त्यांच्या विरोधात फतवा निघूनही नजिमा बीबी या महिला उमेदवाराने घरगुती हिंसाचाराशी लढा दिला!
त्यांच्या विरोधात निवडणुका लढू नये असा फतवा निघाला, तरीही मणिपूरच्या पहिल्या मुस्लिम उमेदवार नाजिमा बिबी यांनी त्यांना घरगुती हिंसेच्या विरोधात लढा सुरूच ठेवायचा असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांना मुस्लिम महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करायचे आहे.
“ मला माझ्या जीवाची पर्वा नाही, पण मी जिवंत आहे तोवर मी माझा घरगुती हिंसेविरुध्दचा लढा थांबविणार नाही, आणि मुस्लिम महिलांना समाजात न्याय मिळावा म्हणून लढत राहिन. माझ्या जीवनात लहानपणापासूनच संघर्ष आहे, मी कोणत्याही धमकीला भिक घालत नाही,” नाजिमा बिबी यांनी सांगितले.
नाजिमा या इरोम शर्मिला यांच्या प्रजा पक्षाच्या उमेदवार आहेत, आणि वाबगई मतदारसंघातून उमेदवार आहेत, नाजिमा सांगतात की त्या इरोम शर्मिला यांच्या १६ वर्षाच्या उपोषण आंदोलनाने प्रभावित आहेत, जो अफ्स्पा या कायद्या विरोधात लढा देताना त्यांनी स्विकारलेला मार्ग आहे. आणि त्यांनी ज्यावेळी राजकीय मार्गाने लढा देण्याचे ठरविले त्या त्यांच्यासोबत सहभागी झाल्या आहेत.
“इरोम यांचा लढा अव्दितीय आहे, आणि त्यातून मी नेहमीच प्रेरणा घेते. त्यांच्या निर्भयपणे वाईट गोष्टीशी लढा देण्याच्या वृत्तीने मणीपूरी महिला किती सक्षम असू शकतात याचा परिचय दिला आहे. त्यावेळी त्यांनी ज्यावेळी राजकीय प्रवास करायचे ठरविले, मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे रहायचे ठरविले. जर मी आमदार झाले, तर माझ्याकडे शिक्षण, महिलांचे प्रश्न, अफ्स्पाला विरोध, लघु उद्यांगातून रोजगार, आणि इतर ब-याच गोष्टींचा कार्यक्रम आहे. ज्यातून मला समाजाला मदत करायची आहे ज्या आम्ही राहात आहोत” नाजिमा म्हणतात.
पण त्यांचा राजकारणात जाण्याचा आणि निवडणूका लढण्याचा निर्णय त्यांच्या जीवनात वादळ घेवून आला, त्यांच्या भागात वाबागाईमध्ये त्यांच्या विरोधात फतवा काढण्यात आला, संथेल मामांग लेईकेईच्या धार्मिक नेत्यांनी जाहीर केले की, नाजिमा बिबी यांना त्यांच्या मरणानंतरही कबर किंवा अंत्यविधीसाठी जागा दिली जाणार नाही. गावातील लोकांनाही त्यांच्याशी बोलण्यास मज्जाव केला गेला कारण त्यांनी राजकारणात प्रवेश केला म्हणून.
“ माझ्या जीवनात काय होणार ते महत्वाचे आहे, जर मी समाजातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या कामी आले, त्याने मला जास्त समाधान मिळेल, मला हे माहिती करून काय करायचे आहे की मी मेल्यानंतर माझे काय होणार आहे?” त्या म्हणाल्या. नजिमा म्हणाल्या की तेथे काही समाज घटक जुन्या बुरसटलेल्या मानसिकतेचे आहेत, जे नेहमीच त्यांना अडथळे आणू इच्छितात.
“ ज्यावेळी मी सभांना जाताना सायकलने प्रवास करायचे ठरविले, लोकांनी माझी टर घेतली, म्हणून ज्यावेळी ते माझ्यावर मस्करी करतात, मी नाराज न होता प्रोत्साहित होते. मी जे काही करते त्यात नक्कीच काहीतरी खास असेल, जे त्यांना येत नसेल, त्यामुळेच ते मला चेष्टा- कुचेष्टा करून त्यापासून परावृत्त करत असावेत”. त्या पुढे म्हणाल्या.
नजिमा यांचा प्रवास बेधडक आहे, त्या प्रत्येकवेळी वाईटांशी दोन हात करत आल्या, आणि त्या आज मणिपूरमधल्या पहिल्या मुस्लिम उमेदवार आहेत. त्यांच्या शाळेतल्या एकमेव मुस्लिम मुलगी आणि कुटूंबातील एकट्या दहावी शिकलेल्या असल्या तरी त्यांना सतत टोमणे आणि त्रास सहन करावा लागला. त्यातूनही त्या तावून सुलाखून निघाल्या.
एका वृत्ता नुसार, नजिमा यांना दहावी होताच लग्न करण्यास भाग पाडण्यात आले. पण त्या पळून गेल्याआणि अशा माणसाशी लग्न केले ज्याला त्या केवळ दोनदा भेटल्या होत्या आणि त्यातूनच नंतर संकटे आली. त्यांचा पती शिवराळ होता, त्यामुळे सहाच महिन्यात हे लग्न मोडले. त्यांच्या घटस्फोटानंतर, त्यांना स्वयंपूर्णता आणि महिलांच्या आर्थिक स्वायत्ततेचे महत्व कळले होते, त्यांनी स्थानिक महिलांच्या करीता एक कार्यक्रम हाती घेतला. त्याचे नाव ‘चेंग मार्प’ तांदूळ बचत फंड.
“ समूहातील महिला रोज, त्यांच्या घरात शिजवण्यासाठी असलेल्या तांदूळातून काही काटकसर करत असत. ते जमा करून माझ्या घरात ठेवले जात, आणि दोन महिन्यांनी ज्यांची पाळी असेल त्यांना दिले जात त्यांनी ते विकून काही पैसे कमवावे. याकडेही आमच्या लेईकेई लोकांनी संशयाने पाहिले, मला घालवून देण्यात आले आणि आम्ही गोळा केलेल्या तांदळाला चोरीचे ठरविण्यात आले. पण आम्ही मात्र हा उपक्रम चालूच ठेवला.” त्या म्हणाल्या.
नाजिमा ज्या आज वयाच्या चाळीशीत आहेत, सक्रीयतेने महिलांना मदत करतात, आणि त्यांना त्यांच्या हक्काचे मार्गदर्शनही करतात. शिवाय त्या लैंगिक समानता यावर कार्यशाळाही घेतात, जो २००१मध्ये त्यांच्या जीवनात बदलाचा क्षण ठरला. “ मी सा-यांना शक्य ती मदत करण्याचे ठरविले आहे, त्यांना हे सिध्द करायचे आहे की, महिला छळ सहन करत नाहीत, बंधने आणि हिंसा मान्य करत नाहीत,” त्या म्हणाल्या. नाजिमा सध्या निराधार महिलांसाठी आश्रम शाळा चालवितात.
“परंतू २००६मध्ये धार्मिक नेत्यांनी, माझ्या विरुध्द फतवा काढला, आणि मला गावात बहिष्कृत करण्यात आले. मला सार्वजनिक जागी पाणी घेण्यास मनाई केली गेली, दुकानातून काही खरेदी करण्यास मज्जाव करण्यात आला. त्याने माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही, मी फरक मानतच नाही. माझे या जीविताचे कार्य आहे केवळ समाजातील महिलांचे सक्षमीकरण जेणे करून त्यांना वाईटाचा सामना करावा लागू नये.” त्या म्हणाल्या.
नजिमा यांच्या समोर आणखी पाच उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत, त्यात भाजपा आणि कॉंग्रेस देखील आहेत. नजिमा त्यांच्या सायकल वरून रोज फिरतात, लोकांना भेटतात आणि स्वत:चा प्रचार करतात.
“मी जिंकेन किंवा हारेन, माझे काम करत राहिन, त्यापासून मला कुणीच थांबवू शकत नाही”
(थिंक चेंज इंडिया)