आंतरराष्ट्रीय योग दिवस : ही तर सुरुवात
सन २०१५ मध्ये जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवसांचे यशस्वी आयोजन करण्यात आल्यानंतर आता आपण दुस-या आंतरराष्ट्रीय योग दिवसा पासून केवळ काही दिवस दूर राहिलो आहोत. ही सुरुवात कशी झाली त्यावर एक नजर टाकूया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या ६९व्या संमेलनात बोलताना २७ सप्टे २०१४ रोजी जगभरातील देशांच्या प्रतिनिधींना योग दिवस म्हणून २१ जून रोजी सामुहिक योग करण्याचे आवाहन केले होते. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या १९३व्या संमेलनात १७७ देशांच्या मान्यतेने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यानंतर २१जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतच्या संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावात म्हटले आहे की, योगाने आरोग्याला पवित्रपणा मिळतो आणि त्यातून सर्वांचे कल्याण साधता येते. योगामुळे जीवनात आनंद निर्माण करता येतो, तसेच त्यातून रोगमुक्ती साधता येते. तसेच चांगली जीवनपद्धती जगता येते आणि अनेक असाध्य रोगांचा इलाज विनाऔषधी करता येतो. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ६९व्या संमेलनावेळी बोलताना सांगितले २७ डिसेंबर२०१४ रोजी हेच सांगितले होते.
आयुष मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय योग दिवसांचे राजपथ नवी दिल्ली येथे २१जून २०१४ रोजी यशस्वी आयोजन केले होते. या वेळी दोन विश्व विक्रमही साकारण्यात आले होते. ३५,९८५ योगसाधकांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी योगा करण्याचा हा विक्रम होताच शिवाय त्यात ८४ विविध देशांच्या साधकांनी भाग घेतला होता. भारताशिवाय आंतरराष्ट्रीय योग दिवसांच्या आयोजनात जगभरातून उत्साहाने लोक सहभागी झाले. त्यातून कोट्यावधी लोकांनी योगसाधनेचे महत्व विषद करणारा संदेश दिला.
या २०१५ च्या योगदिवसांच्या निमित्ताने भारताच्या पुरातन योगसाधनेचे महत्व आजच्या आधुनिक जगाने मान्य केल्याचे दिसून आले, ज्यातून सा-या जगाचे कल्याण साधता येते. जगभरातील अनेक संशोधक आणि अभ्यास पहाणीतूनही हा निष्कर्ष काढण्यात आला की, अनेक प्रकारच्या शारिरीक व्याधी यातून दूर करता येतात. योगाच्या वाढत्या लोकप्रियता आणि प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय योगदिवसांचे महत्व जगभरातील लोकांना चांगलेच समजले आहे. सारे जग हा अनुभव २१जून २०१६ रोजी घेण्यास पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.