समाजाच्या भल्यासाठी धडपडताहेत ‘बाईकर्स फॉर गुड’,प्रत्येक प्रवासाचा उद्देश जन-जागृतीचा!
दिल्ली शहराच्या रस्त्यांवर अनकेदा बाईकने रात्री बे रात्री मृत्युच्या जीवघेण्या कलाबाजी म्हणजेच स्टंट करणारे बाईकर्स, लोकांमध्ये भिती निर्माण करतात. या बाईकर्सनी रस्त्यांवर लोकांना इतके हैराण करून सोडले की, उच्च न्यायालयाने देखील पोलीस आणि सरकारकडून त्यांच्यावर लगाम घालण्यासाठी उपाय योजण्याचे निर्देश दिले. त्याचवेळी दिल्लीतच बाईकर्सचा असाही एक गट आहे, जे लोकांना वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती देतात, तसेच सोबतच समाजसेवेच्या कामात देखील मोठ्या संख्येने सहभागी होतात. या गटाचे नाव आहे ‘बाईकर्स फॉर गुड’. याचे सदस्य पोलिसांसोबत मिळून लोकांना वाहतुकीचे नियम सांगतात आणि समाजासाठी देखील अनेक चांगली कामे करत आहेत.
‘युवर स्टोरी’ला ‘बाईकर्स फॉर गुड’चे संस्थापक मोहित अहुजा सांगतात की, “खरा आणि योग्य बाईकर नेहमीच हेल्मेट घालून वाहतुकीच्या नियमांप्रमाणेच बाईक चालवितो. अनेकदा रस्त्यांवर स्टंट करणारे बाईकर्स नसतातच, ते गुंड किंवा मवाली असतात, जे चांगल्या बाईकर्सचे नाव खराब करतात.” त्यांनी सांगितले की, “मागील वर्षात आम्ही दिल्ली पोलिसांसोबत मिळून बाईकवाल्या मवाली लोकांना लगाम घालण्यासाठी अभियान चालवत आहाेत. या अभियानात आमचे सर्व बाईकर्स सुरक्षेच्या सर्व साधनांसोबत आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करत बाईक चालवितात”.
अनेक क्षेत्रातील लोक यात सामील आहेत.
‘बाईकर्स फॉर गुड’ सोबत शेकडो बाईकर्स सामील झाले आहेत. ज्यात पुरुषांसोबत महिलांची संख्या देखील खूप चांगली आहे. त्यात डॉक्टर, इंजिनियर, माध्यमकर्मी, सैनिक इत्यादी लोक यात सामील आहेत. या लोकांना जेव्हाही वेळ मिळतो, तेव्हा ते आपली बाईक उचलून मोठ्या प्रवासावर निघतात.
समाजसेवा करण्यात राहतात आघाडीवर
‘बाईकर्स फॉर गुड’चे सदस्य नेहमीच समाजाची सेवा करण्यासाठी तयार राहतात. मग ते माजीसैनिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे असो, किंवा गरिबांना जेवण देणे असो. या गटाच्या सदस्यांनी नव्या वर्षाची सुरुवात सफदरजंग रूग्णालयासमोर गरीब लोकांना जेवण देऊन केली. मोहित सांगतात की, “बाईकर्स फॉर गुड’च्या काही सदस्यांनी निश्चय केला की, नव्या वर्षाच्या सुरुवातीस काहीतरी करावे. आम्ही काही पैसे जमा केले आणि गरीब लोकांना जेवण खाऊ घालण्यासाठी रुग्णालयात आलो”. यापूर्वी ‘बाईकर्स फॉर गुड’ची चार वर्ष पूर्ण झाली त्यावेळी मागील वर्षी दोन ऑक्टोबरला गटातील सदस्यांनी अपंग लोकांसोबत आपली संध्याकाळ व्यतीत केली.’
मोहित सांगतात की, “आमच्या प्रत्येक प्रवासाचा कुठलातरी उद्देश असतो. आमच्या सोबत १०पेक्षा अधिक बाईक गट देखील सामील आहेत. आमच्यासोबत येणारे सर्व बाईकर्स आपल्या सुरक्षेसोबत रस्त्यावर चालणा-या अन्य लोकांच्या सुरक्षेचे देखील भान ठेवतात. त्यांनी सांगितले की, आम्ही माजी सैनिकांच्या मागण्यांसाठी देखील बाईक चालवली आहे. आम्हाला त्यांना पूर्ण सहकार्य करायचे आहे. त्याव्यतिरिक्त आम्ही लोकांना सांगतो की, त्यांनी सैनिकांसारखे दिसणारे कपडे खरेदी करू नयेत, कारण ही वर्दी विकत नाही तर, कमविली जाते. त्याव्यतिरिक्त सैनिकांच्या वर्दी सारखे दिसणा-या कपड्यांचा फायदा नक्षलवादी उचलतात.
लेखक : अनमोल
अनुवाद : किशोर आपटे.