Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
Youtstory

Brands

Resources

Stories

General

In-Depth

Announcement

Reports

News

Funding

Startup Sectors

Women in tech

Sportstech

Agritech

E-Commerce

Education

Lifestyle

Entertainment

Art & Culture

Travel & Leisure

Curtain Raiser

Wine and Food

YSTV

ADVERTISEMENT
Advertise with us

जळगावच्या मराठमोळ्या अनिमा पाटील-साबळे ठरणार तिस-या भारतीय 'अंतराळ वीरांगना'

जळगावच्या मराठमोळ्या अनिमा पाटील-साबळे ठरणार तिस-या भारतीय 'अंतराळ वीरांगना'

Saturday May 21, 2016 , 6 min Read

अंतराळ वीरांगना कल्पना चावला किंवा मूळ भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स या भारतीय महिलांच्या कामगिरीचा आपणा सर्वांनाच अभिमान आहे. अशाच आणखी एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन अंतराळात झेप घेण्याचं कठीण ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील आहे जळगावच्या अनिमा पाटील-साबळे! आपलं अंतराळवीर होण्याचं स्वप्न आज कठोर परिश्रम घेऊन त्या सत्यात उतरवत आहे. अनिमा एक सॉफ्टवेअर आणि एरोस्पेस अभियंता आहे. सध्या त्या नासा या जगविख्यात संस्थेत एम्स रिसर्च सेंटरच्या इंटेलिजन्ट सिस्टिम विभागात काम करत आहे. यापूर्वी त्यांनी केप्लर मिशन मोहिमेत चीफ इंजिनिअर म्हणून साडेतीन वर्षे काम केले आहे. त्यांच्या या भन्नाट प्रवासाबद्दल युअर स्टोरीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

अनिमा पाटील साबळे

अनिमा पाटील साबळे


मुळच्या जळगावच्या असलेल्या अनिमा यांचा जन्म १९ ऑगस्ट १९७४ रोजी धुळे येथे झाला. अंतराळात प्रवास करायचे स्वप्न त्यांनी लहानपणापासूनच पहिले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण १९९० मध्ये जळगावच्या सेंट जोसेफ शाळेत झाले. अनिमा यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड आहे. शाळेत असताना एका पुस्तकात अमेरिका व रशियाच्या अवकाश भ्रमंतीची माहिती त्यांच्या वाचनात आली आणि आपणही अंतराळवीर व्हावे असे त्यांनी मनोमन ठरविले आणि त्या दिशेने वाटचाल करण्यास त्यांनी प्रयत्न सुरु केले. जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भौतिकशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी बी. एस्सी केले. बालपणी पाहिलेले अंतराळयात्री होण्याचे स्वप्न त्यांना शांत बसू देत नव्हते. राकेश शर्मासारखे आपणही अंतराळात उड्डाण घ्यावे, असे त्यांना सारखे वाटायचे. त्यासाठी अधिकाधिक माहिती घेण्यासाठी त्यांची शोधाशोध सुरु झाली. अंतराळयात्री होण्यापूर्वी फायटर पायलट होणे आवश्‍यक असते, असे त्यांना कळले. त्यासाठी भारतीय वायुदलाची परीक्षा देण्यासाठी अर्जही आणला. दुर्दैवाने दृष्टिदोषामुळे त्यांचा पहिला प्रयत्न वाया गेला. तरीही हताश न होता संगणक ज्ञानाच्या माध्यमातून वेगळा प्रयत्न करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून ‘एमसीए’ची पदवी मिळविली. त्या जोरावर मुंबईतील मायक्रोटेक्‍नॉलॉजी या कंपनीत नोकरीची संधी मिळवली. 

image


"दोन वर्षांच्या अनुभवानंतर अमेरिकेतील मेलस्टार कंपनीकडून त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे आले, खूप आनंद झाला. अमेरिकेत गेल्यावर सर्वांत आधी ‘नासा’चे स्पेस सेंटर पाहिले आणि मनात बालपणापासून असलेली अंतराळवीर बनण्याची भावना पुन्हा एकदा उफाळून आली. त्यासाठी कॅलिफोर्नियातील सॅन ओजे विद्यापीठात ‘एरोस्पेस इंजिनिअरिंग’ विषय घेऊन एमएसचे शिक्षण घेण्याचा निर्धार केला. त्यामुळे ‘नासा’मध्ये प्रवेश मिळविण्याचा मार्ग दृष्टिक्षेपात आल्यासारखा वाटू लागला. २०१२ मध्ये ‘नासा’कडून बोलावणे आले आणि केपलर मिशनमध्ये सीनिअर प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करण्याची मोठी जबाबदारी चालून आली, तेव्हापासून आजपर्यंत बालपणीचे स्वप्न अगदी काही अंतरावर असल्याची जाणीव ठेवून मी आयुष्याची वाटचाल जोमाने सुरू ठेवली आहे." अनिमा यांनी सांगितले. 

image


नासात काम करण्यासाठी अमेरिकी नागरीकत्वाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे अनिमा यांनी अमेरिकी नागरिकत्वही स्वीकारलं आहे. अनिमा यांचे वडील मधुकर पाटील व आई नीता पाटील यांचे सुसंस्कार आणि मार्गदर्शनामुळेच त्यांना ही वाटचाल करणे शक्य झाले तसेच त्यांचे पती दिनेश हे अमेरिकेतच सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे आपण इथवर वाटचाल केल्याचं अनिमा सांगतात. "सुरवातीला मुलं झाल्यावर सेकंड मास्टर्स करताना माझ्या घरच्यांचा मला विरोध झाला, मात्र आज सगळ्यांचा पाठिबा मला मिळतो आहे त्या सांगतात की, अंतराळवीर राकेश शर्मा, कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्स हे माझे प्रेरणास्थान आहेत."

image


नासामध्ये विविध प्रकल्पांवर काम करत असताना अनिमा यांची नुकतीच अंतराळवीर शास्त्रज्ञ उमेदवार म्हणून प्रोजेक्ट PoSSUM –( Polar Suborbital Science in the Upper Mesosphere) अर्थात अवकाशातील वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. नासाच्या उड्डाण संधी कार्यक्रमाद्वारे हा प्रोजेक्ट राबवला जातो. पाच दिवसाच्या या प्रशिक्षणादरम्यान फ्लोरिडा डैटोनाच्या अॅमरे रिडल अॅरोनॅटीकल युनिवर्सिटी कॅम्पसमध्ये अनिमाने हवाई प्रात्यक्षिकं हाय-जी आणि झिरो-जी विमान उड्डाणांचे प्रशिक्षण घेतले आणि अवकाश प्रवासादरम्यान येणारे आजारपण टाळण्यासाठी अन्टी-जी युद्धाभ्यासाचे प्रदर्शन केले. उड्डाण करताना वैमानिक आणि अंतराळवीरांना मळमळणे आणि अन्य आजारपण यामुळे टाळले जाऊ शकतात. किवा त्यापासून बचाव करणे शक्य होते. अनिमा यांनी समुद्रसपाटीपासून २२००० फुट उंचीपर्यंत जास्त दाबाच्या खोलीत जाऊन परतण्याचे प्रशिक्षण घेतले. रात्रीच्या प्रकाशातील ढग आणि पृथ्वीवरील अवकाशाचे वातावरण यांच्या अभ्यासानंतर उड्डाण घेऊन आडव्या पद्धतीने लँडिंग करण्याच्या प्रदर्शनाची संधी त्यांना मिळाली. या प्रकारच्या प्रशिक्षण आणि अनुभवामुळे अनिमा यांच्यामध्ये आत्मविश्वास वृद्धिगत होत आहे, बालपणापासून त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. ज्यासाठी त्यांचे साहसी प्रशिक्षण घेणे सुरु आहे. अनिमा या प्रमाणित स्कुबा डायवरही आहे.

image


PHEnOM (Physiological, Health, and Environmental Observations in Microgravity ) प्रोजेक्ट मध्ये सहभागी होण्यासाठी नागरिक- अंतराळवीर शास्त्रज्ञ म्हणून अनिमा यांची निवड झाली आहे. जो जगातला पहिला व्यावसायिक मानवी अवकाश संशोधन कार्यक्रम आहे. पहिल्या श्रेणीत बहुमान मिळवणाऱ्या अनिमा या पहिल्या नागरिक- अंतराळवीर शास्त्रज्ञ आहे. अनिमा सह पहिल्या श्रेणीतील चौदा उमेदवारांनी एप्रिल २०१६ मध्ये त्यांच्या प्रवासाला सुरवात केली आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये ते यामध्ये पदवी प्राप्त करतील. व्यावसायिक अवकाश उद्योग, प्रशिक्षित अंतराळवीर शास्त्रज्ञांसाठी संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अनिमा आणि तिचे सहकारी या संधीची वाट पहात आहे. अनिमा यांची निवड झाली तर, कल्पना चावला, सुनिता विल्यम्स यांच्यानंतर अंतराळ मोहिमेत सहभागी होणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय महिला ठरणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपलं हे ध्येय गाठायचं असल्यानं त्या रात्रंदिन परिश्रम करत आहेत. आपलं कुटुंब सांभाळून त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून अभ्यास सुरु केला आहे.

image


‘नासा’ने आकाशगंगेतील ताऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी २००९ मध्ये अंतराळात साधारणतः बसच्या आकाराची ‘केपलर’ ही महाकाय दुर्बीण सोडली आहे. ‘नासा’च्या केपलर मिशनअंतर्गत २०१७ मध्ये सध्याच्या केपलर दुर्बिणीसारखी कार्यपद्धती असणारी आणखी दुसरी दुर्बीण अवकाशात सोडली जाणार आहे. तिचे नाव ट्रान्झिस्टिंग एक्‍सो प्लॅनेटरी सर्वे सॅटेलाइट (टीईएसएस) असेल. ज्या माध्यमातून पृथ्वीपासून जवळच असलेल्या ताऱ्यांचा अभ्यास केला जाईल. वर्षभरानंतर २०१८ मध्ये सध्याच्या केपलर दुर्बिणीपेक्षा दहापट मोठ्या आकाराची जेम्स वेब बेस टेलिस्कोप (जेडब्ल्यूएसटी) ही मोठी दुर्बीण अवकाशात सोडली जाणार आहे; ज्या माध्यमातून अवकाशातील ग्रहांभोवती असलेल्या वातावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य केले जाईल.

"नासा मध्ये विविध प्रकल्पांवर काम करत असताना, अंतराळ यात्री बनण्याची इच्छा मी तेवढ्याच जिद्दीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अंतराळ यात्री बनण्यासाठी आवश्‍यक असलेला फिटनेस प्राप्त करण्यासाठी स्वीमिंग, रनिंगवरदेखील मी मोठ्या प्रमाणावर भर देत आहे. स्वप्न प्राप्तीच्या दिशेने माझी सर्व वाटचाल अविश्रांतपणे सुरू आहे" अनिमा सांगतात. 

हेरा मिशन :

हेरा म्हणजे 'हुमण एक्स्प्लोरेशन रिसर्च अॅनालाॅग'. नासाच्या जॉनसन स्पेस सेंटरमध्ये एक आवास आहे, ज्यात निवड झालेल्या अनुरूप अंतराळवीराला काही दिवसांसाठी एका 'सिम्युलेटेड ट्रेनिंग'साठी निवडले जाते. "जून २०१५ मध्ये माझी निवड इतर तीन लोकांबरोबर अंतराळ मोहिमेचा अंतिम टप्पा समजला जाणाऱ्या १४ दिवसांच्या मिशनसाठी झाली. या मिशनची कमांडर म्हणून मला निवडले गेले. यामध्ये एकजण फ्लाइट इंजीनियर होता. दुसरे दोघेजण मिशन विशेषज्ञ-१ आणि मिशन विशेषज्ञ-२ होते. आम्ही या मिशनच्या माध्यमातून अवकाशात असलेल्या वातावरणासारखे कृत्रिम वातावरण पृथ्वीवर तयार करून त्या वातावरणात कसे जुळवून घ्यावे याविषयीचे प्रशिक्षण घेतले. 

image


सुमारे ८०० दिवसाचे असलेले हे मिशन १४ दिवसात संकुचित करण्यात आले. या चौदा दिवसांत आम्हाला एका आवासामध्ये मध्ये बंद करण्यात आले होते आणि लघुग्रहकडे उड्डाण करत असल्याचे अनुकरण आम्ही केले. या मोहिमेचे उद्दीष्ट म्हणजे मानव कैद आणि दीर्घकाळ अवकाशातील परिणामांना समजून घेणे आहे." अनिमा सांगत होत्या.


हेरा मिशन

हेरा मिशन


अनिमा यांच्या अवकाश भरारीतून पृथ्वी दोनचा शोध घेतला जात आहे ही सर्वच भारतीय आणि मराठी भाषिकांना सुखावणारी बाब आहे. अनिमा यांना त्यांनी अवगत केलेले ज्ञान आणि अनुभव भारतीय तरुणांबरोबर  शेअर करायला आवडते, त्यांना मार्गदर्शन करायला आवडते जे त्यांना सहजपणे मिळाले नाही. भारतीय तरुणांना या क्षेत्रात अनंत संधी आहेत त्या सांगतात की, "अंतराळ संशोधन कार्यात सहभागी होण्यासाठी ‘एरोस्पेस इंजिनिअरिंग’, ‘एरोनॉटिकल इंजिनिअरिंग’ विषयातील डिग्री चांगला हातभार लावू शकते. अर्थात, अकरावीपासूनच शिक्षणात विज्ञान आणि गणित विषयांवर लक्ष केंद्रित केलेले असावे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला अंतराळ संशोधनात चांगली संधी आहे." अनिमा आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून भारतीय तरुणांना  मार्गदर्शन करत आहे http://www.facebook.com/animpatilsabale

जळगाव ते नासापर्यंतचा अनिमा यांचा हा प्रवास जगभरातील महिलांसाठी प्रेरणादायी असाच आहे. जळगाव खानदेशातल्या मातीतल्या या मराठमोळ्या कन्येच्या असामान्य कामगिरीला युअर स्टोरीचा सलाम! त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा !

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

भारतीय महिला क्रिकेटचा चमकता तारा : मिताली राज!

कृत्रिम पायाने एव्हरेस्ट सर करणा-या अरूणिमा यांच्या इच्छाशक्तीला सलाम

"मी तुमच्यातलीच एक आहे" इति भारतातली आठवी श्रीमंत महिला अनू आगा