क्लासले: ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सामाजिक शिक्षणाचे व्यासपीठ

क्लासले: ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सामाजिक शिक्षणाचे व्यासपीठ

Monday November 16, 2015,

4 min Read

उत्तरे नसलेल्या समस्या

वैद्यनाथन यांनी १९९५ मध्ये ‘कॉग्निजेंट’मध्ये काम सुरू केले. वैद्यनाथन यांना इथे काम केल्याचा २० वर्षांहून अधिक अनुभव आहे. अनुभवसंपन्न वैद्यनाथन यांना ‘कॉग्निजेंट’मधील आपल्या कामाच्या शेवटच्या काही वर्षात भारतीय शिक्षण व्यवस्थेत येणा-या समस्यांबाबत लोक नेहमीच बोलत असल्याचे लक्षात आले. त्याच काळामध्ये भारतातील बिघडत जाणा-या पर्यावरणाच्या स्थितीकडेही त्यांचे लक्ष केंद्रीत झाले. या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने कोणाकडेही व्यवहार्य उपाय नसल्याचे त्यांना जाणवले. ‘क्लासले’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले वैद्यनाथन सांगतात, “ कोणाला ना कोणाला या दिशेने प्रयत्न करावे लागणारच होते. हे लक्षात घेत मग मीच सुरूवात केली.”

image


खरे तर ‘क्लासले’ची सुरूवात ही शिक्षण व्यवस्थेत असलेल्या मुलभूत समस्या सोधून काढणे या कामापासून झाली. भावी काळात नावारूपाला येणा-या सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला पदार्पण करता येईल असा एखादा व्यवसाय सुरू करावा, असा वैद्यनाथन यांचा मुळीच इरादा नव्हता. परंतु या मुलभूत समस्येचे मूळ शोधण्याच्या त्यांचा प्रयत्नाने त्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे वळवले. ग्रामीण भागात राहणा-या विद्यार्थ्यांची संख्या ही देशातील एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या ८५ टक्के इतकी आहे. अशा प्रकारे २००९ मध्ये वेब दुनियेच्या बाहेर असलेल्या सामाजिक शिक्षण व्यासपीठाच्या रूपात 'क्लासले'ची स्थापना झाली. या व्यासपीठाने पुढे ग्रामीण भारतात राहणा-या विद्यार्थ्यांना मोबाईल सेवा देण्याची सुरूवात देखील केली.

वैद्यनाथन म्हणतात, “ भारतातील ग्रामीण क्षेत्राला अजूनही नीटसे पारखले गेलेले नाही. हे क्षेत्र अनोळखी राहिलेले आहे. या क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनाबाबत विचार करायचा म्हणजे एक फार मोठे आव्हान होते. विशेषत: तुम्हाला तुमच्या अशा विचारांचे समर्थन करण्यासाठी गुंतवणूकीची व्यवस्था करणे आणखी मोठे आव्हान असल्याचे समोर येते.” भांडवल गोळा करण्याच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर त्यांनी या कामासाठी आपल्या बचतीचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात भांडवल गोळा करण्याच्या स्पष्ट योजनांसोबत त्यांनी आपल्या या प्रवासाची सुरूवात केली. नुकतीच त्यांनी ‘चेन्नई एंजल्स’कडून एक चांगली गुंतवणूक मिळवली आहे. भांडवलाची व्यवस्था करणे हा तर एक या प्रवासातला पहिला अडसर होताच. परंतु, याबरोबर कर्मचा-यांच्या रूपात आणखी एका अडथळ्याने त्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. नव्याने सुरू होणा-या कोणत्याही स्टार्टअप कंपनीसोबत काम करण्यास उत्कृष्ट प्रतिभावान लोक शोधणे खूपच कठीण काम असते. विशेषत: सामाजिक उद्योगाच्या क्षेत्रात तर हे आणखी कठीण होऊन जाते. या समस्येचे उत्तर त्यांना ग्रामीण भागात मिळाले. त्यांनी ग्रामीण भागात जाऊन प्रतिभावान लोक शोधण्याचे काम सुरू केले.

‘क्लासले’ म्हणजे एक सामाजिक शिक्षण व्यासपीठ

सामाजिक शिक्षण नेटवर्कच्या रूपात असलेले ‘क्लासले’ हे एक दुहेरी मॉडेल आहे. या मॉडेलच्या एका टोकाला व्यक्तीगत रूपात उपयोगकर्ता असलेला विद्यार्थी आहे, तर दुस-या टोकाला या विद्यार्थ्याला भविष्यात नोकरी देणारे नियोक्ता आहेत. आत्ताच्या घडीला ‘क्लासले’चे २ लाखाहून अधिक नोंदणीकृत उपयोगकर्ता आहेत. ‘क्लासले’च्या नेटवर्कमध्ये १०० हून अधिक सहकारी महाविद्यालये जोडली गेली आहेत. आपल्या विद्यार्थ्यांना ‘क्लासले’चा एक तास उपलब्ध व्हावा यासाठी महाविद्यालये आपल्या वेळापत्रकात आवश्यक ते बदल करतात.

मोबाईल ही या व्यासपीठाची प्रारंभिक दृष्टी आणि विचाराचे एक अभिन्न अंग होते. ऑफलाईन असतानाही विद्यार्थ्यांना उपयोग करता येऊ शकेल असे फिचर्स तयार करण्यावर या व्यासपीठाने आपले लक्ष केंद्रीत केले. ‘आपल्या हातात’ असा ज्या शब्दाचा अर्थ होतो त्या ‘कैयाल’ या ऑडिओ-व्हिडिओ साधनांचा प्रयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवावे या उद्देशाने हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले होते. सामान्य मोबाईलवर देखील अगदी सहजतेने याचा उपयोग करता यावा या दृष्टीने त्याचे मोबाईल इंटरफेस तयार करण्यात आले आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याकडे एक मोबाईल फोन आणि सिमकार्ड असेल तर तो एसएमएसच्या माध्यमातून टेस्ट प्रश्न पाठवू शकतो. आणि या बदल्यात सिस्टमसुद्धा या विद्यार्थ्याला एसएमएसद्वारे उत्तरे पाठवते. तथापि, भारत सरकारने 'एसएमएस' सेवांमध्ये केलेल्या फेरबदलांनी यांच्या मोबाईल सेवांना प्रभावित केले आहे.

image


महसूल उत्पन्न करणारे हे दुपदरी मॉडेल आहे. शिक्षण संस्था 'सास'वर ( SaaS) आधारित प्रत्येक उपयोगकर्त्याच्या रक्कमेचा प्रत्येक महिन्याला भरणा करते. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी या व्यासपीठावर आपली नोंदणी केल्यानंतर त्यांना नोकरी मिळावी या उद्देशाने त्यांच्या कामाच्या तपशीलाचा डेटा विविध कंपन्यांकडे पाठवला जातो. आणि यासाठी त्या त्या कंपन्यांकडून पैसे घेतले जातात. वैद्यनाथन सांगतात, “ क्षमता असतानाही ज्यांना नोक-यांची संधी मिळत नाहीत, अशा विद्यार्थांना रोजगार मिळवून देण्यात आम्ही मदत करतो.”

भविष्यातील योजना

वैद्यनाथन आपल्या बोलण्याला पूर्णविराम देताना सांगतात, “ प्रत्येकजण शिक्षण क्षेत्राचा एक भाग बनण्यासाठी उत्सुक आहे. यांपैकी जवळजवळ सर्वच लोक नव्या व्यवस्थांमध्ये असलेल्या शिक्षणाच्या मुलभूत गोष्टी लक्षात न घेता अथवा त्या जाणून न घेताच त्याच त्या जुन्या पुराण्या घासून घासून गुळगुळीत झालेल्या मॉडेल्सची नक्कल करू लागले आहेत. आम्ही एक परिवर्तन घडवू इच्छितो. असे असले तरी अजूनही आम्ही या कार्याच्या खोलात शिरलेलो नाही. आपल्या समोर सर्वात मोठ्या संधी फक्त भारतातच उपलब्ध आहेत. जर आपण या मॉडेलला इथे काम करण्याच्या पात्रतेचे बनवू शकलात तर ते मॉडेल निश्चितच एक प्रतिस्पर्धी बनतो. शिवाय या मॉडेलचा संपूर्ण जगात कुठेही बेधडकपणे वापर केला जाऊ शकतो. मी लोकांना बाहेर येऊन जीवनाचा आनंद लुटण्यासाठी प्रेरित करण्याचे काम करतो.”

गेल्या ६ ते १८ महिन्यात ऑफलाईन, मोबाईल आणि सामाजिक शिक्षणाचे हे तिहेरी संयोजन प्रसिद्धीच्या झोतात राहिले आहे. ‘क्लासले’ ने लोकांनी किंवा तज्ञांनी ठरवलेल्या संकल्पनांच्या( conventional wisdom) विरोधात जात तीन वर्षांपूर्वी या क्षेत्रात सर्वात आधी सुरूवात केल्याने चांगली प्रगती साधली आहे. संकल्पनांच्या ( conventional wisdom) विरोधात जाणे क्लासलेला फायद्याचेच ठरले. वास्तवात येणारा काळ हा ऑनलाईन सामाजिक शिक्षणाचाच आहे.

या सामाजिक शिक्षण व्यासपीठाबाबत अधिक माहिती हवी असल्यास Classle वर ( क्लासले) एक दृष्टीक्षेप जरूर टाका.