‘रेलयात्री’, रेल्वे प्रवासातील अडचणी सोडवणारा सोबती

‘रेलयात्री’, रेल्वे प्रवासातील
अडचणी सोडवणारा सोबती

Sunday October 18, 2015,

4 min Read

भारतीय रेल्वे ही जगातील सर्वांत मोठी रेल्वे आहे. देशातल्या अंतर्गत दळणवळणाचा हा मज्जारज्जूच जणू. अभिमानासाठी हे सगळी ठीक असले तरी रेल्वे यात्रा हा प्रकार भारतात काही फारसा सुलभ नाही. यात्राच काय तर यात्रेच्या आधी पार पाडावयाचे सोपस्कारही बरेच गुंतागुंतीचे आहेत. अलीकडच्या काळात ‘स्टार्टअप्स’साठी रेल्वे प्रवास हे क्षेत्र त्यामुळेच महत्त्वाचे बनलेले आहे. रेल्वे प्रवासातील समस्या हेरायच्या आणि त्या दूर करायच्या. गेल्या काही वर्षांत बरेच उद्योजक, व्यावसायिक कमाईची ही नवी संधी आजमावून बघताहेत.

अर्थात RailYatri.in चे संस्थापक मनीष राठी यांचे जरा वेगळे मत आहे. ते म्हणतात, ‘‘विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वच प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतात, पण आपल्या देशाचा विचार केला तर इथे विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या म्हणजे एकूण लोकसंख्येचा एक छोटासा भाग आहे. खासगी क्षेत्रातून लोक सुविधा पुरवण्यासाठी म्हणून रेल्वेकडे का वळले नाहीत, याचे कारण मी सांगू शकत नाही. आम्हीही दोन वर्षांपूर्वी भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी सुविधांच्या क्षेत्रात एक व्यावसायिक म्हणून दाखल झालो.’’

image


रेल्वे प्रवाशांना हिंदीत रेलयात्री म्हटले जाते. RailYatri.in आम्ही सुरू केले. साइटला आम्ही म्हणूनच रेलयात्री हे सुटसुटित नाव दिले. रेलयात्री डॉट इन म्हणजे बऱ्याच ‘वेब ॲप्लिकेशन्स’चे एक ‘कलेक्शन’ आहे. गोळाबेरीज आहे. जवळपास चार वर्षांपूर्वी तीन लोकांनी मिळून साकारलेला हा स्टार्टअप… ‘एसएमईएस’ तसेच अन्य स्टार्टअप्सना सल्ला देण्याच्या व्यवसायात तेव्हा होता. मनीष सांगतात, ‘‘१६ स्टार्टअप्ससमवेत काम केल्यानंतर आम्ही विचार केला, की आता आम्हीही स्वतंत्रपणे एक सुरवात करायला हवी.’’

उत्पादन

दररोज रेल्वे यात्रा करणाऱ्यांच्या काही खास अडचणी कमी करणे, हे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. रेल्वेगाड्यांचा ‘बेसिक रोड ट्रिप प्लॅनर’ हे पहिले प्रॉडक्ट मग लाँच करण्यात आले. मनीष सांगतात, ‘‘रेल्वेशी निगडित समस्यांवर अनौपचारिक उपायही भरपूर आहेत, ते सगळे आम्ही एकत्रित केले. एका जागी उपलब्ध करून दिले. जेणेकरून आमचे प्रॉडक्ट दमदार व्हावे. आमच्या प्रॉडक्टसाठी भारतीय रेल्वेचा आम्ही फार जवळून अभ्यास केलेला आहे. रेल्वे कशी काम करते, हे समजून घेतलेले आहे.’’

रेल्वेसंदर्भातल्या या सगळ्या माहितीच्या जोरावर ‘रेलयात्री’ने आपले ‘रेल रडार’ हे दुसरे प्रॉडक्ट लाँच केले. अमुक वेळेला अमुक रेल्वे नेमक्या कुठल्या ठिकाणावर असेल, त्याची अचुक माहिती ‘रेल रडार’ उपलब्ध करून देते. रेल रडार हे ‘मॅप बेस्ड टुल’ आहे. मनीष सांगतात, ‘‘लोकांना आपल्या कामाशी निगडित माहिती हवी असते आणि हाच विचार आम्ही रेल रडार सुरू करताना केलेला होता.’’

‘रेलयात्री’चे पुढले प्रॉडक्ट होते ‘रेल विस्डम.’ स्थानकांचे प्लेटफॉर्म आणि रेल्वेगाड्यांच्या माहितीसाठी ‘क्राउड सोर्स’वर हे आधारलेले आहे. मॅप बेस्ड असलेले व्यासपीठ ग्राहकांना रेल्वे स्टेशनजवळील चांगल्या रेस्टॉरंटची, हॉटेलची तसेच मॉटेलची माहितीही उपलब्ध करून देते. ५०० हून अधिक रेल्वे स्थानकांची ठोस माहिती आपल्याकडे आहे, असा ‘रेलयात्री’चा दावा आहे.

image


भारतीय रेल्वेसोबत काम

भारतीय रेल्वे सारख्या अगडबंब सरकारी सेवेसमवेत स्टार्टअपच्या हिशेबाने काम करणे ‘रेलयात्री’साठी किती अडचणीचे ठरले, असा प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा मनीष यांचे उत्तर होते, ‘‘अजिबात अडचणीचे ठरले नव्हते. आम्ही रेल्वेत आयटी विभागासोबत काम केले. आणि हे नाते दोघांनाही फायद्याचे ठरले. त्यांच्याकडून एखादा प्रयत्न सुरू असला तर त्यांना उपयुक्त ठरेल, असा एखादा मार्ग आम्ही सुचवत असू.’’ तथापि, मनीष मान्य करतात, की तिथे काही बंधने होतीच. कडक नियम होते. या साऱ्यांचे पालन करतच ‘रेलयात्री’ला आपले काम पुढे न्यायचे होते.

एक फायदा तर झालाच. मनीष यांच्या लक्षात आलेले होते, की भारतीय रेल्वेचा डोलारा खरोखर किती मोठा आहे. मनीष सांगतात, ‘‘रेल्वेसमवेत काम करणे खरोखर फायद्याचे ठरले. पडद्यामागे काय चालते, तेही आम्हाला कळले. ज्या पातळीवर रेल्वे प्रशासन, व्यवस्थापन काम करते, ते खरोखर कौतुकास्पद आहे. आता जी काही बंधने होती, ती आम्ही पाळली, नियमांचे काटेकोर पालन केले, हा भाग अलाहिदा.’’

‘रेलयात्री’चे रिव्हेन्यू मॉडेल गुगल अॅॅड आहे. या मॉडेलनेच मनीष आणि त्यांच्या टीमला तग धरून ठेवले. मनीष सांगतात, ‘‘आम्ही आधी कम्युनिटी बनवत आहोत. वेबसाइट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यावर आमचा भर आहे. आमच्या प्रॉडक्टस्नी जर चांगले काही करून दाखवले तर आम्ही हे प्रॉडक्टस् अधिकाधिक उपयुक्त बनवण्याच्या दिशेने काही करू शकू. पैशाचे गणितही सुटू शकेल. ‘रेलयात्री’च्या प्रयत्नांमध्ये रस असलेल्या गुंतवणूकदारांना उद्देशून मनीष सांगतात, ‘‘हे एखादे रोप जगवण्यासारखे आहे. तुम्ही (गुंतवणूकदार) त्याला खतपाणी घालाल तर ते लवकर मोठे होईल. झाड होईल अाणि तुम्हाला फळेही देईल. मनीष यांचे रेल्वेयात्रेशी निगडित मालिकेतील कुठले रोप (प्रॉडक्ट) आधी वाढते हाच प्रश्न खरंतर तुर्तास आहे.

image


स्पर्धा आणि भविष्यातली धोरणे याबाबत विचारले असता मनीष अगदी निष्कर्षाप्रत पोहोचल्याच्या थाटात सांगतात, ‘‘स्पर्धा चांगली गोष्ट आहे. गुणवत्ता तिच्याशीच तर निगडित आहे. आणि जर तुम्ही एखाद्याच्या स्पर्धेत आहात किंवा एखादा तुमच्या स्पर्धेत आहे तर तिही चांगली गोष्ट आहे. यातून हे सिद्ध होते, की तुम्ही ‘डेड मार्केट’मध्ये नाही. तुमचे प्रॉडक्ट जिवंत आहे. चैतन्यमय आहे! भविष्यातील धोरणे म्हणाल तर काही अंतर्गत उद्दिष्टे आहेत. हो… पण एक मोठे उद्दिष्टही आहेच. ते म्हणजे आम्ही दररोज रेल्वे यात्रेकरूंच्या उपयोगात पडू शकतो काय… त्यांच्या हृदयात आम्हाला जागा मिळू शकते काय… आणि मी आनंदाने या प्रश्नांना उत्तर देऊ शकतो… हो गेल्या काही महिन्यांतच हे लक्ष्य आम्ही प्राप्त केलेले आहे.’’