लोहपुरूष मिलींद सोमण भारतीय महिलांसाठी ‘धावत्या साडी’चे डिझाईन का करत आहे?

लोहपुरूष मिलींद सोमण भारतीय महिलांसाठी ‘धावत्या साडी’चे डिझाईन का करत आहे?

Tuesday August 16, 2016,

2 min Read

मॉडेल-अभिनेता-धावक आणि भारताचा लोह पुरुष- मिलिंद सोमण याने त्याच्या चवथ्या पिंकाथॉनची सारी तयारी पूर्ण केली आहे. ४ सप्टेंबर २०१६ रोजी हे आयोजन करण्यात आले आहे. अनेकांना माहिती नाही की मिलींद रनिंग सारी या प्रकारावर काम करतोय,जी भारतीय स्त्रियांसाठी तयार करण्यात येत आहे.

Image: CRB Tech Reviews

मिलींद याने सांगितले की, बहुतांश भारतीय महिलांना शॉर्टस् मध्ये पळताना अवघडल्यासारखे होते आणि पळणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना ही खास साडी त्याने उपलब्ध करून देण्याचे योजले आहे. जी वजनाला हलकी आणि कमीत कमी कपडे वापरून तयार केली आहे. ही साडी परिधान करून सहजपणे पळता येईल आणि अवघडलेपणाही येणार नाही. “ भारतीय महिलांच्या साड्या बाजारात जाण्यासाठीच्या असतात, लग्नाला किंवा समारंभाला जाण्यासाठी त्या परिधान करतात, किंवा घरी सुध्दा वापरतात, पण व्यायाम करताना किंवा धावताना त्या साडी परिधान करू शकत नाहीत. त्यामुळे महिलांना योगा करायचा असेल किंवा व्यायाम, त्यांना अवघडल्यासारखे वाटता कामा नये,” मिलींद यांनी सांगितले.

रनिंग साडीवर काम करणारा डिझायनर दिल्लीचा रहिवासी आहे. मिलींद यांची इच्छा आहे की त्यात बनारसी आणि इरकलचे मिश्रण असावे. “ महिलांनीअसे म्हटले पाहिजे की, मला बनारसी किंवा चंदेरीत धावायचे आहे” मिलींद यांनी पुस्ती जोडली.

स्वत:ला फिट ठेवताना मिलींद म्हणतात की, “ रिफाईंड साखर सोडून मी सारे काही खातो. त्यासाठी आपल्याला चार गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिले म्हणजे पुरेशी झोप घेतली पाहिजे ज्यातून तुमचे शरीर ताजेतवाने होईल. दुसरे म्हणजे तुमचे अन्न. तुम्ही आरोग्य दायी अन्न खायला हवे म्हणजे घरात शिजलेले ताजे घरगुती जेवण. तीसरे आहे नियमीत व्यायाम. आणि शेवटचे म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन. कोणत्याही प्रंसंगी तुम्हाला त्यातील सकारात्मकता जाणवली पाहिजे. जरी ती वाईट गोष्ट असेल तरी देखील, त्यातून तुम्हाला असे काही शिकता यावे ज्यातून तुमच्यातील चांगला माणूस घडेल”

आणखी सकारात्मक गोष्टी माहिती करून घेण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा