स्वच्छ भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी पुढे सरसावले २१ वर्षीय दोन तरुण
'कल्पना कांकणभर, परी ब्रम्हांडाचा भेद करी' या उक्तीनुसार एखादी चांगली कल्पना एखाद्या कॉफी शॉप मध्ये किंवा हॉटेलमध्ये आवडीचे जेवण करतांनाच येऊ शकते असे नाही. ती कधी, कुठे,कशीही येऊ शकते. काही असेच वरूण गुरनानी व अरुण खानचंदाणी यांच्या बाबतीत घडले. दोघेपण रात्री उशिरा नवीन वर्षाची पार्टी साजरी करून परतत असतांना वरूण यांच्याकडे रिकामी बाटली होती जी फेकण्यासाठी ते कचरापेटी शोधत असतांना दोघांनाही आश्चर्य वाटले की, मुंबई सारख्या महानगरात एक किलोमीटर पर्यंत त्यांना कोणतीही कचरापेटी दिसली नाही. वरूण सांगतात की,’’आम्ही कचरापेटी शोधत होतो कारण आमच्याजवळ वेळ होता पण त्यांचे काय ज्यांच्याकडे रोजच्या धावपळीमध्ये वेळच नसतो’’.
दुसऱ्या दिवशी २०१६ चा पहिला दिवस. टीएसईसी नामक विद्यापीठातून इंजिनीअरिंग मध्ये पदवी घेतलेल्या २१ वर्षीय वरूण यांना मुंबई साफ करण्याची कल्पना आली.
एक असा स्टार्टअप जो स्वच्छ भारताच्या कल्पनेने मिळाला, दोघाही मित्रांनी मिळून मुंबई सारख्या मोठ्या शहराची रेकी केली. वरूण सांगतात की, "जिथे एकीकडे बृहन्मुंबई महानगरपालिका शहरात २०,००० कचरा पेटी असल्याचा दावा करतात तिथे वास्तविक सत्य परिस्थिती काहीतरी निराळीच आहे". तेथील स्थानिक लोकांशी केलेल्या चर्चेअंतर्गत त्यांना काही आश्चर्यकारक मत मिळाली. त्यांच्या मते सगळीकडे कचरा करण्याचे कारण म्हणजे शहरात पुरेशा कचरापेटी नसून त्या शोधूनही सापडत नाही.
पुढच्या १६ दिवसात या दोन मित्रांनी एक असा अॅप निर्माण केला ज्यामुळे लोक आपल्या आजूबाजूला कचरापेटी शोधू शकतात. या व्यतिरिक्त नागरिक अगोदर सापडत नसलेल्या व काही कारणाने तेथून गायब असलेल्या कचरा पेटीलाही शोधू शकतात. या कामाच्या सुरवातीला वरूण आणि अरुण यांनी शहरात येऊन ४०० किलोमीटरचा प्रवास करून, ७०० कचरापेटींना स्वतःहून ओळख दर्शवणारे निशाण लावले. यानंतर वरूण हे पण सांगतात की आता लोक कोणत्याही कारणाने शहरात इतरत्र कचरा फेकू शकत नाहीत.
स्वच्छ मुंबई
या अॅपचे नाव टाइडी असून हा अॅप बनवण्याचा उद्देश म्हणजे तांत्रिक पद्धतीने करोडो लोकांची मदत करून शहराला साफ ठेवण्याचा आहे.
कसे करतात नव्या कचरापेटीला निशाण जे या अॅपवर दिसत नाही
इथे युजरला या मॅपवर टॅप करून जिथे कुठे कचरापेटी असेल त्याचे फोटो क्लिक करून टाइडी टीमला पाठवायचे आहे. इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे युजर व कचरापेटीमधील अंतर हे ५० मीटर असले पाहिजे. जशी टाइडी टीम हे बारकावे जाणून घेते तशी ही कचरापेटी अॅपवर दिसू लागते. इथे प्रत्येक टीमला एक युनिक दिले जाते ज्यामुळे युजरला ते ओळखण्यास सोपे जाते.
जर युजरला वाटत असेल कचरापेटीला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवली आहे तर या परिस्थितीत टाइडी टीम त्या कचरापेटीला एक नंबर कोट करू शकते ज्यामुळे लोकांना आपल्या आजूबाजूला असलेल्या कचरापेटीचे निश्चित स्थान समजू शकते. सध्यातरी ही सुविधा स्वयंचलित नसून यासाठी वरूण व अरुण द्वारा आरएफआईडी ची मदत घेतली जात आहे. परंतु अजूनही अपेक्षित असा प्रतिसाद सध्यातरी बीएमसीकडून त्यांना मिळालेला नाही. वरूण व अरुण सांगतात की त्यांच्या कडे कुठूनही आर्थिक मदत सध्यातरी येत नाही,परंतु त्यांचा हा अॅप बनवण्याचा मुख्य उद्देश लोकांना मदत करून स्वच्छतेप्रती जागरूक करण्याचा आहे. पण आता ते यासंबंधी गंभीरपणे विचार करून आर्थिक प्रबंध करणार आहे. त्यासाठी ते अनेक एनजीओ शी सतत संपर्क साधून त्यांना मदतीचे आव्हान करत आहे.
वरूण सांगतात की, "आम्ही मुंबईच्या परिसरातील १००० कचरापेटीला निशाण लावले आहे ज्यात ६३% डेटा आम्हाला युजरकडून मिळाला आहे. ही एक साधी सरळ कल्पना आहे म्हणून आम्हाला नाही वाटत की यात सरकारने कोणताही हस्तक्षेप करावा पण त्यासाठी लोकांनीच पुढाकार घेऊन हे काम केले तर नक्कीच हे काम मोठ्या प्रमाणात करणे शक्य होईल.
यंग इंडियाचे स्वप्न
वरुण व अरुण यांनी फक्त यासाठी अनेक चांगल्या कामाच्या ऑफर धुडकावून लावल्या कारण त्यांनी स्वतःबद्दल विचार न करता अगोदर आपल्या देशाचा विचार केला. याप्रकारे ते स्टार्टअपशी जोडले गेले व आपल्या परीने त्यांनी खारीचा वाटा उचलला आहे.
या दोघांचेही मानणे आहे की हा अॅप म्हणजे समाजासाठी उचलले एक असे पाऊल आहे, जे आमचे मनोरथ यशस्वी करून आमचा स्वच्छ शहर व एक स्वच्छ भारताचा उद्देश साकारण्यासाठी मदत करू शकेल. यामुळे जो आनंद मिळतो तो एखादी चांगली नोकरी करताना सुद्धा मिळाला नसता. त्यांचे असे मत आहे की ते स्टार्टअप इंडियाचा एक भाग बनून देशात एक सकारात्मक बदल घडवू इच्छिता.
आज वरुण व अरुण या दिशेने काम करणाऱ्या अनेक स्टार्टअप्सच्या वेबसाईट व अॅप डिझाईनच्या माध्यमाने काम करणाऱ्यांची मदत करत आहे.
शेवटी वरुण यांनी सांगितले की, "आज टाइडीद्वारा सार्वजनिक मुत्रालयांना सुद्धा निशाण लावले जात आहे. जशी गरज भासेल तसे आम्ही दुसऱ्या शहरांच्या मदतीचा विचार करणार आहोत, तसेच शहरातील कचऱ्याचा योग्य विनियोग करण्याच्या दिशेने आमची टीम अग्रेसर आहे. वरूण सांगतात की,’’स्वच्छ भारताच्या स्वप्नपूर्तीच्या दैनंदिन समस्येसाठी आम्ही यथायोग्य पर्यायाने समोर येऊ".
अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :
पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणारी ʻइको एकोʼ
पुनर्वापर करता येणाऱ्या कचऱ्याचे नियोजन करणारे ʻपॉम पॉमʼ
छतीसगढच्या ६५ वर्षीय विश्वनाथ पाणीग्रहींनी गावागावात राबविली स्वच्छता ग्राम अभियान मोहीम
लेखिका - स्निग्धा सिन्हा
अनुवाद : किरण ठाकरे