अंशत: कर्णबधीर, वय वर्ष २३ आणि ध्येय, लोप पावणारी हस्तलेखन कला जपण्याचं, कोलकात्याच्या कृतिका रामकृष्णनची ध्येयवेडी कहाणी
इवलासा पक्षी, चिमणी. भारतातल्या प्रत्येक खेड्यापाड्यात शहरात अगदी लहानपणापासून या चिमणीशी आपली गट्टी जमलेली असते. आज मात्र हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती एका लेखात वाचायला मिळाली होती. वाघ किंवा पांडासारखे अजस्त्र प्राणी नाहीसे होताना सगळ्यांना जाणवत आहे. पण चिमणीसारखा छोटासा जीव नामशेष होत चालला आहे, याची जाणीव अनेकांना होत नाहीये. त्याचबरोबर हस्तलेखनाचं भवितव्य असंच काहीसं आहे. हळूहळू लिखाण प्रथा नामशेष होत चालली आहे, हे कृतिका रामकृष्णन हिने दर्शवल्यावर खरंतर चिमणीच्या जाण्याची घरघर लागल्याच्या दुखा:बरोबरच हेही तितकंच खरं आहे हे जाणवायला लागलं.
आता तर हल्लीच्या विद्यार्थ्यांकडे फ़ाऊंटन पेन पण नसतात, एकेकाळी श्रीमंती दर्शवणार हे पेन आता इतिहासजमा झालंय. त्याचबरोबर हस्तलिखित ही कला सुद्धा इतिहासपूर्व गुफांमधील कलांसारखी नष्ट होऊन निव्वळ वस्तुसंग्रहालयात पहायला मिळेल की काय अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. पण कृतीकाच्या प्रयत्नांना यश आल्यास अद्याप तरी लेखन कला तग धरेल असा विश्वास व्यक्त करायला हरकत नाही.
कृतीकानं तिचा लहान भाऊ कौस्तुभसह एक स्टार्टअप सुरु केलं ज्याचं नाव आहे 'व्रीलॅक्स' आणि हे निव्वळ हस्तलेखन म्हणजे हाताने लिहिण्याच्या कलेला प्रोत्साहन मिळावं यासाठी. व्रीलॅक्स म्हणजे राईट टू रीलॅक्स ! स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इंटरनेट मध्ये दिवसभर वावरल्यानंतर लोकांनी काही काळ आपल्या हातात पेन धरून काहीतरी लिहावं ही माफक अपेक्षा या भावा बहिणींची आहे. त्यासाठी त्यांनी फेसबुक वर स्वत:चं पान सुरु केलं आहे आणि त्यांच्या वेबसाइट्चं काम सुरु आहे. ही वेबसाईट सुरु व्हायला विलंब का तर, ते जे काही शिकवतात ते त्यांना आचरणात सुद्धा आणायचं आहे, त्यामुळे संपूर्ण वेबसाईट ही हस्तलिखाणानं सजवण्याची त्यांची तयारी सूरु आहे. कृतीकाने कॅलीग्राफीचं प्रशिक्षण घेतलं आहे आणि ती सध्या कोलकात्यातल्या आउटबॉक्स या स्टार्टअपमध्ये काम करीत आहे. या आउटबॉक्सच्या माध्यमातून लोक आपल्या प्रियजनांना विस्मयचकित करण्यासाठी भेटवस्तू पाठवू शकतात.
आत्म्याची भाषा
कृतिकाला जन्मत:च ९०% श्रवणशक्तीची कमतरता आहे. ४ वर्षापर्यंत ती बोलू शकली नाही. कानातले मशिन्स आणि स्पीच थेरपीमुळे तिचं संवाद ज्ञान सुधारलं. मुळची कोइम्ब्तुरची असणाऱ्या कृतीकाचं बालपण गेलं नवी दिल्लीत आणि त्यांनंतर त्यांचं कुटुंब कोलकात्याला स्थायिक झालं. मुलत:च लढ्वैया असणाऱ्या कृतिकानं महाविद्यालयात सार्वजनिक संभाषण प्रशिक्षण वर्गात सुद्धा भाग घेतला होता. " मला हियरिंग एड्स लावण्याचा सल्ला दिला गेला, विशेष मुलांसाठीच्या शाळेत टाकण्याचा सल्ला दिला गेला आणि एकच भाषा शिकावी, तीम्हणजे इंग्रजी, असा सुद्धा सल्ला दिला गेला." कृतिका सांगत होती.
पण तिच्या पालकांना मात्र तिने अधिक भाषा शिकाव्यात असंच वाटत होतं. त्यामुळे अत्यंत खडतर मेहनतीने तीनं आपली मातृभाषा तामिळ शिकली. त्याचबरोबर इंग्रजी, हिंदी आणि बंगाली भाषा सुद्धा तिने आत्मसात केली. तिच्या पालकानं तिला विशेष मुलांच्या शाळेत घालायचं नव्हतं त्यामुळे ती सर्वसाधारण शाळेत गेली. हे सोपं नव्हतं. तिला दुहेरी मेहनत घ्यावी लागत असे. ती पुढच्या बाकावर बसली असेल तरच तिला शिक्षक काय म्हणतात हे ऐकू येत असे. तिच्या ए पी जे शाळेतील सहकार्य करणारे शिक्षक आणि मित्रपरिवार यामुळे शिक्षणात ती नेहमीच अग्रेसर राहिली. तिने एज्युकेशन आॅनर्स मधला तिचा पदवी अभ्यासक्रम लाॅरेटो महाविद्यालयात आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात डिप्लोमा केला. ती सध्या मनुष्यबळ संसाधन या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सेंट झेवियर्स या महाविद्यालयातून करत आहे.
संभाषण मर्यादेमुळे कदाचित कृतिकाला लिखाण आपलंस वाटलं. शाळा आणि महाविद्यालयात तिच्या लेखन कौशल्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली. लाॅरेटो महाविद्यालयातच तिनं कॅलीग्राफीचं प्रशिक्षण घेतलं आणि एक पाउल पुढे टाकत ग्रॅफोलाॅजीचं सुद्धा प्रशिक्षण घेतलं. ग्रॅफोलाॅजिस्ट म्हणजे या व्यक्ती, एखाद्या व्यक्तीच्या लिखाणावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि स्वभाव गुण ओळखू शकतात. कृतिका म्हणते तिला या विज्ञानाच चांगलंच आकलन झालं आहे. ती म्हणते,
कॅलीग्राफी ही अशी सुरेख कला आहे, ज्यामुळे तुम्हाला एकाग्रता आणि चिकाटी हे गुण सहजपणे शिकता येतात. ते अक्षरश: ध्यानधारणेसारखं आहे. लिखाण करताना मी-मी स्वत:च्या जगात हरवून जाते.
ती शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा हस्तलेखन सुधारण्यासाठी मदत करते आणि तिला असं वाटत की हा बदल झाल्यास ते अजुनही चांगली कामगिरी करू शकतात. तिने तिच्या विद्यापीठातील बोध विज्ञान कार्यक्रमांतर्गत, ओरल स्कूल मधील कर्णबधीर विद्यार्थ्यांना कॅलीग्राफी शिकवली आणि या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदाने तिला आपण निवडलेली दिशा अगदी योग्य आहे हे जाणवलं.
भविष्यातल्या योजना
कृतिकाला व्रिलॅक्स हे नाव जगभर पोहोचवायचं आहे. अर्थात सोशल मिडीयाच्या माध्यमातून आणि त्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्राला सामील करवून घेऊन हा प्रकल्प पुढे न्यायचा आहे. जेणेकरून लोक लिखाण ही प्रक्रिया एक उपचार पद्धती म्हणून वापर करतील, जसे की संगीत किंवा योगा! कृतिका आणि कौस्तुभ आता यापुढे पेन उत्पादनात अग्रेसर असणारया कंपन्यांना सुद्धा आपल्या या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी तयार करणार आहेत. कृतीकाचं एक स्वप्न आहे ते म्हणजे, व्रीलॅक्स या शब्दाला शब्दकोशात क्रियापद म्हणून स्थान मिळेल. तिच्या या प्रयत्नांना शुभेच्छा !
आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा :
१८ वर्षांपेक्षा कमी वयाचा संपादक आणि बडबड्या बातमीदारांची टीम – जाणून घ्या बालकनामा वृत्तपत्राची कथा
‘ऑस्टीयोजेनिसिस’ आजाराने पीडित पूनम श्रोत्रीच्या उत्तुंग वाटचालीची कहाणी
एकेकाळी गंभीर उदासीनतेतून जाणा-या पूनम आता इतरांच्या समस्येचे करत आहे निराकरण
लेखिका : शरीका नायर
अनुवाद : प्रेरणा भराडे