जन्मताच हृदयाला तीन छिद्रे असणाऱ्या १६ वर्षीय 'मुस्कान' चा प्रेरणादायी प्रवास
मुस्कान देवता ही एक अशी मुलगी आहे जिचा जन्म फक्त ३२ आठवड्यात झाला होता, आणि त्याच कारण म्हणजे तिच्या आईच्या गर्भामध्ये तिची वाढ पूर्ण होऊ शकली नाही. जन्माच्या वेळी मुस्कानच वजन मात्र १.२ किलोग्राम होते जे अतिशय कमी होते .मुस्कान चे फुफ्फुस पण जन्मताच खूप अशक्त होती आणि हृदयामध्ये तीन छिद्रे होती .तिच्यात जन्मताच खुप त्रुटी होत्या ,डॉक्टरांनी मुस्कानच्या आई-वडिलांना शंभर दिवस वाट बघायला सांगितली . ह्या परिस्थितीत जन्मलेल्या मुलांसाठी सुरवातीचे शंभर तास हे खुप निर्णायक असतात. ६ ऑक्टोबर १९९९ मध्ये जन्मलेली मुस्कान आज १६ वर्षाची आहे आणि बऱ्याच लोकांसाठी ती प्रेरणा-स्तोत्र आहे .
मुस्कानचा जीवनप्रवास जर आपण पाहिला तर जिथे ती एक प्रेरणा-दायक आहे तिथेच एका बाजूला आपल्याला हैराण पण करते . मुस्कानची आई जैमिनी देवता सांगतात की जेव्हा त्यांनी बाळ मुस्कानला पहिल्यांदा बघितलं तेव्हा मुस्कानच्या डोळ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास दिसला. ती खुप सुंदर होती. तिच्या डोळ्यामध्ये जगण्याची एक उमेद होती. मला तिला स्पर्श करायचा होता पण ती खुप अशक्त व नाजूक होती. जन्म:ताच डॉक्टरांनी तिला इनक्यूबेटर मध्ये ठेवले होते, व आम्हाला शंभर तास वाट बघायला सांगितली तेव्हाच तिच्या प्रकृतीबददल काही निदान करता येईल असे सांगितले. देवाजवळ तिच्या प्रकृतीची प्रार्थना करण्याखेरीच आम्ही काहीच करू शकत नव्हतो. डॉक्टरांची मेहनत आणि देवाच्या कृपेमुळे हे १०० तास सरले व ती सही सलामत घरी आली. डॉक्टरांनी घरी निघायच्या वेळेस तिची काळजी कशी घ्यायची हे नीट समजावून सांगितले आणि आम्ही सुद्धा कोणतीच कसूर ठेवली नाही.
मुस्कानच्या शरीराचा डावा भाग हा उजव्या भाग पेक्षा जास्त विकसित होता हा सुद्धा एक चिंतेचा विषय होता. पण हळूहळू मुस्कानची प्रकृती सुधारत होती आणि आम्हाला आमच्या मुलीबद्दल अभिमान वाटत होता.
डॉक्टरांनी मुस्कानच्या आई-वडिलांना न्यूझीलंडला शिफ्ट करायला सांगितले जिथे तिच्यावर योग्य औषधोपचार होईल. आपल्या देशापेक्षा तिथला समाज हा खूप मोकळ्या विचारांचा आहे. अशा प्रकारे मुस्कानचे आई-वडील २००४ मध्ये न्यूझीलंडला रवाना झाले.
मुस्कान ही साडे चार वर्षाची होती आणि न्यूझीलंड मध्ये तिला स्वतःला जुळवून घेणं सोप्प नव्हत. सुरवातीला मुस्कानला बरयाच गोष्टी समजायला सामान्यांपेक्षा जरा जास्त वेळ लागायचा. म्हणून ती इतर मुलांमध्ये कमी मिसळायची. पण ही परिस्थिती थोड्या दिवसात बदलली.
मुस्कानला गोष्टी आता हळूहळू समजायला लागल्या. आज मुस्कान एक लेखिका आहे. एक रेडिओ जॉकी आणि एक उत्स्फुर्त वक्ती आहे. मुस्कानने आपल्या इच्छाशक्ती ने सगळ्या संकटांवर मात केली. न्यूझीलंड मधल्या एका सरकारी दवाखान्यात तिच्या पायावर शस्त्रक्रिया झाली. मुस्कानला नजरेचा चष्मा आहे आणि ती जरा हळूहळू चालते. मुस्कानच्या हृदयात जे तीन छिद्रे होती ती आता भरत आली आहे.
जेव्हा मुस्कान ६ वर्षाची होती तेव्हा तिच्या भावाच्या जन्माने तिच्या आयुष्यात एक नवचैतन्य आल. ती खूप आनंदात होती तिने मोठया बहिणीच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. ती अमन बरोबर खेळायची ,त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष् द्यायची. मुस्कान मध्ये एक नाविनच आत्मविश्वास आला होता. आज तिच्या प्रयत्नांमुळे ती एक उत्तम लेखिका आहे. तिने एक लघुकथा लिहिली ‘’माई फ्रेंड गणेशा ‘’. ह्या लघुकथेची मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन न्यूझीलंड सरकार तर्फे निवड करण्यात आली. मुस्कांनने स्वत:ची एक आत्मकथा ‘आय ड्रीम ‘’ ( I dream) लिहिली. आणि आज तिची आत्मकथा ‘वेस्ली गर्ल्स हाईस्कूल’ पाठ्यपुस्तकातला एक भाग आहे. मुस्कान स्वतः ह्या शाळेत शिकते. मुस्कांनचे खूप कमी मित्र-मैत्रिणी आहे. टेड टाक्स मध्ये तिने स्वतः सांगितले की माणूस स्वतःच्या हिम्मतीच्या बळावर कितीही कठीण परिस्थितीचा सामना करू शकतो. काही दिवसांपूर्वीच तिने फेस्टिव्हल ऑफ फ्युचर मध्ये एक वक्ता म्हणून भाग घेतला होता. संकुचित स्वभाव असल्यामुळे मित्र-मैत्रिणी बनवायला वेळ लागायचा म्हणून तिला स्वतःला खूप एकट वाटायचं ह्या परिस्थितीत ती लेखनाकडे आकर्षित झाली.
मुस्कान आपल्या लेखनीद्वारे आपल्या मनातल्या चांगल्या गोष्टी कागदावर लिहून मन हलक करायची. तिच्या लिखाणामुळे लोकांना प्रेरणा मिळायची. हेच एक कारण होत की तिला 'आरजे' (रेडीओ जॉकी) म्हणून 'रेडीओ तराना' मध्ये काम करण्याची संधी मिळाली. रेडीओ तराना हे न्यूझीलंड मधले प्रसिद्ध रेडीओ स्टेशन आहे आणि मुस्कान तिथे लहान मुलांचा एक कार्यक्रम सादर करते. हे काम ती वयाच्या फक्त १२ व्या वर्षी करत आहे. मोठी झाल्यावर मुस्कानला एक फोरेन्सिक साईन्टीस्ट बनायचे आहे.
मुस्कान ११वी मध्ये शिकत आहे. तिला इंग्रजी, स्पॅनीश आणि रसायनशास्त्र ह्या विषयांमध्ये रुची आहे. तिचा भाऊ अमन तिचा प्रिय मित्र आहे. दोघेजण आई-वडील घरी नसतांना अगदी व्यवस्थित घर सांभाळतात. मुस्कानला स्वयंपाक करायला खूप आवडतो. मुस्कानला खास करून बेकिंगचे पदार्थ आवडतात.