्या ओयो सत्तर हजार खोल्या दोनशे शहरात देत आहे त्यात ६५०० हॉटेल्स सहभागी आहेत.

प्रगती करत असताना स्टे अंकल आणि ओयो यांना नैतिक कोतवालीच्या प्रश्नांशी दोन हात करावे लागतात अगदी सरकारी अधिका-यांपासून भरारी पथकांपर्यत आणि स्थानिक सामाजिक समूहांपर्यत जोडप्यांनी हातात हात घालून सार्वजनिक जागेतून जाणे म्हणजे देशाच्या संस्कृतीवर हल्ला समजला जातो. मढ आयलंड येथील प्रकरणात पोलिसांनी अनेक जोडप्यांना याच कारणाने ताब्यात घेतले होते.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक कर

लेखिका : सिंधू कश्यप