जागतिक पातळीवर नावाजलेल्या कंपन्यांना ऑनलाईन गिफ्टींगची सेवा देणारी ‘5BY7 कंपनी’

28th Nov 2015
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

एका ऑनलाईन प्रिटींग कंपनीतून व्यवसाय ते व्यवसाय भेटवस्तू देणाऱ्या कंपनीत रुपांतरीत झालेल्या 5BY7 कंपनीनं खूप बदल अनुभवले आहेत. २०१२ मध्ये ही कंपनी सुरू करण्यासाठी त्यांना ४० लाख रुपये गुंतवणारे गुंतवणूकदार मिळाले. त्यानंतर मात्र कंपनीला कोणताही निधी मिळालेला नाही. पण तरीही कंपनी आपला वार्षिक विकास दर ५० टक्के असल्याचा दावा करतेय. त्यांनी ऑनलाईन व्य़ासपीठ सुरू केल्यानंतर त्या वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या तिपटीनं वाढली आहे. विशेष म्हणजे त्यांना यासाठी कोणतंही शुल्क भरावं लागलेलं नाही.

5BY7 कंपनीच्या यादीत जवळपास पाच हजार उत्पादनं आहेत. ही उत्पादनं कंपनीनं ग्राहकांसाठी निवडलेली आहेत. या ग्राहकांमध्ये स्टार्टअप आणि मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. ही कंपनी ग्राहक, कर्मचारी तसंच विविध कार्यक्रम आणि जाहिरातीसाठी भेटवस्तू किंवा ब्रँडेड वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम करते. कंपनीनं आतापर्यंत जागतिक पातळीवरील ५० ब्रँडेड कंपन्यांसह पाचशे कंपन्यांसाठी काम केल्याचं 5BY7 चे संस्थापक पियुष सुरी सांगतात. भारतातील १ अब्ज अमेरिकन डॉलरच्या या भेटवस्तुंच्या बाजारात सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचंही सुरी स्पष्ट करतात.


image


5BY7 कंपनी आधी व्हिटॅमिनप्रिंट डॉट कॉम या नावानं ऑनलाईन प्रिटींग कंपनी म्हणून २०१२ मध्ये स्थापन करण्यात आली होती. पण थोड्याच महिन्यात भारतात व्यवसाय ते व्यवसाय भेटवस्तुंच्या क्षेत्रात खूप संधी असल्याचं संस्थापकांच्या लक्षात आलं. तोपर्यंत भेटवस्तुंची ही बाजारपेठ अत्यंत विस्कळीत, असंघटित, बेभरवशाची तसंच हलक्या दर्जाचा माल पुरवणारी असल्याचं चित्र होतं. कंपनीला पहिलं काम मिळालं ते नॉर्वेच्या ऑपेरा सॉफ्टवेअर कंपनीकडून...ऑपेरा सॉफ्टवेअर कंपनीनं त्यांचं संपूर्ण उत्पादन आणि व्यवस्थापनाचं काम 5BY7 कंपनीला दिलं. त्यानंतर कंपनीला भारतीय ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि भारतात या ऑनलाईन व्यासपीठाबद्दल जागृती होऊ लागली. सध्या ते भारतासह, मध्य-पूर्व, युरोप आणि अमेरिकेतील ग्राहकांना सेवा पुरवतात. त्याचबरोबर पहिल्यांदाच त्यांनी किरकोळ ग्राहक बाजारात आपली उत्पादनं उतरवली आहेत.

इतर स्टार्टअपसारखंच 5BY7 हे स्टार्टअपही काही मित्रांनी सुरू केलं. रिपून जय मेहता आणि पियुष यांची न्यूयॉर्कमध्ये भेट झाली. तर राहुल कुमार हे पियुष यांचे वर्गमित्र...ऑनलाईन प्रिटींग सुरू करण्याआधी या तिघांनी आधी अनेक व्यवसायांचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी हा व्यवसाय निवडला.

5BY7 ही कंपनी यशस्वी होण्यामागे संघभावना, बाजारपेठेतील पोकळी आणि ग्राहकांचा प्रतिसाद या गोष्टी असल्याचं पियुष सांगतात. गेल्या तीन वर्षांपासून त्यांची कोअर टीम तशीच असल्याचं ते सांगतात आणि संपूर्ण टीमनं मोठ्या प्रमाणात कष्ट करुन विक्रेते आणि ग्राहकांचा पाठिंबा मिळवला आहे, असंही ते नमूद करतात.

पियुष यांच्या मते ई व्यापाराची संकल्पना अस्तित्वात आल्यानं टेकसेव्ही आणि आकृतीबंधाबाबत जागृत असलेल्या खरेदीदारांना किंमतीपेक्षा विश्वासार्हता आणि प्रभाव या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. पुरवठ्याचा विचार केला तर किरकोळ बाजार वेगानं वाढत असताना व्यवसाय ते व्यवसाय क्षेत्रात तेवढ्या प्रमाणात घाऊक खरेदी होत नसल्यानं हीच संधी असल्याचं जाणवलं असं पियुष सांगतात. तर मागणीच्या बाबतीत ते सांगतात की किरकोळ आणि घाऊक खरेदीचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळे 5BY7 कंपनीला व्यवसाय ते व्यवसाय या संकल्पनेपुढे जाऊन लग्न आणि वैयक्तिक भेटवस्तू देण्याच्या सेवेतही विक्रीसाठी प्रवेश करायचा आहे.

5BY7 कंपनीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कंपनीनं स्वयंचलन आणि माहितीवर लक्ष केंद्रित केलंय. वस्तुंचं मोठं भांडार उभारताना उत्पादनाची माहिती गोळा करण्याचं काम खूप फायद्याचं आणि महत्त्वाचं ठरल्याचंही ते सांगतात. त्याचबरोबर व्यवसाय ते व्यवसाय क्षेत्रात ग्राहकांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल यावरही त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून काम सुरू केलंय. यात ग्राहकांसाठी संकल्पनेची निर्मिती, प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी टूल्सची निर्मिती आणि विक्री चक्र छोटं करण्यासाठी उपाययोजना करण्यावरही त्यांचा भर आहे.

भारतातील व्यवसाय ते व्यवसाय ई व्यापाराची बाजारपेठ ढोबळमानाने ५०० अब्ज अमेरिकन डॉलरची आहे. देशातील छोट्या आणि मध्यम स्वरुपाच्या साडे चार कोटी उद्योगांना घाऊक प्रमाणात पुरवठा हवा आहे, त्यामुळे या क्षेत्रात खूप मोठ्या संधी आहेत.

वेबसाईट : www.5by7.in


लेखक- सिंधू कश्यप

अनुवाद – सचिन जोशी

Want to make your startup journey smooth? YS Education brings a comprehensive Funding and Startup Course. Learn from India's top investors and entrepreneurs. Click here to know more.

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close